ड्रॅगनच्या लष्करी सामर्थ्यावर नाटोत व्यक्त केली चिंता

                         मित्रानो, सध्या विविध घटनांची भारताचे विश्व ढवळून निघत असताना , जागतिक परिस्थितीचा विचार करताना सुद्धा अनेक महत्त्वाच्या घटना घडत असल्याचे आपणास अनुभवयाला येत आहे . नुकतीच लंडन येथे झालेली दोनदिवसीय 70 वी नाटोची  परिषद ही त्यापैकीच एक . दुसऱ्या महायुद्धानंतर युनाइटेड स्टेस्टस ऑफ अमेरिका या देशाच्या  नेतृत्वाखाली स्थापन झालेली लष्करी संघटना म्हणजे नाटो . ज्यामध्ये सध्या 29 सदस्य आहेत . या 29मध्ये बहुतांशी युरोपीय देश आहेत . नाटोच्या या परिषदेत अनेक विषयावर चर्चा झाली .त्यातील अत्यंत महत्तवाचा विषय ज्याचा आपल्या भारताशी सुद्धा संबंध आहे , तो म्हणजे चीनचे वाढते लष्करी सामर्थ्य . चीन यूएसए यांच्या व्यापार युद्धाच्या पाश्वभूमीवर चीनच्या लष्करी सामर्थ्यावर चर्चा होणे हे अत्यंत महत्वाचे आहे .
                      स्वामी विवेकांनद यांनी त्यांच्या  पहिल्या युनाटेड स्टेस्टस ऑफ अमेरिकेच्या दौऱ्याच्यावेळी चीनची ताकद ओळखली होती  . त्यांनी म्हंटले होते की   "चीन निद्रिस्त ड्रॅगन आहे , जेव्हा हा ड्रॅगन जागा होईल तेव्हा सगळ्या जगाची झोप उडवेल ". सध्याच्या चीनच्या कारवाया बघता चीनचा ड्रॅगन जागा  झाला आहे
           चीनच्या वाढत्या  लष्करी सामर्थ्यावर या नाटो अधिवेशनात  चिंता व्यक्त करण्यात आली . सध्या चीन जगात  युनाटेड स्टेस्टस ऑफ अमेरिका या दंशानंतर दुसऱ्या क्रमांकाचा सरंक्षणावर खर्च करणारा देश आहे . यांबाबत फ्रांसच्या पंतप्रधान  एडवर्ड फिलिपे  यांनी चिंता विकत करून यावर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली . त्यासाठी जर गरज पडली तर चीनला मदत करता असलेल्या रशियावर देखील कार्यवाही करण्यात कसूर करू नये अशा सर्वसाधारण सूर या वेळी व्यक्त करण्यात आला
                          चीन आपल्या सीमावर्ती प्रदेशात अधून मधून घुसखोरी करत आला आहे . त्यामुळे जग चीनकडे कोणत्या नजरेतून बघते हे बघणे अत्यावश्यक आहे . आपले केंद्र सरकार याविषयी आवश्यक ती पाऊले उचलत आहेच . आपण सरकारचे या बाबत हात बळकट केले पाहीजे . या विषयी खूप काही बोलता येऊ शकते , मात्र तुम्ही माझ्या पोस्टची वेळ बघत असलाचरात्र खूप झाली आहे . त्यामुळे थांबतो नमस्कार .



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?