ओळख एका वन कथा संग्रहाची


              मारुती चितमपल्ली....... पेशाने वनखात्यात वरिष्ठ पदावर कार्यरत असणारे मराठीतील नामवंत साहित्यिक . अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्याक्ष . जंगले आणि त्यातील समाजजवीन तसेच  प्राणीजीवनावर आधारित साहित्य जगविख्यात आहेत . त्यांच्या \प्रसिद्ध असणाऱ्या साहित्यामध्ये "केशराचा पाऊस " या कथासंग्रहाचा बराच वरचा क्रमांक लागतो . सध्याच्या लोकडाऊनच्या काळात मी ते पुस्तक   नुकतेच वाचले .
                          पुस्तकात त्यांच्या नोकरीच्या कार्यकाळाळतील आठवणी कथारूपाने सांगण्यात आलेल्या आहेत . पुस्तकात 16कथा असून पहिल्या दोन कथांमध्ये अनेक प्रकरणे आहेत .  पुस्तकाची भाषा संवादी असल्याने पुस्तक जरी माहितीविषयी असले तरी पुस्तक वाचणे कंटाळवाणे न होता ज्याला  ज्ञानवर्धक (  INFOTAINMENT ) म्हणता येईल असे झाले आहे .सदर पुस्तकामध्ये त्यांनी स्वतःचा उल्लेख माधव असा केला असून . या कथासंग्रहातील कथांमध्ये सुरवातीच्या 9 कथांमध्ये नायका बरोबर त्याची नायिका "सुमित्रा  यांच्या भावविश्वाचा आधार घेत लेखक मेळघाटातील वनांची तेथील प्राण्यांची वैशिष्ट्ये अलगदपणे उलगडली आहेत , ज्यामध्ये अस्वलाशी कसे वागावे ? मेळघाटातील आदिवासी जनतेचे जीवन कॊणत्या प्रकारचे आहे ? तेथील वनस्पती जीवन कोणत्या प्रकारचे आहे ? भारतातील वन खात्यातील अधिकाऱ्यांचे जीवन कसे असते ?जंगलात कसे वागावे ? जर जंगलात काही अडचण आल्यास त्यास कोणत्या प्रकारे तोंड देता येऊ शकते ?  आदी मुद्यांशी आपली ओळख होते ?

      पुस्तकाच्या 10ते 16 क्रमांकाच्या कथा या कोणत्याही एका नायका अथवा नायिका भोवती गुंफलेल्या नाहीत . या कथांमध्ये प्रत्येक कथाच नायक वेगळा आहे . काही कथांमध्ये तर नायिकेचा उल्लेख देखील करण्यात  आलेला नाहीये . पहिल्या भागाच्या तुलनेत या भागातील कथा काहिस्या कंटाळवाण्या वाटतात . मात्र पहिल्यादाच सांगितल्याप्रमाणे संबंध पुस्तकातील भाषा संवादी असल्याने पुस्तकाची रंजकता कमी होत नाही . या कथांमध्ये मेळघाट परिसरातील आदिवासींच्या खाद्य संस्कृती , तसेच वनाधिकाऱ्याचे कार्य अधिक पहिल्या भागापेक्षा  विस्तुतपणे सांगितले आहे . तसेच मेळघाटच्या आदिवासी भागातील विविध लोककथा , समजुतीवर भाष्य करण्यात आले आहे .
            दोनशे पानाच्या या पुस्तकात असणाऱ्या सर्वच कथा या ज्ञान देणाऱ्या आहेत . काही कथांमध्ये विविध तत्वज्ञानाची चर्चा देखील करण्यात आली आहे . एकंदरीत सदर पुस्तक किमान एकदा तरी वाचावे या सदरामध्ये मोडणारे आहे . तर मग वाचताय ना हे पुस्तक मिळवून


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?