देशविरहित लोक ..........

                   आपल्या महाराष्ट्रात विविध राजकीय नेते कोणत्या पक्षात जाणार ? याविषयीच्या बातम्या माध्यमांमध्ये हिरहिरीने दिल्या जात असताना,  देशाच्या एका टोकाला असणाऱ्या आसाम या राज्यात वेगळेच नाट्य रंगत आहे. प्रामुख्याने  बांगलादेशी घुसखोरांवर अंकुष ठेवण्यात येऊन गैरमार्गाने भारतात आलेल्या व्यक्तींना त्यांच्या देशात पाठवणे सोईचे व्हावे , या हेतूने  मूळ नागरिकांची ओळख  होण्याच्या दृष्टीने राबवण्यात आलेल्या " नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप " या यादीत  सुमारे १९ लाख व्यक्तींची नावे  नसल्याने वेगळाच गोंधळ बघावयास मिळत आहे .
                         ही यादी सुधारित आहे . सुमारे सहा वर्षे सरकारी यंत्रणांनी खपून ही यादी तयार केली आहे . या पूर्वी तयार केलेल्या यादीमध्ये सुमारे ४० लाख लोकांची नवे यादीतून वगळण्यात आली होती . त्यावर प्रचंड वादंग उठल्यावर हि सुधारित यादी तयार  करण्यात आली आहे . मात्र तिच्यातही प्रचंड चुका असल्याचा आरोप
करण्यात येतोय . लष्करात आणि आसाम पोलीस दलात अनेक वर्षे सेवा बजवाल्यांची तसेच अनेक ज्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीची नावे यातून गहाळ झाली आहेत . यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाणून बुजून बंगाली भाषिक जनतेची नवे यातून वगळली असल्याचा आरोप केला आहे . तर एका विशिष्ट धर्मियांची नवे यातून वगळली असल्याचा आरोप सुद्धा यावर केला जातोय  ह्या व्यक्ती ज्या देशातील असण्याचा आरोप केला जात आहे . त्या बांगलादेशने ह्या व्यक्ती आमच्या नसल्याने आम्ही त्यांना स्वीकारणार नाही असे उत्तर दिले आहे
      या व्यक्तींना आता परदेश प्राधिकरणाकडे आपले नागरिकत्व सिद्ध करावे लागेल . त्यानंतर त्यांना आसाम उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मुभा देण्यात आली आहे . त्यानंतर त्यांच्या विरुद्ध कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे . या साठी १२० दिवसांचे बंधन त्यांच्यावर
घालण्यात आले आहे .
 या मुद्याचे अनेक परिणाम होणार आहेत , ज्यामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय परिणाम सुद्धा आहेत . त्यामुळे या मुद्याकडे आपण सर्वांचेच लक्ष असणे आवश्यक आहे . आसाम मधील समाजाचा समतोल या मुळे  पूर्णतः ढवळून निघतोय . आसाम आपल्या भारतासाठी अत्यंत महत्वाचे राज्य आहे . देशातील सर्वात मोठा नैसर्गिक इंधनाचा साठा या प्रदेशात आहे . सप्तभगिनी  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यात देशाच्या मुख्य भूमीतून जायचे असल्यास आसाम शिवाय तरणोपाय नाही . त्याचा प्रमाणे अन्य देशांच्या सिमारेषा सुद्धा या प्रदेशात जवळ येतात . त्याच परीपेक्षातून याकडे बघायला हवे . अन्यथा येणार काळ आपणास माफ करणार नाही हेच खरे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?