मला भावलेले सुरत . (भाग 1)

                  केल्याने देशांतर  शहाणपण येते असे आपल्याकडे म्हणतात. . याच उक्तीला जागत  मी नुकताच  नाशिक- सुरत -भिवंडी आणि परत नाशिक  प्रवास केला त्याची ही कहाणी . 
                             माझा प्रवास सुरु झाला गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे सुरत बसने[ अर्थात बस जरी पुण्याहून सुरतला जाणारी असली तरी मी त्यात स्थानापन्न झालो ते नाशिकला] जी नाशिकहून पारंपरिक मार्गाने अर्थात दिंडोरी सापुतारा मार्गाने .  मी रविवार सुरत दर्शनासाठी निवडल्याने मला सुरतच्या  सुप्रसिद्ध हिरे आणि कापड बाजाराला दर्शनाला मुकावे लागले. असो जे होते ते चांगल्यासाठीच 
                                                      सुरतची पर्यस्थान स्थळे माहित नसल्याने मी शहर फिरण्याचा द्रूष्टीने शहर बस वाहतुकीचा मार्ग निवडला आणि मला धक्क्यावर धक्के बसायला सुरवात झाली , बसचे कंडक्टर आणि डायव्हर मराठी होते  त्यांच्याशी बोलताना समजले कि सुरत मध्य 50% गुजराती आहेत तर50% इतर आहेत इतरांपैकी सुमारे60% मराठी लोक आहेत . नंतर मला अनेक मराठी लोक भेटत गेले, मला भेटलेली बहुतांशी मराठी लोक कष्टकरी समजले जाणारे व्यवसाय करत होते. कॉलेज मध्ये असताना केलेल्या गुजरात दौऱ्याचा वेळी जाणवणारी गोष्ट मला सुरत मध्ये जाणवली नाहीं ,ती म्हणजे गुजराती पाट्यांचे प्राबल्य आणि इंग्रजी  आणि हिंदी वगैरे भाषांतील नगण्य पाट्या . मी हि गोष्ट सांगत आहे , अहमदाबाद, आनंद  आणि गांधीनगर परिसरातील  . मात्र न्यूज पेपर स्टॉल वर  गुजराती पेपरचेच प्राबल्य दिसले. असो ,  असेच एकदा इंदोर येथे गेलो असता मला त्या ठिकाणी आदल्या दिवसाचा लोकसत्ता विकायला पेपर स्टॉलवर दिसला होता . लोकसत्ता बरोबर बीड समाचार नावाचे एक मराठी साप्ताहिक मला त्या ठिकाणी दिसले होते . महाराष्ट्राच्या बाहेर ज्या ठिकाणी मराठी भाषिक  अधिक संख्येने वास्तव्यास आहेत . तेथील वृत्तपत्रांचा अभ्यास केल्यास अनेक रंजक बाबी दिसतील यात शंका नाही .
                     मी सुरतमध्ये त्यांचा समुद्रकिनारा अर्थात दुमस किनाऱ्याला भेट दिली.  किनारा खडकाळ असल्याने फारसा  सुरक्षित नाही , हे ओघाने आलेच . तशी पाटी सुद्धा त्या ठिकाणी बसवण्यात आली आहे . . मला सुरतच्या शहर वाहतुकीत जाणवलेली ठळक गोष्ट म्हणजे तेथील अत्यंत रुंद रस्ते . आणि उड्डाणपुलाचे विस्तीर्ण असे जाळे एकंदरीत तेथील वाहतूक बऱ्यापैकी सुस्थित आहे .अर्थात एका दोन दिवसांच्या वास्तव्यात संपूर्ण शहराचा आवाका लक्षात येणे तसे अवघडच आहे .सुरतला अनेक बगीचे उद्याने आहेत त्यामुळे सुरतची सायंकाळ पर्यटनासाठी विशेष महत्वाची आहे . सुरतला एक म्युझियम देखील आहे .
             माझ्याकडे बराच मोकळा वेळ असल्याने नाशिकला परत येण्यासाठी मी पारंपरिक सुरत -चिखली -वाजदा - सापुतारा - दिंडोरी नाशिक असा  मार्ग ना निवडता .सुरतेहून रस्तेमार्गे मुंबईला जाऊन तेथून नाशिकला येण्याचे ठरवले . मी त्यासाठी सुरत सेंट्रल बसस्टँड वरून  भिवंडी मार्गे मुंबई सेन्ट्रलला जाणाऱ्या गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या साध्या बसेसची निवड केली . बस मुंबई दिल्ली महामार्गावरून मार्गस्थ झाली . या  बस प्रवासात मला जाणवलेली एक विशेष गोष्ट म्हणजे . महामार्गालगतच्या प्रत्येक गावात एसटी चे जाणे . मी अनेकदा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या साध्य  बसने नाशिक ते पुणे बसने प्रवास करतो
. त्या दरम्यान मी बघतो , आपले एसटी बस कर्मचारी महामार्गावरील रस्ता सोडून अन्य गावात जाणे टाळतात  . आपल्या एसटी कर्मचाऱ्यांनी यातून योग्य तो बोध घ्यावा . असो . या रस्त्यावर मला जाणवलेली एक महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण प्रवासात मी खिडकीपाशी बसून होतो . मात्र एकही महाराष्ट्राची बस दिसली नाही . याबाबत सुरत मुंबई च्या वाहकाशी मी बोललो असतो त्याने सांगितले . या मार्गावर तुमच्या बसेस नसतातच . यावर फक्त आम्ही सेवा देतो . याकडे संबंधितांनी लक्ष देणे अत्यावश्यक आहे . ते देतील अशी अशा व्यक्त करतो .
                    मित्रानो या सुरत दौऱ्यात मला एक गोष्ट आढळली ती म्हणजे सुरत बस स्टॅण्डच्या आसपासच्या रात्री किँवा पहाटे पोहलचल्यास या  ठिकाणी खाद्यपदार्थाची  पुरेशी सोय नाहीये . बसस्टँडच्या इमारतीत एका उपहारगृह आहे . ते सोडल्यास समोरच्या रेल्वेस्थानकावर खाण्याची सोय होऊ होऊ शकते . बस स्थानकाच्या आसपास त्यावेळेस चहा देणारी अनेक दुकाने आहेत . मात्र खाण्याची सोय होण्यासाठी सकाळचे नऊ दहा होणे आवश्यक आहे . ती एक गैरसोय सोडल्यास सुरत शहर फिरण्यास अतिशय उत्तम आहे . मग जाताय ना सुरतला (क्रमशः )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?