जरा अन्यांचा आदर्श घ्यावा

                      आताच टीव्हीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या दरात दिवाळीनिमित्य वाढ करण्यात आल्याची बातमी बघितली,  आणि मला २०१६ साली  याच दिवाळीच्या कालावधीत तेलंगणा राज्य परिवहनाच्या  बसने  आरक्षण करून पुणे ते सोलापूर या  दरम्यान केलेल्या प्रवासाची आठवण झाली , मी त्याआधीही आरक्षण करून सदर मार्गावर प्रवास केला होता  , जो कमी गर्दीच्या कालावधीत केला होता . आणि दुसऱ्यांदा करत असलेला प्रवास हा गर्दीच्या कालावधीत केलेला होता . या दोन्ही प्रवसांदरम्यान मला आढळलेल्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठी मी आजचे लेखन करत आहे .
या दोन्ही प्रवासनादरम्यान मला आढळलेली गोष्ट म्हणजे दोन्ही प्रवास दरम्यान पुणे सोलापूर या दरम्यानचे भाडे सारखेच होते . जे त्या वेळच्या महाराष्ट्र्र राज्य परिवहन महामंडळाच्या त्याच दर्जाच्या बसेसच्या  कमीत कमी भाड्यापेक्षा तब्बल ४० रुपये कमी होते .  मात्र दोन्ही वेळेस मला आकारण्यात येणाऱ्या आरक्षण शुल्कात तब्बल ६६ टक्क्यांचा फरक होता . कमी  गर्दीच्या कालावधीत माझ्याकडून आरक्षण शुल्कापोटी १२ रुपये आकारण्यात आले होते . तर दिवाळी सणाच्या दरम्यान माझ्याकडून तब्बल २० रुपये आकारण्यात आले होते .
मला त्यानंतर सारखे वाटत आले आहे की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अश्या प्रकारची छुपी वाढ करण्यास काम हरकत आहे  ?  प्रत्यक्ष वाढ केल्याने हि वाढ चटकन लक्षात येते , मात्र अशी दरवाढ सहजपणे लक्षात येत नाही ,  आणि काही अपवाद वगळता या सणाच्या कालावधीत बहुतेक प्रवाशी त्यांच्या प्रवास हा आरक्षण करूनच करत असतात . त्यामुळे अश्या छुप्या दरवाढीने महामंडळाला कित्येक पटीने उत्पन्न मिळू शकते . तरी उत्पन्न वाढीसाठी आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अश्या गोष्टी करणे अत्यावश्यक आहे . कारण ठकासी व्हावे ठक, महा ठकासी महाठक हेच त्रिकालाबाधित सत्य आहे. अन्य राज्य महामंडळे अश्या प्रकारे उत्पन्न वाढवत असताना महामंडळाने का मागे राहावे ?  आपणास काय वाटते ? या विषयावर खूप काही बोलण्यासाखे आहे . मात्र तूर्तास इथेच थांबतो ते पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यंत नमस्कार . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?