वंदन क्रांतीकारी विज्ञानप्रेमीला

                    आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तेजस्वी व्यक्तिमत्वांची  जर आपण यादी केली  तर ज्यांचे नाव आपणास अग्रक्रमाने घ्यावेच लागेल असे व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर . कोणत्याही धार्मिक पूजेच्या वेळी अग्रक्रमाने पुजल्या जाणाऱ्या  गणपतीचे नाव घेऊन जन्माला आलेल्या नाशिकच्या या सुपुत्राने आपल्या प्रखर ज्वाज्वल्य देशभक्तीने देशभक्तीच्या एक मापदंडच आपल्या कृतीतून घालून दिला . स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फक्त देशभक्तीचा मापदंडच आखून दिला असे नाही . तर समस्त पृथ्वीवर फक्त मानवास लाभलेल्या बुद्धी या शास्त्राचा वापर करत मानवाचे नीतिनियम  निश्चित करणाऱ्या धर्माची चिकित्सा करून त्यास कालसुसंगत कसे करावे ?  याचा वस्तुपाठ देखील त्यांनी घालून दिला .
                    सावरकरांनी आपल्या प्राचीन वारसा लाभलेल्या हिंदू धर्मातील कालसुसंगत नसणाऱ्या  चालीरीतींना  तिलांजली देत त्यास खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक बनवले . त्यासाठी त्यांनी रत्नागिरीला सर्व जाती धर्माना प्रदेश असणारे पतित पावन मंदिरांची स्थापना केली , तसेच आपल्या धर्मांची प्रखर चिकित्सा करत त्यातील अनावश्यक परंपरांवर सडेतोड टीका करणारे लेखन केले . आपल्या दुर्दैवाने त्यांनी प्रस्तावित केलेल्या धार्मिक सुधारणांपैकी फारच कमी समाजमान्य पावल्या . जरी  त्यांच्या सर्वांच्या सर्व सुधारणा अमलात येणे अवघड असले तरी शक्य तेव्हढ्या जास्तीत जास्त सुधारणा जर समाज मान्य झाल्या असत्या तर आज समाजात दिसणारे चित्र खूपच आशादायक असते , यात माझ्या मनात तरी शंका नाही .
              स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्या हिंदुत्तवाची उभारणी केली त्याचा पाया विज्ञान हा होता .आपल्या
भारतीय राज्यघटनेतसुद्धा 51A मध्ये सुद्धा नागरिकांनी आपली विचारसरणी विज्ञानाला पूरक करावी असे सांगितले आहे . मित्रानो विज्ञान या विषयांचे शिक्षण घेणे आणि विज्ञानाला पूरक विचारसरणी करणे या पूर्णतः भिन्न बाबी आहेत . विज्ञानाला पूरक विचारसरणी अंगीकारणे या मध्ये बुद्धीला प्रश्न पडण्याची सवय अंगी लावणे  , प्रत्येक गोष्टीवर अंध विश्वास न ठेवता त्याची तर्कसुसंगत पध्द्तीने उभारणी करून बुद्धीला पटले तरच त्यांचा अवलंब करणे , या बाबी अंतर्भूत आहेत . या बाबी जर प्रत्येक भारतीयांनी आत,आत्मसात केल्या तर ती स्वातंत्रवीर सावरकरांना खऱ्या रथाने आदरांजली ठरेल असे मला वाटते . आजच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीदिनी त्यांना वंदन करून सध्यापुरते थांबतो 
जय स्वातंत्र्यवीर सावरकर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?