ब्रेक्सिटचा तिढा अंतिम टप्यावर ?? (ब्रेक्सिट भाग 6 )

   
            मित्रांनो , गेल्या साडेतीन ते चार वर्षापासून समस्त युरोप खंडातील कळीचा मुद्दा बनलेल्या ब्रेक्सिटचा तिढा आता नव्या वळणावर आलेला आहे . सदर लेख लिहीत असताना युनाटेड किंग्डममध्ये   (भारतीयप्रमाणवेळेनुसार 12 डिसेंबर 2019 रात्रौ साडेअकरा   )हा तिढा  कोणत्या प्रकारे सुटणार,  हे ठरणाऱ्या केंद्रीय विधिमंडळाच्या  निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे . ते  जागतिक प्रमाणवेळेनुसार 12 डिसेंबरला रात्री 10  ( भारतीय प्रमाणवेळेनुसार 13डिसेंबरला रात्री साडेतीन )  पर्यंत चालेल. {या प्रकरणाची इथपर्यंत वाटचाल मी  याआधी पाच ब्लॉग पोस्ट मार्फत घेतली आहेच .ज्यांना  ती वाटचाल वाचायची असेल त्यांनी या ब्लॉग पोस्टच्या शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करावे ..} या निवडणुकीचा निकाल युनाटेड किंगडम या देशासाठी अत्यंत महत्त्वाचा  आहे . गेल्या पाच वर्षातील ही तिसरी निवडणूक आहे .  या सर्व निवडणुका बेक्सिट या विषयाभोवतीच प्रामुख्याने रंगल्या आहेत . या निवडणुकीचा निकाल भारतीय प्रमाणवेळेनुसार  13डिसेंबरला रात्री साडेनऊ पर्यंत लागेल असे बीबीसीने दिलेल्या बातमीने सांगितले आहे . सध्या युनाटेड किंग्डममध्ये हिवाळ्याचे आहे . युनाटेड किंग्डममध्ये हिवाळ्यात पाऊस पडतो . आज 12 डिसेंबरला सुद्धा तिथे पाऊस पडत आहे  अस्या त्रासदायक  वातावरणात  युनाटेड किंग्डम मधील जनता लोकशाहीचा उत्सवाला सामोरे जात आहे  युनाटेड किंग्डममध्ये शक्यतो उन्हाळ्यात निवडणुका होत असतात . मात्र ह्या मुदतपूर्व निवडणुका आणि बेक्सिट ची टांगती तलवार असलेल्या निवडणूक असल्याने सध्या होत आहे
                                      सध्या युनाटेड किंग्डम मध्ये   काँझर्व्हेटिव्ह (हुजूर पक्ष ) पक्षाचे सरकार आहे . त्याला  जर पुरेसे बहुमत मिळाले तर सध्याच्या अटी मान्य करत युनाटेड  किंग्डम युरोपीय युनियम 31 जानेवारी  रोजी बाहेर पडेल . मात्र जर सध्या प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या लेबर पक्षाला बहुमत मिळाले तर त्या पक्षाचे महत्वाचे नेते जेरेमी बर्नार्ड कॉर्बीन  यांनी या आधीच जाहीर केल्याप्रमाणे ब्रेक्सिट साठी पुन्हा एकदा सार्वमत घेण्यात येईल . काही दिवसापूर्वी एका संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार सध्याचे जनमत  ब्रेक्सिट नको , आपण युरोपीय युनियन मध्येच राहू या बाजूला आहे . त्यामुळे या निवडणुका युनाटेड किंग्डमसाठी करो अथवा मरो अस्या आहेत . जर लेबर पक्ष सत्तेत आला तर ब्रेक्सिटची 31जानेवारी 2019 ची डेडलाईन चवथ्यांदा वाढवावी लागणार हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे . लेबर आणि  काँझर्व्हेटिव्ह या मुख्य पक्षांसह काही छोटे पक्ष युकेमध्ये आहे . त्यातील बहुतांशी पक्षांची भूमिका ब्रेक्सिट नको अशी आहे . त्यामुळे या निवडणुका खरोखर युकेचे भविष्य ठरवणाऱ्या आहेत .
       
         भारतावर याचा काय परिणाम होणार आहे ? याविषयी आपण या आधीच पहिल्या भागात सविस्तर माहिती घेतली आहे.  तरी थोडक्यात सांगायचे झाल्यास बेक्सिट झाल्यास भारताच्या युरोपात जाण्याचा मार्ग काही प्रमाणात बंद होईल .
मित्रानो ब्रेक्सिटचे  घोडामैदान अत्यंत जवळ आले आहे त्यामुळे त्यातील रंगतेचा आनंद घेण्यासाठी आता थांबतो, नमस्कार
भाग पाचवा
https://ajinkyatarte.blogspot.com/2019/11/5.html
भाग चौथा
https://ajinkyatarte.blogspot.com/2019/10/blog-post.html
भाग तिसरा
https://ajinkyatarte.blogspot.com/2019/10/blog-post_19.html
भाग दुसरा
https://ajinkyatarte.blogspot.com/2019/06/blog-post_85.html
भाग पहिला
https://ajinkyatarte.blogspot.com/2019/02/blog-post_50.html

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?