आदरांजली एक मराठमोळ्या विज्ञान वेड्याला

   
                            मला आज सकाळी खगोलशास्त्राची रुची असलेल्या एका मित्राचा फोन आला, त्याने सांगितले अरे मोहन आपटे सर गेले . मी सुन्नच झालो . मोहन आपटे सर म्हणजे मराठीत विज्ञानविषयक  लेखन करणाऱ्या व्यक्तींपकी  एक  मह्त्वाचे नाव .  सध्याच्या काळातील  हाताच्या बोटावर मोजता येईल , अश्या मराठीतून  विज्ञान विषयक  लेखन करणाऱ्या व्यक्तीपैकी एक .  माझा आणि त्यांचा संपर्क प्रत्यक्ष जरी नसला  तरी त्यांची अनेक पुस्तके मी वाचली आहेत , त्या अर्थाने एक वाचक आणि लेखन म्हणून आमचा खूप चांगला संबंध होता .
                         संस्कृतप्रचुर समजण्यास कठीण  अश्या मराठीतील विज्ञान लेखनास त्यांनी सर्वसामान्य लोकांना समजेल अश्या पद्धतीने आकृतिबद्ध केले . त्यांच्या विज्ञानाच्या विविध शाखेतील  शास्त्राची माहिती देणारी मला उत्तर हवंय , ही  पुस्तकमाला खूप गाजली . किंबहुना त्यामुळेच हे घराघरात पोहोचले . सहज सोपी भाषा , प्रश्नोत्तरांचा स्वरूपातील पुस्तकांची भाषा यामुळे ही सर्वच पुस्तके गाजली . 
                               त्यांनी निव्वळ विज्ञान विषयक लेखन केले असे नाही तर विज्ञान लोकप्रिय करणाऱ्या  अनेक संस्थांना पाठबळ सुद्धा दिले . मुंबई येथील खगोल मंडळ संस्था हे त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल . त्यांचा अकस्मित जाण्याने मराठी साहित्य विश्वाचे अतोनात नुकसान झाले आहेच , त्याच बरोबरीने भारतीय विज्ञान क्षेत्राचे देखील कधीही भरून ना येणारे नुकसान झाले आहे . 
                 सध्याचा काळात विज्ञानात अनेक क्रांतिकारी शोध लागत असताना त्यामागच्या संकल्पना सर्व सामान्यांना त्यांच्या भाषेत समजून सांगणारा दुवा त्यांचा निधनाने गळून पडला आहे . .सध्या मराठीमध्ये  डॉक्टर जयंत नारळीकर , श्रीनिवास पाटील आदी हाताच्या बोटाच्या मोजता येतील इतक्याच व्यक्ती सर्वसामान्यांना मराठीत विज्ञान समजावून देण्यास उपलब्ध असताना त्याने निधन चटका लावून जाणारेच आहे .  महाराष्ट्रीयन माणसाची झालेली  ही पोकळी भरून न  येणारी आहे , अन्य विज्ञान लेखकांना  उदंड आयष्य मिळो ही  सदिच्छा व्यक्त करून सध्यापुरते  थांबतो , नमस्कार . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?