नव्या सामाईक चलनाचा प्रसवकळा,

सध्या भारतात प्रसिद्दीभिलाषी लोक प्रसिद्धीसाठी  नवनवीन फंडे  अमलात आणत असले, भारताला न मिळालेल्या क्रिकेटच्या विश्वचषकाचा बाबत कवित्व करत असले तरी,  जगाच्या अर्थकारणात आमूलार्ग बदल होत आहेत .  आफ्रिकेच्या पश्चिम  भागातील 15 राष्ट्रांनी समाईक चलन स्वीकारण्याचा घेतलेला निर्णय हा त्यापैकीच एक . भलेही जागतिक राजकारणात या राष्ट्रांचे महत्व यत्किंचित  असेल,  मात्र जगाची पऊले कोणत्या दिशेने जात आहेत याची चुणूक यातून दिसते . आपण खाली दिलेल्या नकाशात या देशांचे स्थान बघू शकतात .हे 15 देश पूर्वी फ्रान्सची वसाहत होते . त्याचा खुणा आजही या देशात आपणास दिसतात . या 15 देशांपैकी आठ देशांच्या मध्यवर्ती बँकेचे रोखे हे फ्रान्सच्या बँकेत ठेवले आहेत . फ्रान्सतर्फे त्यांचे चलन प्रसारित केले जाते . 
तुम्हाला शेजारी आफ्रिकेच्या नकाश्यात जो हिरवा रंग दिसतोय त्या देशात सन 2020 च्या अखेरपर्यंत ECON 
हे सामायिक चलन वापरण्यास सुरवात झाली असेल . आपसातील व्यापारामध्ये सुलभता यावी , या प्रमुख उद्देश्याने त्यांनी हे पाऊल उचललंय या प्रमुख उदेश्या बरोबरच परस्परांच्या देशात पर्यटन वृद्धी व्हावी हाही उदेष्य या मागे आहे .   बेनिन , बुरखिया फासो , केप वरदे , द गांबिया , घाना , गिनिया , गिनिया बेसाऊ ,आयव्हरी कोस्ट , लायबेरिया , माली , नायजर , नायजेरिया , सेनेगल , सिरिया लागों आणि टेगो हे ते 15 देश आहेत ., ज्यांनी समाईक चलन स्वीकारण्याचे ठरवले आहे .   
     मध्यंतरी  आशियाई देश आणिक आशियाई देश अधिक 5  म्हणून ज्या देशांचा समूह ओळखला जातो तिथे मुक्त व्यापार करण्यासाठी काय करता येईल यासाठी एक परिषद झाली होती . त्यादेशात  जवळपास मुक्त  व्यापारासंदर्भात सहमती झाली होती . मात्र आपल्या भारताचे आणि चीनचे मतैक्य न झाल्याने तो प्रस्तव बारगळला . असो सांगायचं मुद्दा अशा की  जग सध्या आर्थिक मुद्यवर प्रचंड वेगाने एकत्र येत आहे . त्या दृष्टीने भारताच्या शेजारील राष्टांची सांघटना असलेल्या सार्क कडे बघितल्यास अत्यंत निराशाजनक   चित्र समोर येते . SAFTA ची अंमलबजावणी ठरवून देखील होत नाहीये . ती लवकरात लवकर होऊन सार्क देश सुद्धा एकत्र येवो हि सदिच्छा व्यक्त करून आज पुरते थांबतो ते पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यंत नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?