कर्तारपूर गुरुद्वारा,कलम 370 समस्येची अप्रकाशित बाजू

सध्या भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रद्द केलेल्या भारतीय संविधानातील कलम 370आणि कलम 35A ची जोरदार चर्चा सुरु आहे .  या  सर्व  चर्चांमध्ये  मुख्यतः जोर आहे तो काश्मीरमधील भविष्यकालीन विकास आणिरद्द करण्यात आलेल्या कलमाबाबत असणारी पाकिस्तानची भूमिका  . पाकिस्तानच्या विचार करता आपल्या भारतात फक्त व्यापारी संबंध  आणि क्रीडा संबंध लक्षात घेतले जातात. मात्र भारत आणि पाकिस्तान यांचा विचार करता या दोन  बाबींबरोबरच अजून एक गोष्ट लक्षात घेण्यास हवी मात्र ती काहीशी दुर्लक्षली जाते ती म्हणजे या दोन देशामध्ये संयुक्तरित्या सुरु असणारे विकास प्रकल्प .  या विकास प्रकल्पामध्ये कर्तारपूर या पाकिस्तानातील पंजाबमध्ये असणाऱ्या गावामध्ये उभारण्यात येणारा कर्तारपूर साहिब गुरुद्वारा आणि भारतीय हद्द या दरम्यान उभारण्यात येणार कर्तारपूर कौरीडॉर हा अत्यंत महत्वाचा आहे
         शीख बांधवांचे पहिले गुरु , गुरु नानकदेवजी यांच्या आयुष्याची अखेरची वर्षे ज्या गुरुद्वारात गेली तो गुरुद्वारा  म्हणजे कर्तारपूर येथील कर्तारपूर साहीब हा गुरुद्वारा . शीख बांधवांत पवित्र मनाला जातो . भारत पाकिस्तान सीमेपासून  हा गुरुद्वारा हाकेच्या अंतरावर  पाकिस्तानच्या हद्दीत आहे   भारताच्या फाळणीपासून शीख बांधवाना त्याचे  भारतीय हद्दीतून दुर्बिणीतून दर्शन  करून आपले समाधान करावे लागत होते .
येत्या नोव्हेंबर महिन्यात शीख बांधवांचे पहिले गुरु गुरु नानकदेवजी यांच्या ५५० व्य जयंती निमित्य आणि भारत पाकिस्तान दरम्यान असणाऱ्या संबंधात सुधारणा व्हाव्यात या हेतूने काही अटीवर शीख बांधवना या गुरुद्वारात प्रवेश देण्याबाबत दोन्ही केंद्र सरकार मध्ये बोलणी चालू होती . त्याला आता खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे .
या प्रकल्पातर्गत रावी नदी पात्रात दोन्ही देशांकडून पूल उभारणी आणि  रस्त्याचे कार्य हाती घेण्यात आले होते  त्याला अखेर काश्मीर मधील निर्ययामुळे विराम लागला आपण खालील  चित्रात त्यांचा नकाशा बघू शकतात
. भारत पाक संबंध पूर्ववत होऊन शीख बांधवाना थोडे उशिरा का होईना पण या कर्तारपूर साहिब गुरुद्वारात प्रवेश करता येण्यासारखी परिस्थिती निर्माण होवो अशी इच्छा विकत करून सध्यापुरते थांबतो ते पुन्हा भेटण्यासाठी  तो पर्यंत नमस्कार /

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?