नैसर्गिक, ऐतिहासिक, आणि आध्यात्मिक गोष्टीनी समृद्ध तालुका संगमनेर

                         
                          आपल्या महाराष्ट्रात अनेक नैसर्गिक , ऐतिहासिक आणि आध्यत्मिक  गोष्टीनी समृद्ध अनेक स्थळे आहेत . ही स्थळे जर आपणास एकाच वेळी बघायची असल्यास, आपणास ज्या मोजक्या ठिकाणांना भेट देणे क्रमप्राप्त आहे, अश्या ठिकाणाची यादी केल्यास त्या यादीत अग्रक्रमाने नाव घ्यावेच लागेल, ते महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्यात वायव्य दिशेला असणाऱ्या संगमनेर तालुक्याचे
             . या तालुक्यातील पेमगिरी या गावात आपणास ऐतिहासिक आणि नैसर्गिक गोष्टींचा मिलाफ बघायला मिळतो , तर त्याच संगमनेर तालुक्यात असणाऱ्या खांडेश्वर आणि निर्झरेश्वर या ठिकाणी आपणास
आध्यत्मिक गोष्टीचा प्रत्यय येतो . मी नुकतीच अश्या  नैसर्गिक, ऐतिहासिक,  आणि आध्यात्मिक गोष्टीनी समृद्ध तालुका असणाऱ्या संगमनेर तालुक्यात  माझ्या फेसबुक मित्रांच्या सहकार्याने नुकतेच फिरून आलो , त्यावेळी मला आलेले  अनुभव आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचे लेखन .
                               मित्रानो ,  मी राहतो त्या नाशिकपासून हाकेच्या अंतरावर  संगमनेर तालुका आहे . मी नाशिक पुणे प्रवासामध्ये या तालुक्यातून प्रवास करताना बसच्या खिडकीतून अनेकदा बघत असे
येथील समाजजीवन, आर्थिक जीवन.
मात्र ते किती समृद्ध आहे याचा अंदाज त्यातून येत नसे तो मला या दौऱ्यातून आला . मला या दौऱ्यासाठी माझ्या दोन फेसबुक\मित्रांनी मदत केली . एक होते  श्री . ललित देशमुख (क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत )आणि दुसरे होते श्री अमोल कुलकर्णी ( नाशिक मधील सुप्रसिद्ध मनोचिकित्सक) आणि माझे एक परिचित दीपक दिघे यांनी .त्यांनी मला संगमनेर तालुक्यातील एका दिवसात सहज बघता येतील अशी मात्र संगमनेर तालुक्याची   नैसर्गिक, ऐतिहासिक,  आणि आध्यात्मिक गोष्टीनी समृद्ध तालुका संगमनेर तालुका हि ओळख पटेल अशी ठिकाणे सुचवली . आणि माझ्या संगमनेर तालुका दर्शनाचा पाया  घातला .
                 मी संगमनेर तालुका दर्शनासाठी माझा सुट्टीचा वार म्हणजेच रविवार निवडला . सकाळी सव्वाआठला नाशिकच्या महामार्ग बस स्थानकावर मी संगमनेरला जाण्यासाठी आलो आणि नाशिक
अहमदनगर बसमध्ये आसनस्थ झालो आणि माझ्या संगमनेर तालुका दर्शनाचा प्रारंभ झाला . बसने नांदूर शिंगोटे पर्यंत व्यवस्थित प्रवास केला . बस नांदूर शिंगोटे च्या बस स्थानकावर आली असता बसच्या डायव्हर आणि कंडक्टर यांनी स्थानकात न्याहारी करण्याचे ठरवल्याने माझा संगमनेर शहरांतही प्रवेश सुमारे वीस ते पंचवीस मिनटे लांबला . मात्र त्याचा काहीही अनुचित परिणाम माझ्या सहलीवर झाला नाही .हे विशेष .
मी संगमनेरला  बस मधून बाहेर येताच बघितले की संगमनेर ते पेमगिरी ही बस स्वागताला जणू उभीच  होती . मला सुद्धा पेमगिरी तिथेच जायचे असल्याने मी विनाविलंब तिथे जाऊन बसलो . पेमगिरी हे ठिकाण तेथील अवाढ्यवय अश्या वटवृक्षांबरोबर तेथील किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे . किल्यावर जाण्यासाठी गावातून दोन रस्ते आहेत . एक रस्ता गाडीरस्ता असून त्या
मार्गाने बांधलेल्या डांबरी सडकेने थेट किल्यावर जाता येते . दुर्गप्रेमीसाठी दुसरा मार्ग असून त्या मार्गाने ट्रेकिंगचा अनुभव घेत गडाचा माथ्यावर जाता येते . मी दुसरा मार्ग निवडला .या मार्गावर सुरवातीला पायऱ्या बांधलेल्या असून त्यानंतर चढण सुरु होते . किल्याचा साधारण मध्यावर  एक मारुतीचे मंदिर असून या ठिकणी डांबरी रस्ता आणि दुर्गप्रमींची वाट एकत्र येते . यानंतर मात्र दुर्गप्रेमींची वाट खूपच अवघड आहे . ती सोयीची व्हावी यासाठी  या ठिकाणी शिड्यांची सोय करण्यात आली आहे .  गडावर तीन मंदिरे असून एक बांधलेले आखीव रेखीव तळे आहे . तसेच एक पाहणी बुरुज आहे . अन्य सर्व बांधकाम दुर्दैवाने काळाच्या उदारत गडप झाले आहे .या गावापासून सुमारे अडीच किलोमीटरवर एक महाकाय पुरातन वडाचे झाड आहे . या झाडाचा विस्तार सुमारे तीन एकर आहे . परिसर अतिशय रम्य आणि शांत आहे .मात्र गावातून येथे येण्यासाठी विशेष सोयी नाहीत .   पेमगिरीला जाण्यासाठी संगमनेर येथून दर तासाला बस आहे . ज्यांना स्वतःच्या वाहणारे  येयच असेल
, त्यांनी संगमनेर अकोले रस्त्याने संगमनेरपासून दहा किलोमीटरवर असलेल्या कळस या गावात यावे . येथून एक एक फाटा  फुटतो पेमगिरी गावात येण्यासाठी त्या रस्त्याने आठ किलोमीटरच्या प्रवास केल्यास आपण पेमगिरीला पोहोचतो . कळस गावापासून अकोले गाव आठ किलोमीटरवरच आहे . अकोले संगमनेर मार्गावर सातत्याने बससेवा सुरु असते . मला स्वतःला संगमनेरहून कळस पर्यत विरुद्ध मार्गाने येणाऱ्या किमान 5ते 6बसेस दिसल्या . मात्र कळस ते पेमगिरी या मार्गावर मात्र दर एक तासाने धावणाऱ्या बसचाच आधार आहे . मात्र संपूर्ण गाव परिसर अत्यंत रमणीय आहे . आपला वेळ कशा निघून जातो ते आपणास समजतच नाही .
                      पेमगिरीच्या दर्शनानंतर मी माझा मोर्चा वळवला तो खांडेश्वर येथील मंदिराकडे . मंदिर संगमनेर अकोले रस्त्यावरच असून या ठिकाणी भगवान महादेवाचे सुंदर मंदिर आहे . परिसरात मोठे वृक्ष असलेले एक उद्यान आहे . परिसर अतिशय सुंदर असून या मंदिरात श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षात एक मोठा उत्सव असतो . मंदिराच्या आसपास मला खानपानाच्या तुरळक सोयी आहेत . मंदिर परिसरात एक मंगल कार्यालय देखील आहे . हे ठिकाण संगमनेर पासून आठ किलोमीटरवर असून या ठिकाणी जाण्यासाठी आपणास संगमनेर पासून एसटी बसेसप्रमाणे ऑटो रिक्षा देखील आहेत . त्या दहा रुपये (माझे घेतले , आपणाचे त्यावेळच्या महागाईनुसार कमी जास्त होऊ शकतात ) घेऊन सोडतात आणि आणतात .मात्र रिक्षाने संगमनेरमध्ये आल्यास आपणास  त्या रिक्षा बसस्टॅन्ड  परिसरात न सोडता , नेहरू चौक या परिसरात सोडतात . तेथून बस स्टॅन्ड सुमारे पाच मिनिटे पायी चालण्याचा अंतरावर आहे . मी पेमगिरीहून खंडेश्वरला येताना  बसने आलो तर खंडेश्वराहून संगमनेला रिक्षाने आलो . नेहरू चौकात पोहोचल्यावर मी मात्र माझा मोर्चा संगमेर मधील दिल्ली नाका परिसराकडे वळवला , तो माझ्या अखेरच्या स्थल दर्शनासाठी
                             मी अखेरच्या या टप्यात निवडले ते संगमनेर  बाभळेश्वर रस्त्यावरील कोकणगाव या गावापासून हाकेच्या अंतरावर असलेले निर्झरेश्वराचे मंदिर . संगमनेर बाभळेश्वर मुख्य रस्त्यापासून हे मंदिर एक किलोमीटर आता असून संपूर्ण परिसर मन अत्यंत प्रसन्न आणि शांत करणारा आहे . मंदिराची उभारणी एखाद्या किल्याप्रमाणे असून मंदिराच्या समोरच मध्यम  उंचीची दीपमाळ आहे . मंदिराच्या गर्भगृहात तीन पिंडी आहेत मंदिर
सायंकाळी सात वाजता बंद होते . मंदिरात अनेक सुधारणा तेथील खासदाराच्या मार्फत करण्यात आलेल्या आहेत . या ठिकाणी आपणास येयचे असल्यास संगमनेरहुन खाजगी प्रवाशी साधनांचा वापर करणे  अत्यावश्यक असल्यासारखे आहे . या मार्गावर धावणाऱ्याराज्य परिवहन महामंडळालाच्या  अत्यंत तुरळक बसेसना या ठिकाणी थांबा आहे . तीच गत येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या कोकणगावची.  मी येथील स्थळ दर्शन झाल्यावर पेटपूजेसाठी कोकणगावला थांबलो असता अनेक जवळपास पूर्णतः रिकाम्या असणाऱ्या बसेस या ठिकाणी अत्यंत मोठ्या संख्येने प्रवाशी उभे असताना त्यांना वाकुल्या दाखवत गेल्याचे बघितले आहे  . यात सुधारणा होणे अत्यावश्यक आहे . त्या नंतर मी संगमनेर येथे येऊन माझ्या प्रवाशाची सांगता केली .
              संगमनेर परिसर हा नैसर्गिक विविधतेने नटलेला परिसर मात्र अजूनही पर्यटनास वाव असलेला आणि मुखतः अन्य पर्यटन स्थळांप्रमाणे प्रदूषणाच्या विळख्यात ना सापडलेला परिसर आहे . ज्यांना अल्प खर्चात पर्यटनाचा  आनंद घेयचा असेल त्यांच्यासाठी संगमनेर परिसर नंदनवनच आहे .मग येताना संगमनेर परिसरात . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?