महाराष्ट्राच्या एसटीला पडलेला अजगराच्या विळखा

                                    काल सायंकाळची गोष्ट आहे . सहजच युट्युबवर फेरफटका मारत होतो . त्या फेरफटका दरम्यान एक व्हिडिओ समोर आला . व्हिडीओच्या पार्श्वभुमीवर  परीवहन महामंडळाच्या बसेस दिसत  असल्याने उत्सुकतेपोटी व्हिडीओ बघीतला .आणि क्षणभर काय प्रतिक्रिया द्यावी, हे सुचेनाच. व्हिडीओमध्ये नाँर्थ वेस्ट कर्नाटक स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कार्पोरेशनचा एका बसविषयी माहिती सांगण्यात आली होती . सदर बस निपाणी येथून सुटुन 500 किमीचा प्रवास करत महाराष्ट्राचा औरंगाबाद येथे जात होती . मित्रांनो तूम्हाला यात फारसे वावगे वाटणार नाही कदाचित .पण मित्रांनो सदर बस जे 500 किमीचा प्रवास करत होती , त्यातील महाराष्ट्राचा वाटा होता 485 किमीचा , तर कर्नाटकाचा वाटा होता फक्त 15 किमीचा .या बसचे वेगळेपण इथेच संपत नाही . सदर बसचा मार्ग देखील महाराष्ट्राचा प्रचंड अभ्यास करून काढला असल्याचे दिसत होते . महाराष्ट्रात कोल्हापूर येथे आल्यावर  नेहमीचा कोल्हापूर पुणे अहमदनगर अशा मार्ग न निवडता सातारा फलटण नीरा दौड अहमदनगर अशा महाराष्ट्राचा ग्रामीण भागातून जाणारा मार्ग त्यांनी
निवडला होता . मी एकदा पुण्याचा स्वारगेटवर बस स्टॅन्डवॉर बेळगाव औरंगाबाद अशी बस बघितली होती . त्यावेळे महाराष्ट्रातील सर्वमान्य मार्गावरून जात असल्याने फारसे वैषम्य वाटले नव्हते . काल मात्र युटूबवरील व्हिडीओ बघितला आणि मी अवाक झालो .
               समुद्रात तरंगणाऱ्या हिमनगाचा दहापैकी एक भाग हा समुद्राच्या पाण्याच्या पातळीवर तरंगत असतो तर उरलेला दहापैकी नऊ भाग हा पाण्याचा खाली असतो . मला काल व्हिडिओत दिसलेल्या भागाला जर हिमनगावरील वर दिसणारा भाग समजले तर आपणास समजेल की अन्य राज्याच्या परिवहन सेवेने आपल्या
महाराष्ट्रात किती खोलवर हातपाय पसरले आहेत . महाराष्ट्राच्या मुख्य मार्गावर सहज दिसेल म्हणून अन्य राज्यांच्या परिवहन सेवांनी ग्रामीण मार्गावर सेवा देण्यास सुरवात केली आहे आपण एकवेळ खाजगी बस चालकांना आपल्या बस स्टॅन्डपासून लांब राहायला भाग पडू शकतो . मात्र तो न्याय या अन्य राज्यातील बस चालकांना लावणे खूप कठीण आहे . हे बस चालक आपल्या मालकीच्या बसस्टॅण्डमध्ये आपल्या बसच्या शेजारी त्यांची बस लावून आपले प्रवाशी पळवतात. माझ्यामते बलाढ्य अजगराच्या ज्याप्रमाणे एकाद्या प्राण्याला विळखा पडल्यावर त्यातून त्या प्राण्याची सुटका होणे खूप कठीण असते . त्या प्रमाणे महाराष्ट्र एसटीला अन्य राज्याच्या परिवहन महामंडळारूपी अजगरचा विळखा पडला आहे . ज्यातून आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची सुटका होणे अत्यावश्यक आहे . आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकरिता हि करा अथवा मरा अशी स्थिती आहे . आज आपण काही पाऊले उचलली नाहीत . तर आपले महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ इतिहासजमा झाले म्हणून समजा . ते तसे होऊ नये म्हणून चला उठा आपण सर्व जनमताचा रेटा उभारून अन्य राज्यांचा बस सेवेच्या मगरमिठीतून आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेला बाहेर काढूया

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?