93व्या साहित्य संमेलनामुळे मनात उमटलेले भावतरंग

       
          दिनांक 10 जानेवारी 2020ला उस्मानाबाद येथे  93व्या साहित्य संमेलनाचे उदघाटन झाले . मला कळायला लागल्यापासूनचे हे 15/16संमेलन . मी नाशिकला वनप्रेमी असणारे ज्येष्ठ साहित्यिक  मारुती चितमपल्ली हे  संमेलाध्यक्ष असणारे साहित्य संमेलन आणि पुण्यात सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेले साहित्य संमेलन  ही दोन संमेलने अगदी जवळून त्यातील कार्यक्रमांच्या आस्वाद घेत अनुभवली . बाकीच्या साहित्य संमेलनांच्या कार्यक्रमांच्या प्रसार माध्यमांनी केलेल्या  बातम्यांच्या स्वरूपात अनुभवली . माझ्या मते या सर्व साहित्य संमेलनांमध्ये  होणारे वाद , (ज्यामध्ये साहित्य क्षेत्राशी प्रत्यक्ष संबंध असणारे आणि साहित्य क्षेत्राशी अप्रत्यक्षरित्या संबंधित असणारे दोन्ही वाद मला अपेक्षित आहेत ) त्यावर विविध लोकांची मते , या संमेलनाच्या आयोजनावरून  ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे सारख्या व्यक्तीची मते,  . यासाठी सरकारतर्फे देण्यात येणारे अनुदान , त्यावरून उठणारे वादंग , या सर्व साहित्य संमेलनात होणारे ठराव, त्याची  प्रत्यक्षात होणारी अंमलबाजवणी , या संमेलनात होणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम , पुस्तकांची होणारी विक्री आणि त्यावरून मांडण्यात येणारी गृहीतके , विविध मानापमान हे सर्व आपल्या सांस्कृतिक जीवनाचे अविभाज्य भाग आहेत .
                                पुण्यात भूगोल विषयाचे पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण घेत असतांना माझ्या संपर्क काही असामी लोकांशी आला होता , त्यांच्या बोलण्यात त्यांच्या असामी भाषेत देखील असे साहित्य संमेलन होत असल्याचा उल्लेख आला होता . ती अशीच भव्य होतात का ? याविषयी मात्र त्यांच्याकडून माहिती घेण्यात मी अपयशी
ठरलो , सध्या माझ्या संपर्कात कोणीही ईशान्य भारतातील व्यक्ती नसल्याने या विषयीची माहिती मिळणे दुरापास्त आहे .
                                       आजच्या  साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाबाबत बोलायचे झाल्यास माजी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अरुण ढेरे यांनी त्यांच्या मनोगतात मांडलेले विचार खरच विचार करण्यासारखे आहेत . त्यांनी मांडलेला ग्रंथालय सेवकांचा प्रश्न असो , अथवा शिक्षणाव्यतिरिक्त मराठी भाषेचा गोडवा जनसामान्यांपर्यत पोहोचण्यासाठी  करावयाचा प्रयत्नाचा असो सारेच खरोखर विचार करायला लावणारे होते . , राजकारणी लोकांची साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर होणारी गर्दी बाबत या संमेलनाच्या पहिल्याच दिवशी मांडण्यात आलेली भूमिका मला आवडली . गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आलेल्या या वादावर आता कायमचा पडदा पडला आहे आहे , असे समजण्यात आता अडचण नसावी असे मला वाटते . 93 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिबट्रो यांनी आपल्या अध्यक्षणीय भाषणात अनेक मुद्द्यांना स्पर्श केला . शहरी जीवनाची मराठी पासून तुटलेली नाळ , मात्र ग्रामीण जीवनात असणारे मराठीचे महत्व , मानवामानवांमधील संपत असणारा संवाद ,
सध्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा होणार संकोच , सध्याचे बदलते हवामान , सारेच मुद्दे महत्त्वाचे होते . त्यांनी संत वाग्म्ययाचे (मी सदर लेखन गूगल इनपुट टूल्स वापरून करत आहे . त्यामुळे ते संबंधित अक्षर आलेले नाही , उच्चारावरून तयार करण्यात आलेला शब्द कृपया विचारत घ्या . तुम्हाला होणाऱ्या त्रासाबाबत क्षमस्व ) आपल्या आयष्यातील महत्व, आधीच्या साहित्य संमेलनातील अध्यक्षांची भाषणांचे पुस्तक तयार करणे ,यातील एकही मुद्दा दुर्लक्ष करण्यासारखा नाही . यावर विचारमनाथन होणे आवश्यक आहे .संबंधित व्यक्ती यात अवश्य लक्ष घालतील अशी अशा व्यक्त करून आजपुरते थांबतो , नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?