नेपाळचे बदलते रंग

         
                         सध्या समस्त मराठी वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रे करोनाविषयी वृत्तांकन करत आहेत , हे आपण जाणतातच. करोना महाभयंकर आहेच यात शंका नाही , मात्र त्याचबरोबर भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधावर  परिणाम करणाऱ्या घटना देखील घडत आहेत . भारताचा एक शांततापूर्ण शेजारी देश अशी ख्याती असणाऱ्या नेपाळ या देशात घडलेल्या काही भारतविरोधी घटना या त्यापैकीच एक
              भारत नेपाळ सीमा ही एक खुली सीमा असली तरी,  त्यामध्ये उत्तराखंड राज्याला लागून असणाऱ्या भारत नेपाळ सीमेवरील  सुमारे 400चौरस किलोमीटर क्षेत्राबाबत दोन्ही देशात मतभेत आहे . गेल्या दीड एक  वर्षांपासून  हे मतभेद अधिक तीव्र स्वरूप धारण करत आहे . सध्याच्या घडामोडी या याचा क्षेत्राशी संबंधित आहे . आणि या वादाला पार्श्वभूमी आहे ती ब्रिटिश भारत आणि नेपाळ या दरम्यान झालेला करार . या करारान्वये भारत , नेपाळ आणि चीन या तीन देशाच्या सीमारेषा ज्या भागात
एकत्र येतात , त्या भागात उगम पावणाऱ्या काली नदीच्या  ( या नदीला इतर नावानी सुद्धा ओळखतात . मात्र आधिक प्रचलित नाव काली नदी हे आहे )  डाव्या तीरापर्यंत नेपाळची हद्द तर उजव्या तीरापासून भारताची हद्द असे मान्य करण्यात आले आहे . जे दोन्ही देशांना मान्य आहे . वादाचा मुद्दा हा आहे की काली नदी म्हणून कोणता प्रवाह मानायचा ? नेपाळ त्या प्रदेशातील लिपू लेक नावाच्या तळ्यापासून सुरु होणाऱ्या प्रवाहाला काली नदी मानतो , तर भारताची भूमिका त्या प्रवाहापासून नेपाळच्या हद्दीतील एका प्रवाहाला काली नदी म्हणून ओळखण्यात यावे अशी आहे .
                       हा झाला इतिहास, आता वळूया सध्याच्या घडामोडींकडे .  काश्मीर  पुनर्गठित झाल्यावर तसेच  दादरा नगर हवेली आणि दमन दीव  या दोन  केंद्रशासित प्रदेशांचे एकत्रीकरण केल्यावर भारत सरकारने आपल्या भारताचा नकाशा प्रकाशित केला होता . या दोन्ही वेळेस नेपाळच्या हद्दीतील प्रदेश भारताने आपल्या हद्दीत दाखवला आहे , अशा आरोप नेपाळच्या परराष्ट्र खात्याने केला . जो अर्थातच भारताने फेटाळला . गेल्या पंधरा
दिवसात यात अनेक घडामोडी झाल्या . कैलास मानसरोवर यात्रेला जाणाऱ्या भाविकांना सोईस्कर व्हावे . यासाठी भारताच्या सीमा सुरक्षा दलाने उत्तराखंडमध्ये एक रस्ता तयार केला . हा रस्ता नेपाळच्या हद्दीतील असून हे नेपाळच्या सार्वभौमित्वावर भारताने केलेले आक्रमण आहे . अशी भूमिका यावेळी नेपाळने घेतली . नेपाळच्या संसदेत याचे तीव्र पडसाद उमटले . नेपाळाच्या सर्वसामान्य जनतेने करोनाच्या काळात देखील रस्त्यावर उतरून याचा निषेध केला . सध्या नेपाळमध्ये चीन धार्जिणी भूमिका घेणाऱ्या पक्षाचे सरकार आहे . त्या सरकारने या प्रश्नाबाबत भारताला धारेवर धरू अशी ग्वाही संसदेत दिली आहे .
           भारतात मोठ्या संख्येनं नेपाळी नागरिक वास्तव्यास आहेत . नेपाळच्या आंतरराष्ट्रीय व्यापारापैकी मोठ्या प्रमाणात व्यापार भारताशी होतो . भारतीय लष्करात नेपाळी रेजिमेंट आहे  या बाबी लक्षात घेऊन सुद्धा नेपाळने आपली भूमिका भारतविरोधी केली आहे , हे विशेष लक्षात घेण्यासारखे आहे . भारत सध्या आपल्या शेजारी असलेल्या देशाबरोबरचे तंटे मिटवत आहे , त्या प्रमाणे हा तंटा सुद्धा शांततेत मिटेल अशी खात्री बाळगूया . सध्यापुरते इतकेच , नमस्कार


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?