स्वामी विवेकानंदांना अपेक्षित तरुणाई आणि वस्तुस्थिती

 
       आज 12 जानेवारी अर्थात स्वामी विवेकानंदांची जयंती,  अर्थात  राष्ट्रीय युवा दिन . आज दिवसभरात स्वामीजींच्या आयुष्यावर आधारित विविध कार्यक्रम होतील . त्यांच्या कार्याचे गोडवे गायले जातील . मात्र स्वामी विवेकानंद ज्या तरुणाईच्या बळावर आपल्या भारताला गतवैभव प्राप्त करून देणार होते , तिची आजची स्थिती स्वामी विवेकानंदांना अपेक्षित असणारी आहे का ? याचा विचार करता समोर येणारे चित्र फारसे आशादायक नाही असेच खेदाने म्हणावे लागेल . माझे आजचे लेखन त्यासाठी . स्वामी विवेकानंदानी आपले सर्वस्व त्यागून भारताच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या तरुणाईचे स्वप्न बघितले होते . त्यासाठी त्यांनी प्रसंगी आपल्या देवदेवतेचा त्याग करून भारतमाता हीच आपली देवता मानून तिची सेवा करण्याचा विचार देखील मांडला होता .
                        दोन दिवसपूर्वीच एका मराठी वृत्तवाहिनीवर एक बातमी दाखवली होती , ज्यात सांगितले होते की , गेल्या वर्षभरात सुमारे दीड हजार तरुणांनी ( मला येथे  भाषेमुळे लिंगभेद करावा लागत आहे . मी जरी पुरुष लिंगाचा उल्लेख करत असलो तरी मला तरुण आणि तरुणी दोन्ही अपेक्षित आहेत . )विविध कारणांनी आत्महत्या केली आहे .काही दिवसापूर्वीच इंडियन मेडिकल असोशियन च्या एका अहवालानुसार देशात मनोरुग्णांचे प्रमाण वाढत असून यात तरुणवर्ग मोठ्या प्रमाणत आहे . आज देशात गेल्या 45 वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी आहे . ज्यांना मुंबईतील गिरणी कामगारांच्या संपाच्या वेळची स्थिती माहिती असेल . त्यांना हे माहिती असणारच की मुंबईमधून गिरण्या संपल्यावर मुंबईतील गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली . म्हणजेच बेरोजगारी आणि गुन्हेगारीचा अत्यंत जवळचा संबंध आहे . देव  ना करो आणि ही बेरोजगारी गुन्हेगारी क्षेत्राकडे वळो .नाहीतर याचे मोठे परिणाम भारताला भोगावे
लागू शकतात . मी एकदा पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ नरेंद जाधव (यांचे नाव पण नरेंद्र काय योगायोग ) यांचे नाशिकला परशुराम नाट्यगृहात व्याख्यान ऐकले होते त्यात त्यांनी सांगितले होते की , येत्या काळात भारतात तरुणाईची संख्या वाढणार आहे , ही भारतासाठी मोठी संपत्ती आहे ,जगातील सर्व विकसित देश याच
टप्यावर विकसित झाले होते , मात्र आपण जर त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करू शकलो नाही , तर हा टाइम बॉम्ब कदाचित आपल्यावरच उलटू शकतो . दुर्दैवाने त्यांची भविष्यवाणी खरी तर होत नाहीना ? असे चित्र सध्या निर्माण होत आहे  स्वामी विवेकानंदानी तरुणाईला बलोपासनाचा संदेश दिला होता , बलोपासना केल्याने तुम्हाला भगवतगीता अधिक उत्तमरित्या समजेल असे त्यांनी म्हंटले होते . आजचा तरुण विविध अन्य कामात व्यस्त राहत असल्याने त्याचे बलोपासनाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते . परिणामी आजच्या तरुण वर्गात लठ्ठेपणाची समस्या मोठ्या प्रमाणत दिसत आहे . परिणामी विविध शाळेत अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांवर बंदी घालण्याची वेळ आली आहे .
मात्र हे चित्र अजूनही पूर्णतः हाताबाहेर गेलेले नाही यात अजूनही सुधारणा होऊ शकते . मात्र त्यासाठी चिकाटीने प्रयत्न करण्याची गरज आहे . आणि हे प्रयत्न आजचा तरुण नक्कीच करेल अशी  मला एक तरुण म्हणून खात्री आहे .  तर चला पुढे येउया स्वामीजींच्या स्वप्नातील भारत घडवायला ...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?