भारतीय रेल्वेची अपरिचित कहाणी

           आपल्या भारताची रेल्वे जगातील चौथ्या क्रमांकाची रेल्वे म्हणून ओळखली जाते . भारतीय रेल्वेत रोज ऑस्ट्रोलिया या देशाच्या एकूण लोकसंख्येएव्हढे लोक प्रवास करतात . भारतीय रेल्वेरुळांची एकत्रित लांबी एक लाख पंधरा हजार किलोमीटर आहे . भारतीय रेल्वे जगातील क्रमांक एकची सार्वजनिक क्षेत्रातील रोजगार देणारी संस्था आहे अशी माहिती आपण नेहमीच ऐकतो . मात्र एव्हढीच भारतीय  रेल्वेची ओळख नाही त्यापेक्षा भारतीय रेल्वेची ओळख  ही  फार मोठी आहे . त्याची ओळख करून देण्यासाठी हा लेखन प्रपंच .
       भारतीय रेल्वेच्या तब्बल 16 उपकंपन्या आहेत . मी उपकंपन्या म्हणतोय हे लक्षात घ्या  , रेल्वेचे झोन आणि डिव्हिजन म्हणता नाहीये . रेल्वेचे झोन ,डिव्हिजन आणि रेल्वेच्या उपकंपन्या या पूर्णतः वेगवेगळ्या गोष्टी आहेत ही  गोष्ट लक्षात घ्या . तर या 16 कंपन्या रेल्वेसाठी विविध प्रकारच्या सेवा पुरवतात अथवा उत्पादने तयार करतात . काही कंपन्या भारतासाठी परकीय चलन देखील मिळवून देतात . सर्वप्रथम आपण या कंपन्यांची नावे बघू नंतर त्यांची सविस्तर  ओळख करून घेऊ( 1) RITES(2)IRCON (3)CRIS (4)IRFC (5)CONCOR (6)KRCL (7)Railtel (8)IRCTC (9)PRCL (10)RVNL (11)RLDA (12)DFCIL (13)MRVC
(14)BWEL (15)BSCL (16)BCLE या त्या कंपन्या . .
यातील काही कंपन्या आपल्याशी प्रत्यक्ष संबंधित आहेत आणि काही या मालवाहतुकी संदर्भात अथवा मूलभूत सोइसुविधा  उभारणाऱ्या असणाऱ्या असल्याने त्या आपल्याशी प्रत्यक्ष संबंधित नाहीत . या 16 कंपन्या प्रत्यक्ष रेल्वेच्या सेवेसी संबंधित आहेत , रेल्वेतर्फे चालवण्यात येणाऱ्या शाळा दवाखाने आदी कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेल्या सेवा यात अंतर्भूत नाहीत . तर बघूया रेल्वेचा उपकंपन्या . पहिल्यादा प्रवाश्यांशी प्रत्यक्ष संबंध असणाऱ्या कंपन्या  बघूया .
(1)IRCTC प्रवाश्याच्या कायम संबंध येणारी हि कंपनी 2001साली स्थापन करण्यात आली .प्रवासाच्या  गाडीचे ऑनलाईन आरक्षण करणे आणि प्रवाशांना पर्यटन आणि खाद्यान्न सेवा पुरवणे ही कामे त्यांच्याकडून केली जातात .
(२)RCIL (RailTel) सध्याचा काळातील अत्यंत चर्चेत असणारी हि उपकंपनी . या कंपनीची स्थापना 2000 साली झाली . रेल्वेमध्ये इलेट्रीक संदेशवहन सुधारणा करण्यासाठी याची स्थापना करण्यात आली . आपल्याला हि उपकंपनी  माहिती असते ते फ्री  वाई फाय साठी . रेलटेल हि कंपनी अन्य दूरसंचार सेवांकडून इंटरनेट घेत नसून  बीएसनल आयडिया एअर टेल आदी कंपन्या ज्या प्रकारे इनरनेट्ची सेवा पुरवतात त्या च प्रमाणे रेलटेल हि सेवा पुरवते . 
(३)MRVC  मुंबई महानगर  क्षेत्रात रेल्वेच्या नवीन योजना तयार करणे आणि त्या राबवणे यासाठी ही कमानी काम करते या कंपनीची स्थापना 1999 साली झाली . 
(4) PRCL  गुजरात मधील रेल्वेच्या काही प्रकल्पासाठी ही कंपनी 2001ला  स्थापन करण्यात आली 
(5) CRIS रेल्वेला तांत्रिक साह्य करण्यासाठी या कंपनीची  स्थपना 1986 ला करण्यात  आली . 
(6) IRFC रेल्वेचे अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणे आणि नवीन प्रकल्प उभारण्यासाठी मार्केट मधून आर्थिक मदत उभारण्यासाठी 1986 ला ही कंपनी उभारण्यात आली . 
(7)  RLDA ही कंपनी रेल्वच्या मोकळ्या भूखंडाचा विकास करून रेल्वेला  प्रवासी  आणि मालवाहतुकीच्या शिवाय अधिकचे उत्पन्न मिळवून देण्यासाठी  2005 साली स्थापन झाली 
(8) IRCON   भारतीय रेल्वेला परकीय चलन मिळवून देणारी ही कंपनी 1976 ला स्थापन करण्यात आली . देशात आणि परदेशात विकासाबाबत मूलभूत कामे करण्यासाठी या संस्थेची स्थापन करण्यात आली आहे .
                      भारतीय रेल्वे एका ब्लॉग पोस्टच्या विषय नाहीच त्यामुळे सध्यापुरते थांबतो . बाकी रेल्वेच्या 8 कंपन्यांची तसेच इतर अन्य आकर्षक माहिती पुढच्या पोस्ट मध्ये देईल तो पर्यंत राम राम 
(क्रमशः  भाग पहिला )
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?