भारतीय रेल्वेचे पाऊल पडते पुढे

         
       सध्या करोनमुळे आपल्या भारतातील औद्योगिक क्षेत्र काहीसे मंदावले असले तरी , भारतीय रेल्वेवर त्याचा काहीच परिणाम झालेला दिसून येत नाहीये , उलट भारतीय रेल्वे अधिक वेगाने प्रगती करत आहे, असेच म्हणावे लागेल अशी आजची स्थिती आहे . 26  एप्रिलला आतापर्यंतच्या  मालवाहतुकीसाठी सर्वात वेगवान अश्या WAG 9HH या रेल्वेइंजिनची यशस्वी चाचणी करून महिना पूर्ण होण्याचा आधीच 19एप्रिलला आपल्याला WAG 12B या तस्यांचं वेगवान इंजिनाची काही अपयशी चाचण्यांनंतर यशस्वी चाचणी केल्याची शुभवार्ता रेल्वेकडून देण्यात आल्याने  करोनामुळे  भारतात सध्या सुरु असलेल्या लॉकडाउनचा  काहीही परिणाम न   झाल्याचे स्पष्ट होत आहे .
               भारतात मालवाहतूक आणि प्रवाशी वाहतूक  यांना एकमेकांच्या अडथळा होऊ नये ,  रेल्वेच्या  महसुलात सर्वाधिक वाटा असणारी मालवाहतूक अधिक वेगवान व्हावी , रेल्वेच्या मालवाहतुकीमुळे रस्तेमार्गे होणारी अवजड ट्रकांची कमी होऊन रस्ते अपघात कमी व्हावे , या उद्देश्याने उभारण्यात येणाऱ्या DFCसाठी खास तयार करण्यात आलेल्या या इंजिनच्या यशस्वी चाचणीमुळे भारतीय रेल्वेत एक मैलाचा दगड गाठला गेला आहे , असे म्हटल्यास वावगे ठरू नये . 
                       एका   फ्रेंच  कंपनीच्या  मदतीने तयार करण्यात आलेल्या या इंजिनात रेल्वे डायव्हरसाठी स्वच्छता गृहाची सोय करण्यात आलेली आहे , जी अन्य भारतीय  रेल्वे इंजिनात नसते .  या रेल्वे इंजिनामुळे सुमारे 7000 टनमाल  100किमी प्रति तास या वेगाने एका ठिकाणाहून नेता येणार आहे . 12000 अश्वशक्तीच्या या रेल्वे इंजिनात प्रत्येकी 6000 अश्वशाक्तीचे दोन इंजिने एकमेकांना जोडण्यात आलेली आहेत . जी सोयीनुसार एकावेळी  एक अथवा दोन्ही या प्रकारे वापरता येऊ  शकतील.  जरी एक इंजिन वापरले तरी दुसऱ्या इंजिनाच्या वजनामुळे टॉर्क वाढून  फायदाच  होणार आहे . आपल्या भारताच्या इतर रेल्वे इंजिनमध्ये चालकाला इंजिनच्या एका  टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जायचे असल्यास  इंजिनाच्या बाहेर यावे लागते , या इंजिनात असे करावे लागणार नाही . रेल्वेच्या नियोजनानुसार हे इंजिन प्रामुख्याने प्रामुख्याने पूर्व बाजूच्या DFC साठी हे वापरण्यात येणार आहे . बिहार राज्यातील माधेपुरा येथे  या इंजिनाच्या निर्मिती आणि देखभालीसाठी स्वतंत्र सोय करण्यात आलेली आहे 
                        हे इंजिन  मुळात सन2017मध्ये भारतीय रेल्वेत दाखल होणार होते , मात्र त्याचा त्यावेच्या चाचणी दरम्यान काही तांत्रिक अडचणी आल्याने त्याचा भारतीय रेल्वेतील प्रवेश बारगळला , जो आता होत आहे . "मात्र  देरसे आये मगर दुरुस्त आये ". त्या हिंदी म्हणी प्रमाणे त्याच्या येण्यामुळे भारतीय रेल्वेचा चेहरामोहराच बदलेल यात शंका नाही . जगातील सर्वात मोठा सार्वजनिक उपक्रम  असणाऱ्या आपल्या भारतीय रेल्वेचा अश्व    अशाच उधळावा अशी सदिच्छा व्यक्त करून सध्या पुरते थांबतो , नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?