कालापाणी : भारत नेपाळ संबंधातील मिठाचा नवा खडा

                                          सध्या समस्त मराठी वृत्तवाहिन्यांबरोबरच हिंदी आणि भारतीय माध्यमसमूहाच्या इंग्रजी वृत्तवाहिन्या महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी माहितीचा रतीब टाकत असताना आपल्या भारताच्या शेजारी असणाऱ्या नेपाळ बरोबर आपला सीमावाद सुरु झाला आहे . आणि या वादाला कारणीभूत ठरला आहे एक नकाशा . 5 ऑगस्टला जम्मू काश्मीर आणि लडाख वेगळे केल्यावर त्यांची सीमा ठरवणारा नकाशा भारताने 2 नोव्हेंबर 2019 ला प्रसिद्ध केला, आणि हाच नकाशा भारताच्या आणि नेपाळच्या बाबतीत वादाचा विषय ठरला आहे . नेपाळच्या  हद्दीतील कालापाणी भारताने स्वतःच्या क्षेत्रात दाखवले आहे, अशा आरोप नेपाळने 6 नोव्हेंबर 2019मध्ये पत्रकार परिषद घेऊन केला आहे .   त्याला  भारताने कडाडून विरोध केला आहे . भारताच्या सीमाविषयक नकाश्यात काहीच बदल करण्यात आलेला नाही . फक्त काश्मीर चा नकाशा बदलल्याने त्याचाच नकाशा बदलला आहे  . जेव्हा भारतात कोणतेही नवीन राज्य , जिल्हा निर्माण होतॊ त्यावेळी भारताच्या सरकारतर्फे दरवेळी नकाशा प्रकाशित करण्यात येतो , त्याचचा भाग म्हणून सदर नकाशा प्रकाशित करण्यात आल्याचा दावा भारताने केला आहे  .                        
                   आपण शेजारील चित्रात त्याचा नकाशा बघू शकतात . भारताच्या सीमा ज्या ठिकाणी चीन आणि नेपाळ या दोन देशांनी लागतात. त्या ठिकाणी आहे कलापानी . भारताच्या मते सादर क्षेत्र भारताच्या उत्तराखंड राज्यातील पिठोरागढ या जिल्ह्यात येते . तर नेपाळच्या मते सदर क्षेत्र नेपाळच्या दारचुला जिल्यात येते . भारतस्वताच्या दाव्याचा  समर्थनासाठी  ब्रिटिश भारताच्या वेळी सन 1816 वेळी ब्रिटिश आणि नेपाळ यांच्यात झालेल्या कराराचा हवाला देण्यात आला आहे . ज्यामध्ये नेपाळची पश्चिम सीमा हि काली नदी पर्यंत असेल ( या काली नदीला महाकाली असेही म्हणतात ) असे नमूद करण्यात आले आहे मात्र कालानदी आणि तिच्या उपनद्या कोणत्या मानायचा याबाबत  दोन्ही देशात असहमती आहे  . सध्याचे वादाचे ठिकाण नेपाळ ज्या नदीला कालानदी मानतो त्याच्या पश्चिमेला आहे . त्यामुळे नेपाळच्या मते ते नेपाळच्या हद्दीत येते अशा नेपाळच्या दावा आहे . 
                           भारताच्या दृष्टीने कालापाणी हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहे . या ठिकाणापासून चीनची सीमा हाकेचा अंतरावर आहे . त्यामुळे चीनची घूसखोरी रोखण्यासाठी सदर क्षेत्र भारताच्या ताब्यात असणे आवश्यक आहे . सन १९६२ मध्ये चीनने आपल्यावर आक्रमण केल्यापासून भारताची एक चौकी या ठिकाणी आहे . 
                           सदर वाद शांततेने मिटावा भारताचे आणि नेपाळचे मैत्रीपूर्ण संबंध यामुळे बिघडू नयेत यासाठी दोन्ही सरकारे योग्य ती पाऊले उचलतील अशी अशा व्यक्त करून सध्यापुरते थांबतो , नमस्कार 

         


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?