काश्मीर , भुराजनैतिक स्थानामुळे बनलेले अग्नीकुंड

सध्या आपल्या भारतात राष्ट्रीय स्तरावर एकच मुद्दा चर्चीला जातोय , तो म्हणजे काश्मीर . केंद्र सरकारतर्फे
 सध्या काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात  सैन्य तैनात केलं जातंय . लवकरच काश्मीर संदर्भात मोठा निर्णय केंद्र सरकार घेणार असल्याचे बोलले जातयं . त्या पार्श्वभुमीवर काश्मीरच्या भु राजनैतिक स्थानाविषयी मी तूमच्याशी संवाद साधणार आहे . कोणत्याही प्रदेशाच्या बाबतीत हे भू राजनैतिक स्थान अत्यंत महत्वाचे असते . सिंगापूर या देशाची अत्यंत कमी कालावधीत प्रचंड प्रगती झाली . पाकिस्तानला अमेरिका सर्वोतपरी मदत करते . याला त्या त्या प्रदेशाचे भू राजनैतिक स्थानच कारणीभूत आहे . या  भू राजनैतिक स्थानाचा अभ्यास मानवी भूगोल या भूगोलाच्या मुख्य शाखेतील राजकीय भूगोल या उपशाखेत करण्यात येतो .
            तर आपले काश्मीर भू राजनैतिक स्थानामुळे  अग्नीकुंड  बनले आहे. ज्यांना काश्मीरचे भोगोलिक स्थान माहिती आहे . त्यांना हे माहिती आहे  की पाकव्याप्त काश्मीर सह संपूर्ण काश्मीरचा विचार करता जगातील सर्वात मोठे मानवास  सहज वापरण्यासारखे पाणी या प्रदेशात आहे . तसेच  येथून मध्य आशियातील तेल उत्पादक देश जे 1990 पर्यंत युनाटेड सोव्हियत सोशालिस्ट रशियाचा भाग होते हे हाकेच्या अंतरावर आहेत तुम्ही बाजूचा नकाशा बघू शकतात अफगाणिस्तानची एक चिंचोळी पट्टी दूर केल्यावर आपण त्याचा प्रदेशात येतो . पूर्वीचा काळातील सुप्रसिद्ध सिल्क रूट याच  प्रदेशातून जातो . 
              विचारधारेचा विचार केल्यास भारताची  अलिप्तवादी विचारसरणी, चीनची साम्यवादी विचारसरणी आणि पाकिस्तानची अमेरिकाधार्जित विचारसरणी या प्रदेशात एकत्र येतात . दुसऱ्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्नात आणि नैसर्गिक साधन संपत्तीवर ताबा मिळवण्यासाठी या प्रदेशावर नियंत्रण मिळण्यासाठी युद्ध खेळले जाते . मात्र यामध्ये प्रचंड नुकसान होते ते आम जनतेचे हे बदलायलाच हवे तरच भिव काळात समस्त प्रदेशाचा विकास होईल . हा विकासाचा रथ लवकरच मार्गस्थ व्हावा यासाठी आई जगदंबा चरणी प्रार्थना करून सध्यापुरते थांबतो ते पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यंत नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?