जरा याद करो उनको, जो लोटके घर ना आये

                                   आपल्या भारताच्या इतिहासाकडे एक नजर टाकली असता  स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत अनेक भळभळत्या जखमा झालेल्या आपणस सहज दिसतात . आजपासून 11 वर्षपूर्वी झालेली मुंबईवरील दहशतवादी हल्याची जखम त्यापैकीच एक . पाकपुरस्कृत दहशवादी संघटना लष्करे ए तैयबाच्या 10 दहशतवाद्यांनी दक्षिण मुंबईत 6 ठिकाणी सलग 4 दिवस दहशतवाद्यांनी हल्ला केला .यामध्ये अजमल कसाब या एका दशवाद्याला आपल्या शूर सुरक्षा दलांनी पकडले . बाकीचे दहशतवादी या हल्यात मारले गेले . यामध्ये निष्पाप 165  मृत्युमुखी पडले , ज्यात भारतीयांसह अन्य देशांचे नागरिक देखील होते . तर 302 जायबंदी झाले . आज 2019 साली या हल्ल्याला 11 वर्षे पूर्ण होताना या हल्यात शहीद झालेल्या आपल्या वीरांना आणि निष्पाप  नागरिकांना माझ्यातर्फे भावपूर्ण आदरांजली
                      मुंबईवर 1993साली झालेल्या साखळी  बाम्बस्फोटानंतर  झालेल्या अनेक दहशतवादी घटनांमध्ये ही घटना खूपच विध्वंस करणारी होती . या घटनेमध्ये  अमेरिकी नागरिक डेव्हिड हेडली यांच्यासह अनेक पाकिस्तानी नागरिक असलेल्या दहशतवाद्यांच्या समावेश होता . त्यानंतर खटला चालवून या हल्यात जिवंत पकडलेल्या एकमेव दहशतवादी अजमल कसाबला फासावर चढवण्यात आले . 
             या हल्ल्यानंतर  देशांतर्गत  सरंक्षण सज्यता अधिक भक्कम करण्यात आली, ज्यामध्ये दहशतविरोधी
कायदा अधिक करणे . भारताची समुद्री संरक्षणाची  फळी त्रिस्तरीय करणे  मुंबईसाठी स्वतंत्रब्लॅक कमांडोंची निर्मिती करणे आदी अनेक पाऊले उचलण्यात  आली त्याच बरोबरीने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय राजकारणात एकटे पाडून त्याचा खरा चेहरा जगासमोर आणण्याचे कामही यावेळी करण्यात आले  . मात्र एवढे  होऊन सुद्धा  या हल्याचे मुख्य सूत्रधार पाकिस्तानात मुक्तपणे फिरत आहे . त्यांच्यावर कार्यवाही होऊन जेव्हा ते यश भूतलावरून निरोप घेतील तेव्हाच या हल्यात मृत्युमुखी पडलेल्या जीवांना खऱ्या अर्थाने सद्गती लाभेल हि वेळ लवकरात लवकर येवो अशी अपेक्षा व्यक्त करून सध्यापुरतो थांबतो .नमस्कार .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?