बिगुल ४६ व्या अमेरिकी राष्ट्रपतींचे (भाग तिसरा )

                                           आपणास  महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाबाबत विविध बातम्या पारंपरिक  प्रसार माध्यमातून समजत असताना  भारतासारखीच प्रगल्भ लोकशाही असणाऱ्या युनाटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशातील अध्यक्षपदाच्या बाबतीत नाट्यमय घडामोडी घडत आहे . या घडामोडी सध्याचे राष्ट्राध्यक्ष असणाऱ्या  डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबत आणि पुढील राष्ट्राध्यक्षांबाबत देखील घडत आहे . मी या लेखमालेच्या पहिल्या भागातच सांगितल्याप्रमाणे मी डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी काहीही भाष्य करणार नाही . माझ्या आधीच्या लेखांच्या लिंक या लेखाच्या खाली आपणास मिळतील   
     
 या लेखमालेच्या दुसऱ्या भागात युनाटेड स्टेट्स ऑफ  अमेरिका या देशातील अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या चार टप्यापैकी पहिल्या दोन टप्यात काय काय घडते याची माहिती घेतली आता या  भागात तिसऱ्या आणि चोथ्या टप्यात काय घडते याची माहिती घेउया 
                 पहिल्या दोन टप्यात  पक्षातर्फे अध्यक्षपदाच्या उमेदवार ठरल्यानंतर ही  लढाई एका वेगळ्या उंचीवर पोहाचतें .  पक्षाचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात प्रचार करताना आपल्या भारतासारख्याच देशभर सभा घेऊन देश पिंजून काढतात . याच्या कळससाध्य केला जातो , तो म्हणजे उमेदवारांमध्ये होणारी आणि टीव्हीवर दाखवण्यात येणारी चर्चा होय . साधारतः या चर्चा एप्रिल ते ऑक्टोबर मध्ये होतात . कारण मार्चपर्यंत  कॉक्कस आणि प्रायमरी तसेच  नॅशनल कॅव्हसन   ( याचे पूर्ण स्पष्टीकरण दुसऱ्या भागात दिले आहे ) या चर्चा युनाटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेसह संपूर्ण जगात मोठ्या उत्सुकतेने बघितल्या जातात . या चर्चांमध्ये उमेदवारांच्या मतांचा अक्षरशः किस पडला जातो . या चर्चातून अमेरिकेतील जनतेचे जनमत तयार होते . ज्याचे प्रकटीकरण नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवार नंतर येणाऱ्या मंगळवारी मतदानातून होते 

अखेरचा टप्पा अर्थात निवडणुकीचा 
                          तिसऱ्या टप्प्यात जनमत तयार झाल्यावर अमेरिकन जनता मतदानाच्या दिवशी अमेरिकन नागरिक आपल्या मतदार संघातील  इलेक्टोर ला मत देतात . हे इलेक्टोर  अमेरिकेतील पक्षांचे प्रतिनिधीतीत्व करत असतात ज्या पक्षाचे सर्वात जास्त इलेक्टोर निवडून येतात त्या पक्षाचा उमेदवार पुढील राष्ट्राध्यक्ष बनतो . 
अमेरिकन निवडणुकीतील काही गमती जमती 
                        या इलेक्टरांची एक गंमत आहे . यांचे संख्याबळ हे राज्याच्या लोकसंख्येवर अवलूंबन असते . ज्या राज्याची लोकसंख्या जास्त त्याचे इलेक्टोर जास्त आणि ज्या राज्याची लोकसंख्या कमी त्याची  इलेक्टरची संख्या पण कमी संख्या  . इतपर्यंत यात खटकण्यासारखे काही नाही गंमत घडते ती मतदानाची मोजणी करताना . 
समजा एखाद्या राज्यात ३५ इलेक्टोर आहेत . त्यापैकी १८ इलेक्टर  डेमोक्रेटिक पक्षाचे आणि १७ रिपब्लिक पक्षाचे निवडून आले तरी या राज्यात डेमोक्रेटिक पक्षाचे जास्त संख्येने इलेक्टोर आले असल्याने सर्वांचा सर्व ३५ इलेक्टोर हे डेमोक्रेटिक पक्षाचे निवडून आले असे समजले जाईल २०१६ च्या निवडणुकीत याचा प्रणालीमुळे लोकांचे जनमत हिलरी क्लिंटन असून देखील मोजक्या राज्यात बहुमत असल्याने डोनाल्ड ट्रम्प निवडून आले . त्या लोकांच्या मताला पॉप्युलर वोटिंग असे म्हणतात . 
युनाटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे प्रत्यक्षातले मतदान  होण्यास अजून एक वर्षांचा कालावधी आहे . या दरम्यान अनेक घडामोडी घडतील . शक्य त्या घडामोडी तुम्हाला  देण्याचा माझा प्रयत्न असेलच . .तरी आता मी तुमची रजा घेतो , नमस्कार 

दुसऱ्या लेखाची लिंक 
http://ajinkyatarte.blogspot.com/2019/11/blog-post_47.html 
पहिल्या भागाची लिंक 
http://ajinkyatarte.blogspot.com/2019/11/blog-post_6.html

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?