महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेला झालेला कर्करोग .......

                 आज फेसबुकवर सहज सर्फिंग करत असताना एका दैनिकाच्या बातमीच्या कात्रणांचा फोटो दिसला . बातमी आपल्या महाराष्ट्र एसटी विषयी होती . त्या बातमीत सांगितले होते की आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या लांब पल्ल्याचा आणि आंतरराज्य बसेस कमी असल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळास प्रचंड प्रमाणात तोटा होत आहे . मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे . माझे आजचे लेखन महाराष्ट्राच्या एसटीला असणाऱ्या या महत्वाच्या मात्र काहिस्या न चर्चिल्या जाणाऱ्या बाबींविषयी 
      तर मित्रानो , मी अनेकदा नाशिकला राजस्थान राज्य परिवहन मंडळाची शिर्डी ते उदयपूर अशी बस बघितली आहे  या बाबत मी नाशिकला अधिक चौकशी केल्यावर समजले की ही बस रोज धावते .  हे फक्त प्रातिनिधिक उदाहरण झाले . नाशिकहून कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या   3 बसेस बेळगावला जातात तर एक बस रायबागला जाते . मात्र नाशिकहून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एकही बस कर्नाटकमध्ये जात नाही . गोवा राज्याच्या परिवहन मंडळाची  एक बस पंढरपूर येथून पणजीला जाते . याउलट महाराष्ट्राची एकही बस पंढरपूरहून पणजीला जात नाही . मी एकदा पुण्याला गुजरात राज्य परिवहन मंडळाची अहमदाबाद ते कोल्हापूर अशी बस बघितली होती . मित्रानो कोल्हापूर येथून कागलच्या रस्ताने 25किमी गेले की कर्नाटक राज्य सुरु होते म्हणजे आपण समजू शकता अन्य राज्याचा परिवहन सेवा महाराष्ट्रात किती लांबवर सेवा देतात . सुरतेहून महाराष्ट्राचे दुसरे टोक
असणाऱ्या पंढरपूर आणि उस्मानाबाद येथे जाण्यासाठी बसेस आहेत . रात्री सव्वा आठ ते सव्वा नऊ या दरम्यान नाशिकहून गुजरात राज्य परिवहन मंडळाच्या सुरतला जाण्यासाठी 4बसेस आहेत .याउलट महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची फक्त एक बस या दरम्यान आहे . मी नाशिकच्या महामार्ग बस स्थानकावर या बाबत चौकशी केली असता मला समजले की गुजरात राज्य परिवहन मंडळाच्या 35बसेस  नाशिकला येतात तर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या फक्त 8 बसेस नाशिकहून गुजरातच्या विविध शहरात जातात . किती ही विषमता . 
                    एसटीला खाजगी बस चालकांकडून धोका असल्याचे वारंवार बोलले जाते मात्र माझ्यामते आपल्या एसटीला खरा धोका हा अन्य राज्याच्या राज्य परिवहन मंडळाकडूनच आहे . एकवेळ खाजगी बस चालकांना विविध बंधने लावत आपण बस स्टँडहुन लांबवर नेऊ शकतो , मात्र अन्य राज्यांच्या बस सेवेबाबत आपण तो निर्यय घेऊ शकत नाही . ज्या प्रमाणे शरीराच्या एका अवयवाला झालेला कर्करोग कालांतराने संपूर्ण शरीरालाच नष्ट करतो , त्या प्रमाणे महाराष्ट्रेत्तर राज्य परिवहन सेवा या महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेला असणारा कर्करोग असल्याचे म्हंटले तर वावगे ठरणार नाही कर्करोगाचे जितके लवकर निदान होईल तितकी हानी कमी होते . त्या प्रमाणे आता महाराष्ट्रेत्तर राज्य परिवहन सेवांचा गांभीर्याने विचार करायची वेळ आली आहे . तरी महाराष्ट्राचे नवीन सरकार या बाबत नक्कीच काही आपुले उचलतील अशी अशा व्यक्त करून सध्यापुरते थांबतो , नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?