दिवस सध्या मेट्रोचे

           आपल्या देशात सध्या सर्वत्र मेट्रोचे जाळे तयार करण्याचा कृतीने वेग पकडला आहे . मोठ्या शहरांबरोबर नाशिकसारख्या मध्यम शहरात देखील सार्वजनिक वाहतूकीसाठी मेट्रो वापरण्याचे शासनकर्त्यांचे धोरण आहे . सार्वजनिक वाहतूकीसाठी बस, टँक्सी, अँटोरिक्षा आदी पर्याय सुद्धा आहेत , या पर्यांयामध्ये योग्य त्या सुधारणा केल्यास मेट्रो उभारणीला लागणाऱ्या पैसापेक्षा कमी खर्चात सहजतेने अत्यंत सक्षम सार्वजनिक वाहतूक  व्यवस्था सहजतेने उभारता येवू शकते .
                   माझा मेट्रोचा उभारणीला विरोध नाही . मुंबई सारख्या महानगरात ती उभारलीच पाहिजे . मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मेट्रो हाच एकमेव पर्याय  उपलब्ध असल्याचे भासवले जात आहे . माझा या गोष्टीला विरोध आहे .  . नाशिक सारख्या मध्यम आकाराचा शहरात BRT सारखे कमी खर्चात सहज राबवता येणारे उपक्रम राबवले तरी खूप चांगला परीणाम दिसू शकतो . नाशिक शहरात शेअर अँटोरिक्षा ही अत्यंत चांगली प्रणाली कार्यरत आहे . या प्रणालीमध्ये काही दोष असतील तर ते दुर करायला हवेत . न की ती प्रणालीच पुर्णपणे नाकारणे . आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात देखील शर्टाचे एखादे बटण तूटले तर पुन्हा नव्याने लावतो . शर्टाचे बटण तूटले म्हणून पुर्णतः नविश शर्ट आपण विकत घेत नाही . तसाच काहीसा हा प्रकार आहे .
                 मी जवळपास साडेपाच वर्ष पुण्यात राहिलो आहे . तेथील सत्ताधिकारी वर्गाने BRT वरुन केलेली चर्चा बघीतली आहे . BRT मध्ये वापरण्यात येणाऱ्या बसेसचे  दरवाजे उजव्या बाजूला असावे अथवा डाव्या बाजूला असावे . BRT ची मार्गिका रस्त्यचा कडेला असावी अथवा रस्त्याचा मधोमध असावी यावरुन पुण्यात बराच खल करण्यात आला .शेवटी दोन्ही बाजूला दरवाजे असणाऱ्या बसेसची निर्मिती करण्यात आली .ज्यामध्ये दरवाज्यांनी बरीच जागा घेतल्याने बसेसची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता कमी झाली . परीणामी अपेक्षीत प्रमाणात योजना यशस्वी झाली नाही .
               नुकतेच मुंबईत बेस्ट प्रशासनाने बसवाहतूकीचे दर कमी करुनही शहरबससेवा फायद्यामध्ये आणता येते, आणि त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी दुर करता येते हे दाखवून दिले आहे . काहीजण बेस्ट प्रशासनाला मुंबई महानगरपालिकेकडून मिळणाऱ्या भरघोस  अनुदानामुळे हे शक्य झाल्याचे सांगतिल ,मला त्यांना हे सांगायचे आहे की अस्या प्रकारचे अनुदान प्रत्येक महानगरपालिकेत शक्य आहे . रायगड जिल्ह्यातील खोपोली या शहरामध्ये एसटी महामंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या संयुक्त भागिदारीतून खुप छान योजना सुरु आहे . त्या प्रकारचे प्रकल्प उभारुन नाशिक शहरातील तोट्यातील बससेवा पुर्णतः बंद न करता फायद्यात आणणे सहजशक्य आहे .
मेट्रो मार्फत या माध्यमांपेक्षा अधिक लोक एका ठिकाणाहुन अन्य ठिकाणी जावू शकतात . त्यामुळे  मेट्रोपुढे अन्य वाहतूकीची साधने दुय्यम आहेत  अशी गोष्ट काही जण मांडतील . त्यांना मी सांगू ईच्छितो की , या साधनांची वारंवारता  वाढवल्यास ही क्षमता भरुन काढता येणे , सहजशक्य आहे . संख्या वाढवण्याची गोष्ट
काढल्यावर काही जण वाहतूक कोंडीचा आणि प्रदुषणाचा प्रश्नाबाबत भाष्य करतील . त्यांना माझे सांगणे आहे की मेट्रोमुळे प्रदुषण होतच नाही असे नाही . मेट्रो वीजेवर चालते ती वीज निर्माण होताना प्रदुषण होतेच .त्यामुळे प्रदुषणाचा मुद्दाच गैरलागू आहे . राहिला प्रश्न वाहतूक कोंडीचा तर सार्वजनिक वाहतूक सक्षम असल्याने वाहतूक कोंडीला काही प्रमाणात आळा बसेल , तसेच सध्या अनेक अल्पशिक्षीत बेरोजगार या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत कळीची भुमिका बजावत आहेत . मेट्रो आल्यास त्यांचा पोटावर पाय येईल ते निराळेच .
             त्यामुळे मेट्रो मोजक्या शहरातच राबवणे सयुंक्तिक ठरेल यात शंका नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?