आपण कधी बघणार या प्रश्नांकडे

काल दिनांक 14जुलैला टिव्हीवर बिबिसी न्युज बघताना एक माहितीपट बघीतला . माहितीपट भारतातील तृतीयपंथीयांच्या समस्येवर आधारित होता . त्यामध्ये काय सांगितले होते त्याचा उहापोह मी येथे करणार नाही . मला लक्ष वेधून घेयचे आहे . त्यांनी मांडलेल्या विषयावर . बीबीसी प्रमाणेच  आखाती देशातील प्रमुख वृत्तवाहिनी असलेल्या अल् जझीरा  या वृत्तवाहिनीवर मी भारतातील विविध समस्यांचे माहितीपट अनेकदा बघतो . (यावर कोणला  त्यांचा भारतविरोधी धोरणाचा वास येईल) चॅनेल न्यूज  एशिया या सिंगापूरच्या वृत्तवाहिनीवर सुद्धा  भारतातील झटपट सुरु होऊन लवकरच बंद पडणाऱ्या स्टार्टअपविषयी एक माहितीपट मी बघितला होता . मात्र भारतीय वृत्तवाहिन्यांवर मी या प्रकारचे माहितीपट कधीच बघितले नाही . भारतातील सर्व समस्या संपल्या आहेत , असेच काहीसे वार्तांकन भारतीय माध्यमांचे असते .ज्या समस्या अन्य परदेशी माध्यमांना सहजतेने दिसतात . त्या समस्या भारतीय माध्यमांना  का  दिसत नाही     
     
    भारतातील वृत्तवाहिन्या मनोरंजनाच्या बातम्या अधिक देतात असे माझे निरीक्षण आहे . ज्यामध्ये अभिनेत्यांची नुकतीचरांगू  आणि चालायला शिकणारी  बाले मोठेपणी कोण होणार यावर काथ्याकूट करतात . मात्र भारतातील समस्येवर फारशी काट्याकुट करत नाही . आज भारतातील शेतकरी , तृतीयपंथी , सारखे अनेक समाज घटक प्रचंड हालअपेष्टा सहन करतंय जगत आहे. मात्र त्यांचा आवाज भारतीय माध्यमांमध्ये उमटत नाही ज्यामध्ये खरतर उमटायला हवा . दुर्दैवाने ज्यांना भारतातील समस्येमध्ये निव्वळ स्वतःचा आनंद दिसतो अश्या परदेशी माध्यमात तो उमटतो . माझ्याकडे असणाऱ्या अल्प माहिती आणि अनुभवानुसार भारतातील बहुसंख्य लोक प्रादेशिक वृत्त वाहिन्यांचा बघतात .  जे काही लोक इंग्रजी वृत्तवाहिन्या बघतात . त्यामध्ये  बहुसंख्य लोक एनडीटीव्ही 24*7 , TIMES NOW सारख्या भारतीय माध्यमाच्या इंग्रजी वृउत्तवाहिन्या बघतात . ज्यामध्ये भाषांचे अपवाद सोडता , CONTENT  सारखाच असतो असे माझे निरीक्षण आहे . त्यामुळे बहुसंख्य भारतीयांना या  विषयी काहीच माहिती नसते . जे अयोग्य आहे . यामध्ये बदल झालाच पाहिजे .
नाही म्हणायला दिव्य मराठी सारख्या काही मराठी वृत्तपत्रात या विषयी बरेच काही छापून येते . मात्र ते वर्तमानपत्र पुण्यासारख्या अनेक महत्त्वाच्या  शहरांमध्ये मिळत नाही . या चित्रात बदल व्हावा अशे प्रयत्न वाढायला हवे . तेव्हाच भारत खऱ्या अर्थाने महासत्ता म्हणून घेण्यास लायक ठरेल असे मला वाटते .  .तो लवकरात लवकर व्हावा अशी मनोकामना करून आतापुरते थांबतो . ते पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यंत नमस्कार
.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?