गच्छंती डोनाल्ड ट्रम्प यांची

                                                                सध्या फक्त आपल्या भारतातातच नव्हे तर , समस्त जगभरात
मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत . ऑस्ट्रोलियाच्या पूर्व भागात  लागलेला वणवा असो , अथवा ब्राझीलच्या -लुला या माजी राष्ट्राध्यक्षाची कारागृहातून झालेली सुटका असो . अथवा २५ सप्टेंबरपासून सुरु झालेले डोनाल्ड ट्रम्प यांच्या  महाभियोगाचे नाट्य ही  त्यापैकी काही प्रातिनिधिक उदाहरणे . माझ्या मते यातील  या सर्व घडामोडीतील  सर्वात महत्तवाची घडामोड म्हणजे . डोनाल्ड ट्रूम्प यांच्यावर चालवण्यात येणार महाभियोग . जगातील सर्वात प्रबळ अश्या राष्ट्राचा प्रमुखांवर ते प्रमुखपद काढण्यासाठी चालवण्यात येणार खटला म्हणजे हा महाभियोग होय .
                                                                                                          या महाभियोग नाट्याची सुरवात होते
ती अमेरिकेतील संसदेच्या अर्थात अमेरिकी काँग्रेसच्या द्वितीय सभागृहाला म्हणजेच हाऊस ऑफ रिपेझेंटिव्ह ( आपल्या भारतातील लोकसभा समकक्ष ) एका पत्राने . हे पत्र कोणी पाठवले हे अद्याप उघड झालेले नाही . या पत्रात सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून असणाऱ्या अधिकाराचा  दुरोपयोग करत ३ नोव्हेंबर २०२० ला होणाऱ्या आगामी राष्ट्राध्यक्ष पदाचे डेमोक्रेटिक  पक्षाचे संभाव्य उमेदवार जे  बराक ओबामा यांच्या काळात उपराष्ट्रपती होते असे जो बाइंडन यांचा राजकीय प्रवास अवघड व्हावा यासाठी युक्रेनच्या पंतप्रधानांवर  दबाव आणणारा फोन केला होता .असा आरोप करण्यात आला होता . हाऊस ऑफ रिप्रेझंटिव्हच्या अध्यक्ष्या Nancy Pelosi   ज्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील पक्ष असणाऱ्या डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्या आहेत . त्यांनी याची गंभीर दखल
घेत हे प्रकरण अमेरिकन संविधानाच्या कलम २ च्या  उपकलम ४ नुसार राष्ट्राध्यक्षांच्या महाभियोगास पात्र आहे अशा निर्वाळा दिला आणि येथून या नाट्याला सुरवात झाली   अमेरिकन संविधानानुसार हाऊस ऑफ रिप्रेझेन्टिव्हमध्ये सध्या बहुमताने पास झालेल्या या ठरावाची चौकशी सिनेट ( आपल्या भारताच्या राज्यसभा समकक्ष ) करेल . जर यामध्ये २/३ बहुमताने त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले तर ट्रम्प याची खुर्ची जाईल . सिनेटच्या चौकशीत अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या सहभाग असणारी समिती असेल
                          ४३५ सदस्य असणाऱ्या हाऊस ऑफ रिप्रेंझिटिव्ह मध्ये डोनाल्ड ट्रूम्प यांच्या पक्षाचे १९९ सदस्य आहेत , तर विरोधी डेमोक्रेटिक पक्षाचे २३२ आणि डेमोक्रेटिक पक्षाला अनुकूल धोरण घेणारे ३ अपक्ष सदस्य आहेत  . याउलट १०० सदस्य असणाऱ्या सिनेटमध्ये ४५ डेमोक्रेटिक तर रिपब्लिक पक्षाचे ५५ सदस्य आहेत . त्यामुळे सिनेटमध्ये काय होणार? यावरच या प्रस्तावाचे भवितव्य आहे . नाहीतर या आधी रिचर्ड निक्सन यांचा अपवाद वगळता  अन्य तीन राष्ट्रयध्यक्षांविरुध्द् जसा प्रस्तव बारगळला तसेच यांच्या समवेत होऊ शकते .हा मजकूर लिहीत असताना म्हणजेच १० नोव्हेंबर२०१९ ला सिनेटची  चौकशी सुरु आहे .
३ नोव्हेंबर०२०२० ला होणाऱ्या अमेरिकी  राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हा मुदा कशा रंग भरतो हे बघणे उत्सुकतेचे ठरेल ,


            

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?