या लोंढ्याना आवरायला हवे (भाग २ )

                                                                         मित्रानो गेल्या  काही कालावधीत मी दोनदा नाशिक ते सुरत या दरम्यान प्रवास केला . या प्रवासादरम्यान मला आपली महाराष्ट्राची एसटी आणि अन्य राज्याची एसटी या दरम्यान काही फरक आढळले . ते तुम्हाला सांगण्यासाठी आजचे लेखन . या लेखमालेतील हा दुसरा भाग , तुम्ही पहिला भाग या लेखाच्या शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करून बघू शकता . 
                                      मला आढळलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अन्य राज्याच्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस महाराष्ट्रात येण्याचे  अति प्रचंडप्रमाण आणि त्या तुलनेत आपल्या एसटी बसेस अन्य राज्यात जाण्याचे नगण्य प्रमाण . आपण रात्री पुण्याच्या स्वारगेटवर  बघा पुण्याहून कोल्हापूरला जाणाऱ्या आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसपेक्षा कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस अधिक असतात . तीच गोष्ट  नाशिकच्या संदर्भात बोलायचे झाल्यास गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बाबत बोलता येईल . रात्री सव्वा आठ ते पावणे नऊ या अर्धा तासात नाशिकहुन सुरतला जाण्यासाठी गुजरातच्या ४ गाड्या उपलब्ध असतात . या उलट सादर कालावधीत महाराष्ट्राची फक्त एकच गाडी या मार्गावर असते .ज्या अर्थी गुजरात या मार्गावर सदर कालावधीत चार गाड्या चालवते , त्याअर्थी या दरम्यान या मार्गावर प्रवाशी संख्या असतेच .  मग सदर कालावधीत या कालावधीत MSRTC च्या अधिक बस का चालवल्या जात नाहीत ?  
                                                                                                  या आधी मी एकदा सुरत ते मुंबई सेंट्रल या मार्गावर दुपारी प्रवास केला होता  .सदर ६ ते ७
तासाच्या बस प्रवाश्यात मला रस्त्यावर एकही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस दिसली नाही सर्वत्र गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा दिसत होत्या . या मार्गावर आपले महामंडळ बसेस का चालवत नाही . या लेखाच्या संदर्भात मी इंटरनेटवर अधिक माहिती घेतली असता मला समजले की , गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस या यवतमाळ पर्यंत चालवल्या जातात . आता ज्याला महाराष्ट्राचा नकाशा माहिती आहे त्याला ही गोष्ट सहज लक्षात येईल की , गुजरातच्या गाड्या किती आतपर्यंत आलेल्या आहेत .  एकवेळ आपण खाजगी बस चालकांना एसटी बस स्थानकाच्या बाहेर ५०० मीटरवर नेऊ शकतो . मात्र अन्य राज्यांच्या परिवहन महा मंडळाच्या बसेस या आपल्या मालकीच्या जागेत आपल्या  बसेसच्या शेजारी स्वतःची बस उभी करून महाराष्ट्रात आपला व्यवसाय करतात . त्यांनी महाराष्ट्र एसटीला घरातच स्पर्धक निर्माण केला आहे . या अन्य राज्याच्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बाबत योग्य असे धोरण आखणे हे अत्यंत गरजेचे आहे . नाहीतर या अन्य राज्यातील एसटी आपल्या महाराष्ट्राच्या एसटीला एक दिवस गाशा गुंडाळायला भाग पडू शकतात .हे टाळण्यासाठी योग्य पाऊले आपले राज्यकर्ते उचलतील अशी आशा व्यक्त करून सध्यापुरते थांबतो . 
या लेख्याच्या पहिल्या भागाची लिंक 
https://ajinkyatarte.blogspot.com/2019/10/blog-post_90.html

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?