मी अनुभवलेल्या वृत्तवाहिन्या

                 काल रात्रीची गोष्ट आहे . नेहमीप्रमाणे भारतीय मनोरंजन वाहिन्यांवर तसेच भारतीय वृत्तवाहिनीवर रटाळपणा सुरू असल्याने मी टिव्हीवर आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्या बघायला सुरवात केली .या सर्फिंग दरम्यान मला सिंगापूर येथील "चँनेल न्युज एशिया "या वृत्तवाहिनीवर Politics on climate change या नावाचा कार्यक्रम दिसला . त्या कार्यक्रमांमध्ये बदलत्या हवामान बदलामूळे पाकिस्तानातील गरीब जनतेला किती हाल अपेष्टांना सामोरे जावे लागतेय, गिलबिल बाल्टीस्तान, आझाद काश्मीर भागातील हिमनग किती वेगाने वितळत आहे. यावर भाष्य केले होते .कार्यक्रमात, काय सांगितले? कोणावर टिका, केली? यावर नंतर बोलेल .मला तूमचे लक्ष वेधून घेयचे आहे , ते कार्यक्रमाच्या विषयाकडे .
                चँनेल न्युज एशिया या वृत्तवाहिनीवरील अस्या कार्यक्रमाला रिपोर्ताज म्हणतात .भारतीय दुरचित्रवाणी वाहिन्यांवर "रिपोर्ताज " हा प्रकार फारच अभावाने दिसतो. त्यातही भारतात दिसतो तो दुरदर्शनचा डि डी इंडिया, डिडी भारती या वाहिन्यांवर . अन्य खासगी वृत्तवाहिन्यांवर मलातरी असे कार्यक्रम आढळले नाहीत . जर कोणाला आढळले असतील तर त्यांनी ते त्यांनी या ब्लॉग पोस्ट खाली सांगावे .त्यांचे स्वागतच आहे .
                         चँनेल न्युज एशिया या सिंगापूर या वृत्तवाहिनीने पाकिस्तानमधील जलसंकटावर भाष्य केले. आपण भारतातील एखाद्या समस्येवर असे रिपोर्ताज सहजतेने तयार करु शकतो. मी जेव्हढ्या वृत्तवाहिन्या
बघतो, त्यातील सुमारे 90%कालावधी माझ्यासमोर विविध राजकीय बातम्या येतात.काही बातम्या मनोरंजन स्वरुपाच्या असतात .मन प्रसन्न करणाऱ्या ,किंवा ज्ञानात खरोखरीच भर टाकणाऱ्या बातम्यांचे प्रमाण अतिशय कमी असते.
                              आपण अनेकदा प्राचीन इतिहासातील गुप्त काळाचा सुवर्णयुगाचा उल्लेख करतो. मात्र ते लयास का, गेले? याचा विचार केला असता आपणास सहज लक्षात येते की, आपण अन्यत्र जगात काय चालू आहे, याबाबत अनास्था जोपासली, आणि आपले वैभव लयास गेले .जी परंपरा आज देखील सुरु आहे ,असे मला राहुन राहुन वाटते आहे .अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्षांवर महाभियोगाचा खटला चालला , किंवा आता अमेरीकेत राष्ट्रपती निवडणूकीच्या निवडणूकपूर्व घडामोडींना चांगलाच वेग आलाय .मात्र आपल्या मराठी माध्यमांमध्ये याबाबत अनास्थाच दिसतेय असो. याबाबत खुप काही बोलता येवू शकते. सध्याच्या वृत्तवाहिन्या या ज्ञानवर्धक नसून करमणूकवर्धक झालेल्या आहेत .हेच खरे  हे समाजमाध्यमावरील लेखन आहे.याचा विस्ताराबाबत काही मर्यादा आहेत.तरी तूर्तास ईथेच थांबतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?