"युद्ध जीवांचे -जैविक आणि आणि रासायनिक युद्धाचा संसर्गजन्य आजार " आजच्या काळात वाचायलाच हवे असे पुस्तक

                   सध्या आपल्या भारतात सर्वाधिक चर्चीला जाणारा विषय कोणता असेल ? याचा धांडोळा घेतला असता आपणास चीनमार्फत जगात पसरलेला कोरेंना व्हायरस याचा विचार करावाच लागतो .  व्हॉटसपव्दारे या विषयी विविध प्रकारची माहिती सांगितली जात आहे . त्यात काही प्रमाणात खोटी माहिती देखील सांगण्यात येत आहे .  या पार्श्वभूमीवर या विषयाची  मराठीत शास्त्रीय स्वरूपाची माहिती देणारे लोकसत्ताचे संपादक श्री गिरीश कुबेर यांचे "युद्ध जीवांचे -जैविक आणि आणि रासायनिक युद्धाचा संसर्गजन्य आजार " या पुस्तकाचे महत्व अधिकच अधोरेखित होते . जैविक युद्ध आणि रासायनिक हल्ल्यासारख्या किचकट आणि काहीसा कंटाळवाणा  विषय या पुस्तकामध्ये अत्यंत सहजसोप्या ओघवत्या भाषेत मांडला आहे . पुस्तकाची भाषा काहीही शास्त्रीय पार्श्वभूमी नसणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींना समजेल अशी असल्याने पुस्तक खूपच रंजक झाले आहे .
             पुस्तकाची बांधणी हार्ड बाउंड पध्द्तीने न करता पारंपरिक पद्धतीने केली आहे . पुस्तकाची रचना दोन भागात केलेली असून पहिल्या भागात  सध्या सर्वांच्या कळीच्या मुद्दा  झालेल्या  जैविक हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे . ज्याचा  सुरवातीला  याचा इतिहास सांगितलं आहे ज्यामध्ये प्राचीन काळाच्या युरोपात पसरल्या एका अनामिक रोगाच्या साथीपासून सध्याच्या काळातील अँथ्रेक्स , सार्स आदी रोगांच्या आढावा घेण्यात आला आहे . जैविक हल्ल्याची संकल्पना ही आधुनिक संकल्पना नसून प्राचीन काळापासून ही संकल्पना अस्तित्वात असल्याचे आपणास या पुस्तकांद्वारे
कळते . फक्त ही संकल्पना प्राचीन काली काहीशी विस्कळीत होती . तीला  व्यवस्थित स्वरूप आधुनिक काळात देण्यात आले इतकाच तो काय फरक  . प्राचीन काळी सुद्धा विविध जैविक हत्यारे वापरण्याचे प्रयोग झाले होते , या बाबत अनेक उदाहरणे या पुस्तकात देण्यात आलेली आहेत . जसे रोमन साम्राजाची विविध युद्धे . गिरीश कुबेर यांच्या या पुस्तकातीलबहुसंख्य उदाहरणे हि युरोप खंडातील किंवा प्राचीन चीनमधील आहेत . त्याच्यातही युरोपातील उद्धरणे संख्यने अधिक आहेत .भारत आणि जपान वगैरे भागात यावेळी काय घडत होते , याविषयी सादर पुस्तकाच्या या भागात काहीच सांगितले नाहीये . प्राचीन काळी संपूर्ण अमेरिका खंड आणि आफ्रिका खंडाचा उत्तर भाग वगळता इतर भाग जगाला माहिती नसल्याने त्या भागाचा प्रश्नच येत नाही . मात्र हान्याय भारत जपान आदी भागाला लावता येत नसल्याने या भागातील युद्धांचा समावेश करण्यात येईल पाहिजे होता असे मला वाटते .
         .  पुस्तकाच्या दुसऱ्या भागात विविध रासायनिक शस्त्रांची माहिती देण्यात आली आहे .ज्यामध्ये जमिनीचा क्रूरकर्मा हिटलर यांनी या रासायनिक शस्त्रांचा कसा,  वापर केला ?  याची माहिती देण्याबरोबर सध्या पोलीस दलांच्यामार्फत सहजतेने वापरात असलेला अश्रूधूर या सारख्या शास्त्रांची माहिती तर देण्यात आली आहेच त्या प्रमाणे अनेक प्राणघातक शस्त्रांची माहिती देण्यात आली आहे . या भागात महाभारताचा उल्लेख करण्यात आला आहे . लेखकाच्या मते प्राचीन इतिहासात याचे फारसे दाखले मिळत नाहीत  सुरवात झाल्यावर हा प्राणघातक शस्त्रांचा वापर सुरु झाला . लेखकाने या प्रकारचानरसंहारककशग्स्त्रांच्या निर्मितीचे श्रेय पुन्हा एकदा पाश्चात्य देशांना दिले आहे , त्यातही याच्या निर्मितीचे पातक प्रामुख्याने जर्मनीच्या माथी मारलें आहे मात्र पुस्तक खूपच माहितीपूर्ण झाले आहे .
               मराठीत अर्थशास्त्र , विज्ञानाच्या संदर्भात शास्त्रीय माहिती देणारी पुस्तके सध्या पूर्वीपेक्षा अधिक संख्येने निघत आहे . त्या पुस्तकांच्या मालिकेतील हे पुस्तक त्याच्या भाषाशैलीमुळे  खूपच रंजक झाले आहे . प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवे . गिरीश कुबेर  त्यांच्या संपादकीयेतून बहुसंख्य लोकांना न रुचणारी मते मांडत असले  तरी त्यांची राजकीय मते बाजूला ठेवून खऱ्या ज्ञानावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीने वाचावेच असे हे पुस्तक आहे . मग कधी घेताय पुस्तक वाचायला .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?