दुर्देवी घटनेचा अमृत महोत्सव

येत्या 6आँगस्टला एका दुर्देवी घटनेला 74 वर्षे पुर्ण होवून 75वे वर्षे सुरु होईल. मानवाच्या आतापर्यतच्या ज्ञात इतिहासात फक्त दोनदा अणूबाँम्बचा वापर करण्यात आला , त्यापैकी पहिल्यांदा अणूबाँम्ब वापरण्याची ही घटना होती . जिचे दुष्परीणाम अजूनही आपणास दिसत आहे . हिरोशामा या जपानच्या शहरांवर संयुक्त संस्थाने अमेरीका या देशाने दुसऱ्या महायुद्धामध्ये जगातील पहिला अणूबाँम्बचा प्रयोग केला . या दुर्दैवी घटनेचेअमृत महोत्सवी  वर्ष ६ ऑगस्ट पासून सुरु होईल .दुसऱ्या महायुद्धात पूर्व बाजूला आघाडीवर असलेल्या जपानने या  लागोपाठच्या २ बॉम्ब हल्ल्यानंतर शरणागती स्वीकारली आणि दुसऱ्या महायुद्धाची अखेर झाली यानंतर जपानच्या राज्यघटनेत आमूलाग्र बदल झाले . त्यांना लष्कर उभारण्यास मनाई करण्यात आली . 
       या अणुहल्ल्याचे दुष्परिणाम अजूनही जपानमध्ये दिसतात . अनेक व्यंग असणारी बालके तिथे अजूनही जन्माला येत असतात . जेव्हा हा हल्ला झाला त्यावेळी क्षणार्धात लाखो व्यक्ती मृत्युमुखी पडल्या , हजारो व्यक्ती कायमच्या जायबंदी झाल्या . कित्येक किलोमीटरचा  परिसर सेकंदाच्या आता जळून गेला . या धक्यातून सावरत आजचा जपान मार्गक्रमण करत आहे . सातत्याने भूकंपाचा सामना करत मोठ्या दौलाने प्रगतीची नवनवीन शिखरे पादाक्रांत  करत आहे. आपल्याला बुलेट ट्रेन उभारण्यास मदत करत आहे. जपानच्या होंडा या वाहन निर्मिती क्षेत्रातील कंपनीने भारताच्या बाजारपेठेवर नियंत्रण मिळवले आहे. हे नियंत्रण इतके प्रचंड आहे कि बजाज कावासाकी , पल्सर या एकेकाळी तरुणाईच्या शान असणाऱ्या गाड्या आजकाल अत्यंत कमी दिसतात . याउलट आपणास होंडा सिटी , सारख्या कार आणि युनिकोन सारख्या मोटार सायकल आणि ऍक्टिव्हा डीओ सारख्या गाड्या सर्वत्र दिसतात 
आपण शेजारच्या  चित्रात जगातील पहिल्या अणू हल्यात उध्वस्त झालेल्या हिरोशिमाचे सध्याचे चित्र बघत आहोत .अणू हल्ल्याचे पुसटसे देखील चित्र यामध्ये आपणास दिसत नाहीये . त्याचबरोबर जपानी मनोरंजन क्षेत्रातील डोरेमॉन आणि निन्जा हतोरी यांची बालमानावरील जादू सुद्धा विसरू शकत नाही . अक्षरशः राखेतून उभारी घेतली आहे जपानने 
अर्थात राखरांगोळी होण्यामागे त्यांचेच वागणे कारणीभूत होते हे विसरून चालणार नाही . युध्द्दांच्या खुमखुमीत त्यांनी जवळपास विनाकारण अमेरिकेच्या पर्ल हार्बर या बंदरावर केलेला हल्ला  ,अमेरिकेला दुसऱ्या महायुध्द्दात सभागी करून घेण्यास कारणीभूत ठरला . याची फारच मोठी किंमत जपानने नंतरच्या काळात चुकवली ती जगातील एकमेव अश्या अणुबाँम्बच्या हल्ल्याला तोंड देऊन .  मात्र या चुकीतून ते सावरले आणि एक विकसित राष्ट्र म्हणून उदययास आले . त्यांनी मागचे अपयश  धुवून टाकले . यातच सर्व आले ना ? 
या हल्ल्याची अमेरिकेला खरंच गरज होती का ?  हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे .  जपानच्या आक्रमतेला त्यावेळी अन्य मार्गानी रोखता आले नसते का ?  हा प्रशा या  निमित्याने  विचारला जाणार,  त्याला सध्या तरी ऊत्तर देता येणे अशक्य आहे . आणि माझ्या मते तो भविष्यात देखीलअनुत्तरित   राहणार यात शंका नाही 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?