घुसळणी इतिहासाची

       
                     लोकसभेमध्ये 9 डिसेंबर 2019 रोजी एका महत्त्वाच्या विधेयकावरील चर्चेत महत्त्वाच्या केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याने भारताच्या फाळणी संदर्भात काँग्रेस या राजकीय पक्षाला जबाबदार धरले आणि यावरून विविध चर्चेला उधाण फुटले . या चर्चेतील काही गोष्टी या वास्तव्याला धरून नव्हत्या . मी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या अभ्यास करत असताना याच्या अभ्यास केला होता . त्या अभ्यासानुसार भारताच्या फाळणीसाठी  काँग्रेसच्या  दुरान्वयेही संबंध नव्हता .तर अन्य पक्ष जवाबदार होता . चोर सोडून संन्याशाला फाशी अशाच प्रकार यावेळी घडला   त्यामुळे या मागची  पार्श्वभुमी जनतेसमोर येण्यासाठी आजचे लेखन .
                                             भारताच्या फाळणीची कथा मार्च 1940 च्या लाहोर येथील मुस्लिम लीगच्या अधिवेशनापासून सुरु होते . माझ्या मते भारताच्या फाळणीसाठी कोणाला जबाबदार धरायचे असल्यास मुस्लिम लीगलाच जवाबदार धरावे लागेल . त्यांनी केलेल्या राजकारणामुळेच भारताची फाळणी झाली . हा विरोध कसा झाला हे आपल्याला समजून घ्यायचे  असल्यास आपणास कॅबिनेट मिशन (त्रिमंत्री योजना ), व्हेवल प्लॅन , क्रिप्स मिशन , यामध्ये काय घडामोडी झाल्या ? यामध्ये सांगितलेल्या तरतुदींवर कोणत्या पक्षाने कोणत्या प्रकारे प्रतिसाद दिला त्याच प्रमाणे 9डिसेंबर 1946 ला घटना समिती स्थापन झाल्यावर जे भारताचे सरकार स्थापन झाले त्यामध्ये सहभागी असलेल्या मुस्लिम लीगने काय भूमिका घेतली ? याची माहिती करून घेणे अत्यावश्यक आहे . 
                         या सर्व बाबींच्या विचार केला असता,  मुस्लिम लीग या पक्षाने या सर्व बाबीमध्ये  कायमच अखंड भारताच्या विरोधी भूमिका घेतली . 16 ऑगस्ट 1946 रोजी मुस्लिम लीगने केलेल्या डायरेक्ट ऍक्शन प्लॅनमुळे झालेले दंगे आपण विसरू शकत नाही . त्यामुळे  भारताच्या फाळणीसाठी जर कोणाला जबाबदार धरायचे झाल्यास ते निःसंशय पणे मुस्लिम लीगलाचा धरावे लागेल. अन्य पक्षांना यासाठी जवाबदार धरणे म्हणजे इतिहासाच्या अपुऱ्या ज्ञानावर व्यक्त केलेले मत असेच म्हणावे लागेल .
        प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात . माझी बाजू काही जणांना अयोग्य वाटेल ते त्यांची मते मांडू शकतात . मात्र त्यात वैयक्तिक दोषारोपांना स्थान असू नये .एव्हढीच माझी अपेक्षा आहे . ती हि ब्लॉग पोस्ट वाचणाऱ्यांकडून पूर्ण होईल अशी अशा व्यक्त करून सध्यापुरते थांबतो . नमसकार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?