स्पर्धा परीक्षेतील घोटाळा माध्यमात आलेला ( भाग 2)

              सध्या आपल्या भारतात पारंपरिक माध्यमे नववर्षाच्या बातम्या देण्यात मग्न असताना,   मात्र राजस्थानातील हजारो युवक युवतींचा जीव टांगणीला लागलाय, आणि याला कारणीभूत ठरलाय,  तो राजस्थान लोकसेवा आयोगाच्या निष्काळजीपणा  . ज्या परीक्षेचा अर्ज भरण्याची मुदत मे 2018ला संपते . त्या परीक्षेचा पहिला टप्पा पार पडतो तो तब्ब्ल दीड वर्षाने अर्थात 30 डिसेंबर 2019ला . बर पहिला टप्पा तरी शांततेत पार पडतो का ? याचे उत्तर दुर्दैवाने नकारार्थी येते . परीक्षा सुरु होण्याच्या दोन तास त्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका फुटते . परिणामी ती परीक्षाच रद्द करण्याची नामुष्की राजस्थान लोकसेवा आयोगावर येते .परीक्षा नंतर घेण्यात येईल असे मोघम उत्तर प्रशासनकडून देण्यात येते . मात्र पुनर्परीक्षेचा दिनांक जाहीर करण्यात येत नाही .काय म्हणावे यास ? मागे 'गुजरात लोकसेवा आयोगाच्या' "बिन सचिवालय" या परीक्षेत सुद्धा अशाच प्रकार  घडला होता . (त्यावेळी  लिहलेल्ल्या ब्लॉगची लिंक या ब्लॉग पोस्टच्या शेवटी देण्यात आली आहे .
) मात्र  पुढच्यास थेच मागचा  शहाणा या न्यायाने  वागतील ती राज्य लोकसेवा आयोग  कुठली ? मात्र यात  भरडली  जाते  ती आपल्या आयुष्याची आयुष्यातील उमेदीची वर्षे पणाला लावणारी तरुणाई . मात्र पारंपरिक माध्यमांना या विषयात रस नसल्याने जनतेसमोर असे मुद्दे येण्यासाठी  निवडावे लागते  समाज माध्यम . माझे आजचे लेखन त्यासाठी .
                                      सध्या खाजगी  क्षेत्रात नोकऱ्यांची मारामार असताना, बेरोजगारीने गेल्या 45 वर्षातील उच्चांक प्रस्थापित केलेला असताना तरुणाई सरकारी नोकरीच्या संधी शोधणार यात तिळमात्र शंका नाही . मात्र असे असताना   तरुणाईपुढे देशातील प्रशासन व्यवस्थेत  प्रवेश करण्याचा  मार्गात अनेक अडचणी आहेत . परीक्षा वेळेवर न होणे ,  प्रश्नपत्रिकेत  असंख्य चुका असणे , आता जशी प्रश्नपत्रिका  फुटली तसे प्रकार होणे , यामुळे लोकसेवा आयोगाच्या विश्वासाहर्यतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होते .सध्या सर्वत्र भारताच्या तरुणाईची चर्चा   सुरु असताना ही तरुणाई कोणत्या स्थितीत आहे ? याचा धांडोळा घेणे अत्यावश्यक आहे . आणि तो घेत असताना भारताची  प्रशासकीय  व्यवस्था ज्या खांबावर आधारित आहे . त्या खांबाच्या कार्यकुशलतेबाबत असे प्रश्न उपस्थित होणे  नक्कीच भूषणावह नाही . ती सुधारणे ही  अत्यंत महत्तवाची बाब आहे .  मित्रानो , भारतीय संविधानाच्या कलम 317 मध्ये या राज्य लोकसेवा आयोग प्रणालीचा  स्पष्ट उल्लेख करण्यात आला असताना , त्यांची दुर्दशा होणे वाईट आहे ग्रामीण भागातील अनेक गरीब विद्यार्थी सरकारी सेवेत जाण्याचे स्वप्न बघून या सेवेसाठी जीवापाड परीश्रम घेतात  . अधिकारी बनून आपल्या भागाचा विकास करण्याचा स्वप्न त्याच्यासोबत असते त्यांना होणार त्रास मुख्य माध्यमांमध्ये फारशा चर्चिला जात नाही . 
                           पूर्वी देखील मध्यप्रदेश मध्ये व्यापम परीक्षेमध्ये खूप गोंधळ झाला होता . अनेकांचे बळी  घेतल्यावर त्याची थोडीफार चौकशी झाली . आता त्याची स्थिती काय आहे कोणास ठाऊक ? अश्या परीक्षांमध्ये भरडली जाते ती तरुणाई .तरुणाई आपल्या आयुष्यतील मोक्याचे क्षण यासाठी खर्च पडते . मात्र उत्तर म्हणून त्यांना मिळते काय तर शून्य.  हे चित्र बदलायलाच हवे .
या ब्लॉगपोस्टच्या पहिला भाग  वाचण्यासाठी  पुढील लिंकवर क्लीक करा .
https://ajinkyatarte.blogspot.com/2019/12/blog-post_18.html



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?