ग्रॅण्डमास्टरांची पासष्टी


                                                              गेल्या आठवड्यात आपण सर्व जण विधानसभेच्या निवडणुकीच्या बातम्यांच्या  गदारोळात हरवून गेलो असताना,  भारतीय क्रीडा विश्वात एका नव्या ताऱ्याचा जन्म होत होता ,  आणि हा तारा महाराष्ट्राच्या भूमीत
जन्मला येत  होता हे विशेष . जगातील नवव्या  क्रमांकाच्या सर्वात तरुण बुद्धिबळ ग्रॅण्डमास्टरच्या रूपात हा तारा उदयास येत होता . रौनक साधुवाणी हे त्या ताऱ्याचे नाव . रौनक भारताचा ६५ वा ग्रँड मास्टर आहे . १३ वर्ष ९ महिने आणि २६ दिवसाचे असताना त्याने हा पराक्रम केला आहे . भारतीय युद्धकलेच्या पाश्वभूमीवर आधारलेला, भारतीय लोकांनी शोधलेल्या या खेळावर आता आता पर्यंत रशियन खेळाडूंचे वर्चस्व होते . ते मोडीत काढत आता अनेक भारतीय खेळाडू मोठ्या जोमाने पुढे येत आहेत . रौनक साधुवाणी हा त्या नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करतो . रौनक नागपूरच्या सेंट्रल पॉईंट या शाळेत शिकतो . Isle of man –United Kingdom या बुद्धिबळ विश्वातील अवघड  समजल्या जाणाऱ्या काही स्पर्धांपैकी एक असणाऱ्या स्पर्धेत ११ व्या  डावात त्याने हि कामगिरी केली . ही स्पर्धा १० ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर येथे पार पडली .  
       त्याला या स्पर्धेत सहजा सहजी प्रवेश मिळाला नाही . या स्पर्धेत त्याला मोठया कष्टाने प्रवेश मिळाला. मात्र असे असूनही भारतीय माध्यमांनी सोडा मराठी माध्यमांनी देखील याची यथोचित दखल घेतलेली नाही . काय हे दुर्दैव .याचा दरम्यान  भारताची आपल्या देशात एका संघाबरोबर क्रिकेट  कसोटी  मालिका खेळवण्यात अली . त्याची दाखल अधिक घेतली घेतल्याचे  माझे निरीक्षण आहे .  भारतीय माध्यमांना  अश्या गोष्टीला महत्व देण्याची सुबुद्धी येवो , आणि आता ६५ पर्यत आलेली बुद्धिबळ ग्रॅण्डमास्टरांची संख्या लवकरात लवकर १०० होवो ही मनोकामना व्यक्त करून सध्यापुरते थांबतो , ते पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यंत नमस्कार . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?