अजून किती अपघात बळी ?

                           आज  दुपारी सहज व्हॉट्सअप बघता असताना एका गृपवर एक बातमी बघितली, आणि  काही क्षण काहीच सुचेना . नाशिकच्या सुप्रसिधद गायिकेच्या मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अपघाती मृत्यूची ती बातमी होती . रस्त्यावरील एका कुत्र्याला वाचवण्याच्या नादात त्याची कार  रस्त्यावर थांबलेल्या एका टँकरवर आदळून सदर अपघात झाला होता . काही वर्षांपूर्वी स्वतःच्या लग्नासाठी मुंबईहून नाशिकला येणाऱ्या एका पत्रकाराचा अश्याच एका ट्रकमुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची त्यामुळे मला चटकन आठवण झाली . मी स्वतः  नाशिक ते पुणे अनेकदा  प्रवास करतो .त्या दरम्यान मी सुद्धा अनेकदा  बघतो की  , ऊस हंगाम सुरु झाल्यावर अनेक ट्रक अत्यंत  धोकादायक स्थितीत चालवले जातात . मात्र त्यावर वाहतूक खाते काहीच कार्यवाही करत नाही . अवजड माल वाहतूक धोकादायक परिस्थितीत करायलाच पाहिजे, अशा नियम आपल्या भारतात असावा  का ? असे मला यातून वाटते .
                 मी कोकण रेल्वेने अनेकदा प्रवास केला आहे , तेव्हा प्रवासात मला अनेकदा मालट्रक रेल्वे वॅगनवर चढवून त्यांची वाहतूक केली जात असल्याचे बघितले आहे . हा प्रकार अन्य ठिकाणी होतं असल्याचे मी तरी कुठे ऐकलेले नाही , अश्या प्रकारच्या उपाय योजनांनी मालवाहतूक काही प्रमाणात कमी  धोकादायक होऊ शकते . मला माहिती आहे की , भारतात रस्त्यापेक्षा रेल्वेचे जाळे काही प्रमाणात कमी आहे . मात्र शक्यतो त्या
ठिकणी हा उपाय राबवायला काय हरकत आहे ?
                                      काही जण माझ्या हेल्मेट वापरासंबंधीच्या मताचा दाखला देत मला पहिले वाहतुकीचे नियम पाळण्याचा सल्ला देतील , त्यांना मी सांगू  इच्छतो की   , भारतातील रस्त्यावरील अडथळे  दूर केले तर हेल्मेट वापरण्याचे काहीच कारण  नाही . रस्त्यावरील धोकादायक वाहतूक कमी करणे हे भारतातील रस्त्यावरील अडथळे दूर करण्याच्या प्रक्रियेतील मैलाचा दगड ठरेल यात शंका आंही .
              जाताजाता रस्त्यावरील अपघात मृत्युमुखी पडलेल्या जीवांना श्रद्धांजली वाहून असे मृत्यू कमी होवोत अशी ईश्वराचरणी प्रार्थना करून थांबतो , नमस्कार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?