मला भावलेले सुरत (भाग 2)

 
                                  मी सातत्याने नाशिक पुणे प्रवास करतो . रस्तेमार्गे होणाऱ्या कंटाळवाण्या प्रवासावर
तोडगा म्हणून मी पूर्वी विविध माध्यमे वापरत असे , ज्यामध्ये विविध प्रकारच्या आणि मालकीच्या  बसेसचा समावेश असे . असेच एका प्रयोगात मला गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे सुरत या बसचा शोध लागला . मला त्यांची आसनव्यवस्था महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि अन्य खाजगी बसेसपेक्षा अधीक  आरामदायी वाटल्याने आता मी शक्यतो नाशिक पुणे प्रवास याच बसने करतो . सातत्याने प्रवास केल्याने त्या बसच्या कर्मचाऱ्यांशी माझी मैत्री झाली आहे . त्यांच्या सततच्या आग्रहामुळे मी एकदा  त्या बसने सुरत प्रवास देखील केला त्याचे अनुभव तुम्ही या ब्लॉग च्या शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करून वाचू शकतात . त्याच प्रवासादरम्यान मला नाशिक सुरतच्या लोकप्रिय अश्या सापुतारा मार्गाबरोबर पेठ धरमपूर बलसाड  हा  मार्ग देखील माहिती झाला आणि माझी त्या मार्गाने सुरत पुन्हा एकदा बघण्याची उत्सुकता निर्माण झाली . माझे त्या प्रवासादरम्यानचे अनुभव आणि दुसऱ्यांदा आलेले सुरतचे  अनुभव सांगण्यासाठी आजचे लेखन 
   मी आधीचा प्रवास गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसने केला होता . तर सुरतच्या दुसऱ्या वेळेचा प्रवास मी नाशिकहून  अहमदाबादला  पेठ - धरमपूर- बलसाड मार्गे  जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या परिवर्तन प्रकारच्या बसने केला . मला मागच्या वेळेस सापुतारामार्गे साडेपाच तास लागले होते तर या वेळेस हाच प्रवास साडेचार तासात झाला . रात्रीचा सुरतच्या या आधीच अनुभव लक्षात घेता मी यावेळेस मी सुरतला पोहोचल्यावर सुरत रेल्वेस्थगनकावर माझा मोहरा वळवला . सुरत रेल्वे स्थानक अत्यंत सुबक पद्धतीने बांधण्यात आले आहे . नवी मुंबईतील रेल्वे स्थानकाप्रमाणे एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी भूमिगत रस्ते आहेत . पहाटे सहाला सुरत मधील शहर वाहतूक सेवा सुरु झाल्यावर मी मागच्या प्रमाणे शहर दर्शन सुरु केले . सुरत येथील बससेवेला SITI LINK  असे नाव आहे . मला नाशिक आणि पुण्याच्या तुलनेत भाडे काहीसे जास्त वाटले . सुरतला सध्या BRT चे बांधकाम सुरु आहे . तयार झालेल्या BRT मधून शहर बस वाहतुकीच्या बसेस सोडून अन्य वाहने जताना मला दिसली नाहीत .   मी जितके सुरत फिरलो तेव्हा विनाकारण नियम तोडून जाणारी वाहने मी बघितली नाही . अर्थात एक दोन दिवसावरून कोणत्याही शहराच्या विषयी काहीही भाष्य करणे धाडसाचे ठरेल याची मला जाणीव आहे .सुरत शहर बऱ्यापैकी स्वच्छ असल्याचे मला दिसले 
                           माझ्याकडे बऱ्यापैकी मोकळा वेळ असल्याने  मी मागच्या प्रमाणे सरळ सुरतहून नाशिकला येण्याच्या ऐवजी सुरतहून धुळे मार्गे येण्याचे ठरवले . त्या प्रमाणे मी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदाबाद धुळे या परिवर्तन बसेसने प्रवास केला . सुरतहून वडोदरा मार्गे गाडी सोनगढ या महाराष्ट्र गुजरात सीमेवरील गुजरात राज्यातील अखेरच्या गावात आली . आणि महाराष्ट्र शासनाचे सीमेवरील रस्त्याबाबाबतचे उदासिनत्व दिसण्यास सुरवात झाली . सोनगढ  ते धुळे हा राष्ट्रीय महामार्ग असला तरी रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे . आपण जणूकाही नांगरलेल्या शेतातून जात आहोत असा भास व्हावा अशी रस्त्याची अवस्था होती . नाशिकहून सुरतला येणाऱ्या  दोन्ही रस्त्यांची अवस्था देखील  महाराष्ट्रात अत्यंत वाईट आहे . नविन   सरकार त्यांची अआस्था सुधारण्यास हातभार  नक्कीच भरीव प्रयत्न करेल अशी आशा व्यक्त करून सध्यापुते थांबतो , नमस्कार
सुरतविषयी माझा आधीचा अनुभव वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?