मावळत्या नामला अर्ध्य जोडुनी दोन्ही करा

         
                                    आपल्या मराठीमध्ये "मावळत्या दिनकरा  अर्ध्य  जोडुनी दोन्ही करा " अशी इंदोरचे  राजकवी भा. रा. तांबे याची एक अजरामर कविता आहे  ज्यात मनुष्याच्या पडत्या काळात जग अश्या माणसाला सोडून जाते .त्याचे सखे  सोयरे देखील त्याला विसरतात . जग नेहमी विजेत्याबरोबर असते अशा संदेश दिला आहे  . हे सर्व  लिहीण्याचे कारण म्हणजे ज्या  आंतराष्ट्रीय संघटनेला भारताने जन्म दिला त्या नामकडे सध्या भारताने केलेले दुर्लक्ष . नामची १८वी  परिषद  आशिया आणि युरोप खंडाच्या सीमेवर असणाऱ्या अझरबेकिस्तान या देशाच्या राजधानीत अर्थात बाकु या शहरात  २५ आणि २६  ऑक्टोबर रोजी  झाली . मात्र त्याची म्हणावी अशी चर्चा भारतीय माध्यमामध्ये  झाली नाही .  भारतातर्फे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी यास उपस्थिती लावली . नामच्या सलग दुसऱ्या परिषदेत भारतातर्फे उपराष्ट्रपती यांनी हजेरी लावली . मात्र या परिषदेला अन्य राष्ट्रांचे प्रमुख , पंतप्रधान यांनी हजेरी लावली . एका प्रकारे भारताला आता नामची आवश्यकता नाही अशाच संदेश यातून जगाला देण्यात आला  या परिषदेत बदलते हवामान , दहशतवाद आदी संकटांचा मुकाबला करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर विचार मंथन करण्यात आले . मात्र  कोणत्याही ठोस उपाय योजना न ठरवता हि परिषद  झाली
                             भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्यावेळी अस्तित्वात असणाऱ्या महासत्तांच्या  परस्पर
सत्तासंघर्षांत न पडता दोन्ही महासत्तांपासून समान अंतर ठेवून नव स्वातंत्र्य मिळालेल्या राष्ट्रांनी परस्पर सहकार्याच्या मदतीने विकास करावा या हेतूने याची स्थापना करण्यात आली होती . नामची स्थापना करण्यामध्ये भारताचे योगदान मोठे होते . मात्र कालांतराने भारताचा या संघटनेतील उत्साह कमी होत गेला . आज भारत स्वतः एक महासत्ता म्हणून उदयास येत आहे .त्यामुळे जागतिक   राजकारणामध्ये भारत  आपले स्थान मजबूत करण्याबाबत आग्रही आहे . सबब आपणच जन्मला घातलेल्या संघटनेकडे भारताचे दुर्लक्ष होत आहे. 
                काही जण १९९० साली शीतयुद्ध संपून युनाटेड सोशालिस्ट सेव्हियत रशियाचा पाडाव होऊन युनाटेड स्टेस्टस ऑफ अमेरिका हि एकमेव महासत्ता उरल्याने नामला सद्य स्थितीत संदर्भ उरला नसल्याचे सांगतील . मात्र मला ते अमान्य आहे . आजच्या काळातही नामचे महत्व कमी झालेले नाही किंबहुना आजच्या २०१९ च्या वेळी जग अनेक ध्रुवात विभागले जात असताना त्याचे महत्व कणभर का होईना वाढलेलच आहे . 
              मात्र अन्य गदारोळात व्यस्त  असणाऱ्या भारतीय माध्यमांनी या परिषदेकडे दुर्लक्ष केले हे अयोग्यच त्याचे समर्थन होऊच शकत नाही . भारतीय माध्यमे अश्या सारख्या परिषदेची यथोचित दाखल आगामी काळात घेतील अशी अशा व्यक्त करून सध्यापुरते थांबतो . नमस्कार 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?