शेतकरी कर्जमाफी आणि बँकिंग प्रणालीची मूलभूत सूत्रे

           सध्या सर्वत्र शेतकरी कर्जमाफीची चर्चा मोठ्या जोरात  सुरु आहे . शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची अवस्था सुधारते की नाही हा वादाचा मुद्दा क्षणभर बाजूला ठेवूया . मात्र मी एम बी ए करत असताना शिकलेल्या बँकिंग विषयातील ज्ञानानुसार असे कर्ज माफ करणे हे बँकिंग प्रणालीच्या मूलभूत सुत्रासी पूर्णतः विसंगत आहे ते कसे विसंगत आहे हे सांगण्यासाठी आजचे लेखन
.तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट मुक्त विद्यापीठात एम बी ए करताना  बँकिंग विषयात मी शिकलो की , बँकेचे मुख्य कार्य हे कर्ज देणे आहे , त्यासाठी आवश्यक असणारे भागभांडवल ती लोकांकडून ठेवीच्या स्वरूवपात स्वीकारते . लोकांनी ठेवी बँकेत ठेवाव्यात म्हणून ती त्यांना काही प्रमाणात व्याज देते . यासाठी आणि इतर आस्थापनावरील खर्च भरून निघण्यासाठी बँका या ज्यांना कर्ज देतात त्यांच्या कर्जावरील व्याज दर हा ते ठेवीदारांना देत असलेल्या दरांपेक्षा अधिक ठेवतात . कर्जावरील
व्याजदरांमुळे मिळणाऱ्या नफ्यातून त्या इतर सर्व खर्च भागवतात . काही जण वरचे विवेचन वाचून म्हणतील याचा आणि शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा काय संबंध ? तर तो कसा आहे हे सांगण्यासाठी पुढचे लेखन
                तर मित्रानो शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले तर बँकेला होणाऱ्या होणार वित्तपुरवठा थांबला , जर
कर्जावरचे व्याज माफ झाले तर बँकेच्या नफ्यात घट होणार ही  नफ्यातील तूट भरून काढण्यासाठी बँका त्यांचे मुळात  कर्ज देण्यासाठी वापरण्याचे भांडवल वापरणार परिणामतः  त्या कमी प्रमाणात कर्ज देतील . काही लोक असेही म्हणू शकतील की शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ होणार नसून त्यातील काहीच भागाचे कर्ज माफ होणार आहे आहे . त्यामुळे फारशा परिणाम होणार नाही . जरी संपूर्ण कर्ज माफ केले नाही तरी जे काही थोडे कर्ज माफ करण्यात येईल त्यामुळे अल्पशा का होईना परिणाम होईलच . जरी असे समजले की बँकेला कर्ज माफीमुळे गमवावे लागणारे भांडवल त्यांना सरकारकडून पुरवण्यात येईल . तरी सरकारकडील पैसे हे आपण कररूपाने लोकांच्या कल्याणासाठी देण्यात आलेले असतात . त्यातीलच काही भाग सरकार खर्च करणार परिणामी काही प्रमाणात लोककल्याणकारी योजनांना खीळ बसणार परिणामी आपलेच नुकसान होणार . शेतकरी मुख्यतः जरी सहकारी बँकेकडून कर्ज घेत असले तरी  या सहकारी बँकेचे खाते मोठ्या राष्ट्रीकृत बँकेत असतेच त्यामुळे या ना त्या रूपाने हा प्रश्न राष्ट्रीय बँकेपर्यंत पोहोचतोच आणि त्यांची स्थिती कशी आहे हे आपण जाणताच .
काही जण माझे वरचे लेखन वाचून मला प्रश्न करतील यावर उपाय काय आहे तो सांग ? त्यांना मला सांगायचे आहे . शेती उपादनाला उत्पादन आधारित भाव मिळणे हाच आहे . तो मिळण्यासाठी सध्याचे सरकार प्रयत्न करेल अशी अशा व्यक्त करून सध्यापुरते थांबतो , नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?