चेन्नइ , मराठवाडा , भविष्याची चाहुल देणारे ठिकाणे

               आज हा मजकूर लिहित असताना, भारतातील आसाम, बिहार , आदी राज्यात पावसाने कहर केला  आहे , मात्र याच भारतातील मराठवाडा हा विभाग आणि चेन्नई या शहरात पाण्यासाठी वणवण करायची वेळ आलीये
      आजमितीस मराठवाड्यात अत्यंत कमी पाणी आहे .तर चेन्नई शहरात रेल्वेने पाणी आणण्याची वेळ आलीये . काही जण चेन्नई शहरातील पाण्याचा आणीबाणीला कर्नाटक बरोबर तामिळनाडू या राज्यांमध्ये कावेरी नदीच्या पाणी वाटपावरुन सुरु असणाऱ्या वादाला जवाबदार धरतील . मात्र हा वाद  पाण्याचा अनुपलब्धतेमुळेच हा वाद  सुरु झालायं, हे मात्र नाकारुन चालणार नाही . मराठवाड्यात त्याचा भौगोलिक स्थानामुळे अत्यंत कमी पाउस पडतो . त्यातही जो काही पाऊस पडतो तो जमीन जांभ्या खडकांची असल्याने पाणी फारसे जमिनीत मुरत नाही . परिणामि दर एक दोन वर्षानंतर मराठवाड्यावर पाण्यासाठी दाही
दिशा फिरण्याची वेळ येते . सध्याच्या बदलत्या हवामानाचा काळात  पावसाचा लहरीपणा वाढल्याने यामध्ये भरच पडत आहे . आत्यंतिक राज्यनिष्ठा असलेल्या कर्नाटक आणि तामिळनाडूचा प्रशा काही औरच आहे . या मुद्यावर या दोन राज्यामध्ये कित्येकदा चर्चेच्या फेऱ्या झाल्या आहेत . मात्र कावेरी नदी वाटपाच्या प्रश्न काही सुटलेला नाही .
या कावेरी नदीच्या प्रश्नामध्ये तामिळनाडू कर्नाटक  या दोन राज्याबरोबर केरळ आणि पौंडेचरी या भागांचा देखील समावेश असल्याने हा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा  बनला आहे . मराठवाड्याच्या  विकासाज्याची साठी सैविधानिक विशेष तरतुदी करून सुद्धा त्याची योग्य त्या प्रकारे अंलबजावणी न झाल्याने मराठवाड्याचे अनेक प्रशम अनुत्तरित राहिले आहेत . जे आपणास सध्या दिसत आहे . 
हे चित्र निव्वळ सुरवात आहे . भविष्यात अशी नाईक चेन्नई आणि मराठवाडा निर्माण होऊ शकतात . आपल्याकडे आहे ना सध्या भरपूर मग वापरून टाका हि वृत्ती या साठी कारणीभूत ठरलीये . पुण्यासारख्या ज्या शहरांना३ते 4  धरणाव्दारे (फक्त पुणे शहराला {पिंपरी चिंचवड नाही }वरसगाव , पानशेत , खडकवासला या धरणातून पाणी पुरवठा होतो )  पाणीपुरवढा होता त्या शहरांमध्ये  ही  वृत्ती अत्यंत मोठ्या प्रमाणात  दिसते
. मात्र हे लोक अन्य ग्रामीण क्षेत्राचा विचार करत नाहीत . जे सर्वथा अयोग्य आहे . यामध्ये बदल  होणे नितांत गरजेचे आहे . जरी पृथ्वीवर 71%पाणी असले तरी त्यातील जवळपास 97 % पाणी समुद्रात आहे . ज्याचा वापर करणे खर्चिक आणि सहजसोपे नाही . उरलेल्या तीन टक्यांपैकी जवळपास दीड टक्का  पाणी उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर गोठलेल्या स्वरूपात आहे . ज्याचा वापर करणे पृथ्वीवरील हवामानाचा विचार करता धोक्याचे आहे . त्यामुळे उरलेल्या पाण्याचाच वापर आपणस  करावा लागणार आहे . [
.या उरलेल्या पाण्यापैकी बरेचसे पाणी हिमालयात आहे , ज्यावर नियंत्रण असावे याच हेतूने चीनने तिबेटवर आणि पाकिस्तानने काश्मीरवर हक्क सांगितला  आहे .  पूर्वीचा इतिहास , धार्मिक एकता या सांगायच्या गोष्टी आहेत ] तो आपण कश्या प्रकारे करतो यावरच आपले पुढील भवित्यव्य अवलुबुन आहे नाहीतर सध्याच्या विज्ञानाला ज्ञात अशी विश्वातील एकमेव सजीव सृष्टी नष्ट होणे काही दूर नाही 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?