या लोंढ्याना आवरणे काळाची गरज (भाग 3 )

            काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे , जेव्हा महाराष्ट्र कर्नाटक या दोन राज्यात तणाव निर्मण झाल्याने दोन्ही राज्यातील राज्य परिवहन महामंडळाची सेवा बंद होती . त्या वेळेस  एक महाराष्ट्र एसटी प्रेमी म्हणून मी महाराष्ट्र एसटीचे किती नुकसान झाले असेल? असा विचार आल्याने  म्हणून जेव्हा माहिती गोळा करण्यास सुरवात केली तेव्हा छातीत धस्स व्हावे अशी आकडेवारी माझ्यासमोर आली . महाराष्ट्राच्या एसटीला धोका म्हणून खाजगी बससेवांकडे बोट दाखवले जाते मात्र ते अयोग्य असून महाराष्ट्र एसटीला खरा धोका अन्य राज्यांच्या परिवहन सेवांकडून असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करणारी ती आकडेवारी होती . मला समस्त कर्नाटकची आकडेवारी मिळाली नाही फक्त बेळगाव या शहराची आकडेवारी मिळाली , मात्र शितावरून भाताची परीक्षा या न्यायाने समस्त कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बाबतीत तोच न्याय लावायला हरकत नसावी .
तर मित्रानो , महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या 16 मार्गावरून बसेस बेळगावला जातात . तर कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसेस बेळगावहून 31मार्गाने महाराष्ट्रात प्रवेश करतात . या सर्व मार्गांची माहिती मी या ब्लॉग पोस्टच्या शेवटी दिली आहे . या माहितीत ज्या ठिकाणी बेळगाव अशा उल्लेख आहे ते मार्ग महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून चळवण्यात येतात . तर ज्या ठिकाणी बेळगावी अशा उल्लेख असेल ते मार्ग कर्नाटक महामंडळाकडून चालवण्यात येतात असे समजावे . जर आपण दोन्ही राज्यात किती मार्गावर बसेस
चालवल्या जातात या संख्येवर लक्ष दिले तर आपणस सहज समजते की , महाराष्ट्राच्या जितक्या बसेस कर्नाटकमध्ये जातात त्याच्या दुप्पट बसेस कर्नाटकच्या महाराष्ट्रात येतात . महाराष्ट्राच्या एका बसेस मध्ये 48 आसने असतात . याउलट कर्नाटकाच्या एका बस मध्ये 60 आसने असतात . म्हणजेच 20 % आसने अधिक असतात . या सर्व गोष्टींचा विचार करता आपणास हे लक्षत येते की , आपल्या महाराष्ट्राच्या महामंडळाच्या  कितीतरी महसूल हे कर्नाटकवाले पळवून नेतात .एकवेळ आपण खाजगी बस चालकांना एसटी बस स्थानकाच्या बाहेर ५०० मीटरवर नेऊ शकतो . मात्र अन्य राज्यांच्या परिवहन महा मंडळाच्या बसेस या आपल्या मालकीच्या जागेत आपल्या  बसेसच्या शेजारी स्वतःची बस उभी करून महाराष्ट्रात आपला व्यवसाय करतात . त्यांनी महाराष्ट्र एसटीला घरातच स्पर्धक निर्माण केला आहे त्यामुळे म्हणावेसे वाटते महाराष्ट्रत्तेर  राज्य परिवहन महामंडळाच्या लोंढ्याना आवरणे ही काळाची गरज आहे . नाहीतर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा कणा असलेली आपली एसटी इतिहासात जमा होण्यास वेळ लागणार नाही . देव करो आणि अशी परिस्थिती निर्माण न होवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून आजपुरते थांबतो , नमसकार 


बेळगावचे बस मार्ग पुढील प्रमाणे
बेळगांव  मुंबई 
बेळगावी मुंबई 
बेळगांव ठाणे
बेळगावी कल्याण 
बेळगावी बोरिवली
बेळगावी नाशिक 
बेळगाव धुळे (पुर्वी होती)
बेळगावी शिर्डी 
बेळगावी पिंपरी 
बेळगांव पुणे 
बेळगांव राजगुरूनगर (पूर्वी होती)
बेळगांव कोल्हापूर
बेळगावी स्वारगेट 
बेळगावी सातारा 
बेळगावी सांगली
बेळगावी विटा
बेळगावी मिरज
बेळगावी पंढरपूर
बेळगावी सोलापूर
बेळगावी बार्शी
बेळगावी मालवण
बेळगावी जत
बेळगावी राजापूर
बेळगावी आंबोली
बेळगावी रत्नागिरी
बेळगांव संगमेश्वर
बेळगावी चंदगड
बेळगावी लातूर
बेळगावी तुळजापूर
बेळगावी बारामती
बेळगाव बारामती (midc)
बेळगावी कुडाळ
बेळगावी विशाळगड
बेळगावी कोल्हापूर
बेळगांव कोल्हापूर
बेळगावी इचलकरंजी
बेळगांव संभाजीनगर
बेळगांव गारगोटी
बेळगाव गडहिंग्लज
बेळगावी चिपळूण
बेळगावी गगनबावडा
बेळगावी कोपरगाव
बेळगाव मलकापूर
बेळगाव दापोली
बेळगावी गोंदवले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?