मग हटवा कांदा जीवनावश्यकच्या यादीतून

                     सध्या सर्वत्र कांद्याच्या वाढत्या किमतीने उच्छाद मांडला आहे . कांद्याच्या वाढत्या किमतीमुळे लोकांच्या जेवणातून कांदा बाजूला पडला आहे .  संसदेमध्ये सुद्धा या विषयावर चर्चा झाली . त्यावेळेस उत्तर देताना एका महत्वाच्या खात्याच्या कॅबिनेट मंत्र्यांनी मी कांदा लसूण खात नाही . त्याच्यामुळे त्याचा वाढलेल्या किमतीमुळे माझ्यावर काहीच परिणाम होत नाही . माझ्यासारखे अनेक लोक या देशात आहेत . कांदा हा जीवनावश्यक वस्तू नाही " असे उद्गार काढले . जर संबंधित मंत्र्यांचे विधान खरे मानले  तर काही प्रश्न निर्माण होतात . त्याचा उहापोह करण्यासाठी आजचे लेखन .
               जर कांदा जीवनावश्यक वस्तू नसेल तर केंद्र सरकारतर्फे जीवनावश्यक वस्तूंचा यादीत कांद्याचा समावेश का करण्यात आला आहे ? कोणत्याही निवडणुकीपूर्वी कांद्यावर निर्यातबंदी का लादण्यात येते ? जर कांदा जीवनावश्यक वस्तू नसेल तर त्याची निर्यात करण्यावर शेतकऱ्यांवर विविध बंधने का हा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे . मित्रांनो जर शेतकऱ्यला जर कांदा परदेशात निर्यात करायचा असल्यास प्रचंड असे निर्यात मूल्य सरकारकडे भरावे लागते . परिणामी मिळणारा नफा कमी होऊन शेतकरी नाइलाजस्तव आपला कांदा भारतीय बाजारपेठेतच विकतो . जर कांदा जीवनावश्यक वस्तू नसेल तर प्रचंड प्रमाणात निर्यातमूल्य का ? असे एक ना अनेक प्रश्न या विधानामुळे निर्माण झाले आहेत .
          आपल्या संत परंपरेत 'कांदा मुळा  भाजी, अवघी विठाई माझी " असे एका अभंग आहे . कांद्याचे समाजजीवनातील स्थानच यामुळे अधोरेखित होते . अनेक निन्म आर्थिक स्तरावरील लोकांचे जेवण हे कांदा भाकरी बरोबर होते . ही गोष्ट विसरून चालणार नाही . कांद्यासाठी आपल्याकडे कांदानवमी या सणाची तरतूद करण्यात आली आहे . यावरून कांद्याचे आपल्या जीवनातील महत्व अधोरेखित होते . चातुर्मासात आपल्याकडे कांदा खाणे निषीद्ध समजले जाते . मात्र फार कमी लोकांचा अपवाद वगळता,  कोणीच आपल्या जीवनातून कांदा  पूर्णतः वगळत नाही . ही गोष्ट येथे विचारता घेणे अत्यवश्यक आहे . या विषयावर खूप काही बोलता येऊ शकते . मात्र तुम्ही माझ्या पोस्टची वेळ बघत असलाच . रात्र बरीच झाली आहे . त्यामुळे तूर्तास थांबतो , नमस्कार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?