नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या वरून भारतात उठलेलल्या वादळाच्या निमित्याने .(भाग 1)

        भारतीय संविधान जगातील एक चांगल्या संविधांपैकी एक आहे . यामध्ये अनेक बाबी सखोलपणे मांडण्यात आल्या आहेत.   भारतीय संविधानाच्या दुसऱ्या भागात अर्थात भारतीय संविधानाच्या कलम 5 ते 11 दरम्यान सांगितलेल्या नागरिकत्वाच्या तरतुदी , त्या बदलण्यासाठीच्या करावयाच्या तरतुदी या त्यापॆकीच एक .  . याच संविधानाच्या कलम 11 नुसार सन 1955 मध्ये तयार करण्यात आलेल्या नागरिकत्वाच्या कायद्यातील तरतुदीतील   बदल खूपच चर्चेत आहे . सध्या समस्त भारतात चर्चित विषय असलेले  नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या पाय म्हणून याकडे बघावे लागेल .  
           मित्रानो , 1955 मध्ये तयार करण्यात आलेल्या या नागरिकता कायद्यातील सध्या चर्चेत असणारा बदल   पाचवा  बदल आहे . याआधी सन  1986, 1992, 2003, 2015 यावर्षी या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या . या बदलांर्गत मूळ कायद्यानंर्गत काय बदल करण्यात आले हे सांगण्यासाठी आजचे लेखन आहे .
सन  1955च्या कायद्यात कोणाला नागरिकत्व मिळू शकते आणि कोणत्या प्रकारे नागरिकत्व मिळू शकते आणि  नागरिकत्व लोप पाऊ शकते हे सांगितले आहे   सन 1955 च्या मूळ कायद्यानानुसार पाच प्रकारे
नागरिकत्व मिळू शकते .(1) जन्म झाल्यास (2) पालक भारतीय असल्यास  (3) नवीन प्रदेश भारतात आल्यास (4) नैसर्गिक /.(5) नोंदणी पद्धतीने
(1) जन्म झाल्यास
जन्म झाल्यास नागरिकत्व देण्याची तरतूद 1986 च्या सुधारणा विधेयकानुसार रद्द करण्यात आली आहे . या कायद्न्यवये 1जुलै 1987 पर्यतच्याच लोकांना नागरिकत्व देण्यात आले आहे .
(2)पालक भारतीय असल्यास
पालक भारतीय असल्यास नागरिकत्व देण्याचा 1955 च्या तरतुदीत फक्त वडिलांचा समावेश करण्यात आला होता . त्यामध्ये बदल 1992 मध्ये करण्यात आला ज्यानुसार वडिलंबरोबर आईचा देखील समावेश करण्यात आला आहे .
(3) नवीन प्रदेश भारतात आल्यास
सिक्कीम सारख्या प्रदेशांचे भारतात विलीनीकरण झाल्यावर तेथील नागरिक भारतीय नागरिक करण्याची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे .
(4) आणि  (5)  नैसर्गिक आणि नोंदणी पद्धतीने
  सध्या चर्चेत असणारे नागरिकत्व सुधारणा विधेयक 2016  याच  नागरिकत्वाच्या तरतुदीमुळे चर्चेत आहे . 1955 च्या तरतुदीनुसार सध्या या पद्द्तीने नागरिकत्व मिळण्यासाठी 11वर्षाची तरतूद आहे . जी नव्या बदलानुसार काही समाज घटकांसाठी  6 वर्ष करण्यात आली आहे .
1955 मूळ कायद्यांमध्ये 1986, 1992, आणि 2016 मध्ये करण्यात आलेले बदल आपण आधी बघितले आहेच . आता बघूया  2003 आणि 2015 मधील बदल . हे बदल बघण्यागोदर आपणास पुढील संकल्पना माहिती असणे आवश्यक आहे .  एनआरआय , पीआयओ , ओसीआय . या तीन मुद्याभोवतीच या सुधारणा केंद्रित झाल्या आहेत .
NRI  जी भारतीय नागरीक 180 पेक्षा अधिक दिवस भारताबाहेर  व्यक्तीला NRI म्हणतात .
PIO यामध्ये अश्या  व्यक्ती येतात ज्या सध्या भारतीय नागरिक नाहीत . मात्र त्यांच्या मागील तीन पिढ्यातील कोणीना कोणी भारतीय नागरिक होते  त्या व्यक्तींना  PIO म्हणतात . जर एखाद्या   PIO  व्यक्तबरोबर अन्य देशातील नागरिकाना सुद्धा PIO म्हणतात . 2015 च्या सुधारणेमध्ये ही संकल्पना रद्द करण्यात आली असून यामध्ये अंतर्भूत असणाऱ्या व्यक्तींचा  OCI  मध्ये समावेश करण्यात आला
OCI---  पीआयओच्या मुलांना OCI म्हणतात 1955 च्या नागरिकत्व कायद्यात सुरवातीला ही संकलपना नव्हती . या कायद्यात 2003 साली ही संकल्पना अंतर्भूत करण्यात आली .
याविषयी खूप काही  बोलण्यासारखे आहे , मात्र तूर्तास इथेच थांबतो , नमस्कार .








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?