विश्वासाह्य माध्यमांची व्याख्या

                  भारतात घडणाऱ्या काही घडामोंडीवर मी फेसबुकवर भाष्य करणाऱ्या पोस्ट पेस्ट केल्या होत्या .त्यावर  प्रतिक्रिया देताना माझ्या फेसबुकवरील मित्रांनी मला एकांगी माध्यमांपासून दूर जात निष्पक्ष माध्यमांनी केलेल्या बातम्या बघण्याचा सल्ला दिला .त्यांनी मला काही माध्यमांची नावेही सुचवली . माझ्या मित्रांच्या मते निष्पक्षी असणारी माध्यमे मुळात एका विशिष्ठ विचारसरणीची असल्याचे मला आढळले .माझ्या मित्रांचा कल देखील त्या विशिष्ठ विचारसरणीकडे असल्याने त्यांनी त्यास निष्पक्ष असल्याचे प्रमाण पत्र दिले होते .
                         माझ्या मित्रांना मी कोणत्या माध्यमाचा बातम्या बघतो, हे सांगितल्यावर त्यांनी ते एकांगी , भारताची प्रगती न बघवणार्या समुहाचे प्रतिनिधीत्व करत असल्याचे सांगितले .  मी बघत असणारी माध्यमे सरकारवर टिका करण्यात आघाडीवर आहेत . त्यामुळे त्यांना एकांगी असल्याचे प्रमाणपत्र त्यांनी दिले होते .
                      गेल्या काही दिवसांपासून माध्यमांच्या निष्पक्षपणावर सातत्याने बोलले जात आहे . माध्यमे एकांगी झाल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातोय . माध्यमांचे मालक विविध राजकीय पक्षांशी संबंधित असल्याने ते माध्यमांच्या असून आपल्या राजकीय पक्षांचा अजेंडा चालवत असल्याने माध्यमे निष्पक्ष राहिली नसल्याचे
बोलले जात आहे . त्यामुळे असेल कदाचित आपण ज्या पक्षाच्या विचारांशी आपली जवळीक होते त्या पक्षाची भूमिका मांडणारे चॅनेल ते निष्पक्ष या उलट आपल्या पक्षावर टीका करणारे विरोधी पक्षाला झुकते माप  देणारे चॅनेल ते पक्षपाती अशा आरोप केला जातो . त्यामुळे सातत्याने सध्याच्या सरकार विरुद्ध भूमिका घेणाऱ्या NDTV  समूहाला शहरी नक्षलवादी  राष्ट्रविरोधी ठरवून अनेकजण मोकळे होतात . श्री रवीश कुमार यांना आशिया खंडाचे नोबेल समजले जाणाऱ्या रमन मॅगसेसे पुरास्कार मिळून सुद्धा अनेक स्वयंघोषित देशभक्तांनी त्यांच्या निदलस्तीची आपली भूमिका कायम ठेवली . जे चुकीचे होते
                            यावर काही जण अशा प्रश्न उपस्थित करतील की माध्यमे निपक्षपाती असणे म्हणजे काय ? याचे उत्तर देणे अत्यंत अवघड आहे . माध्यमे ही माणसांकडून चालवली जातात . माणसाच्या विचारसरणीचे कितीही प्रयत्न केले तरी काही प्रमाणत प्रतिबिंब उमटणे सहज शक्य आहे त्यामुळे जा खरोखर निपक्ष वार्तांकन हवं असल्यांस यंत्रामार्फतच  शक्य आहे . जे सध्यातरी अशक्य आहे . त्यामुळे आपल्या  एखाद्या पक्षाच्या साठी असणाऱ्या भावना मर्यादित करून माध्यमातून माहिती घेणे हेच योग्य ठरेल 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?