भारताची खेळी आणि चीनची कोंडी


           सध्या आपल्या भारताच्या शेजारील  असलेले सबंध एका महत्तवाच्या वळणावर आहेत . चीन या देशाबाबत तर अनेक घडामोडी घडत आहे .त्यातील मोजक्या घडामोडीबाबत मराठी प्रसारमध्यमांमध्ये भाष्य करण्यात आले . ज्या घडामोडीबाबत माध्यमांमध्ये सांगण्यात आले त्यामध्ये नेपाळची घुसखोरी, चीन आणि भारतीय लष्कर यामध्ये झालेली झडप आदी मुद्यांचा समावेश करता येतो.मात्र याखेरीज एका महत्तवाच्या मुद्याबाबत मराठी माध्यमांमध्ये काहीही सांगण्यात आलेले मला दिसले नाही, तो म्हणजे तैवान या देशाच्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीला लोकसभेच्या  दोन खासदारांनी लावलेली उपस्थिती .दिल्ली येथून भाजपाच्या खासदार असणाऱ्या मिनाश्री लेखी.आणि राजस्थानतील चुरू येथून  भाजपाचे खासदार असणारे राहुल  कास्वा . ते दोन खासदार.
                                              मित्रांनो, आपण ज्याला चीन म्हणतो  ज्याचे अधिकृत नाव आहे ,पिपल्स रिपबल्कीक आँफ चायना (PRC)या देशाचे स्वतंत्र तैवानबाबत धोरण अत्यंत आक्रमक आहे .PRC तैवान ला स्वतंत्र देश न मानता आपल्याच देशातील फुटून निघालेला प्रांत मानतो . जो देश तैवानशी  राजकीय संबंध ठेवू इच्छितो, त्या देशासी Pepole's Republic Of China आपले राजकीय आर्थिक आणि सर्व प्रकारचे  संबध तोडून
टाकतो. चीनच्या आर्थिक ताकदीमुळे फारच कमी देश अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल इतकेच देश आपले संबंध तैवानशी ठेवतात
            .तर तैवान या नावाने परीचित असलेला ज्याचे अधिकृत नाव आहे, Republic Of China (ROC) या देशातील राष्ट्राध्यक्षांनी नुकतीच आपल्या पदाची शपथ घेतली .सध्याचा सर्वसाधरण संकेत आहे की, जेव्हा एखाद्या देशाचा राष्ट्राध्यक्ष आपल्या पदाची शपथ घेतो , त्यावेळी अन्य देशाचे राष्ट्रप्रमुख त्या सोहळ्याला उपस्थिती लावतात,त्या प्रथेप्रमाणे जेव्हा तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या पदाची शपथ घेतली , तेव्हा भारताचे दोन खासदार त्या शपथविधीला इंटरनेटच्या माध्यम्यातून उपस्थित होते.हे एक प्रकारे चीनला आपल्या सरकारचे खणखणीत उत्तरच म्हणावे लागेल , चीनच्या दादागिरीला दिलेले .
                             आता या मागचा इतिहास बघूया  1949ला चीनमध्ये कम्युनिष्ट पक्षाच्या सरकारची
चीनच्या मुख्य भुमीवर सत्ता स्थापन झाल्यावर तेथील मुळ सरकारने मुख्य भुमीच्या जवळ असणाऱ्या बेटावर आपले सरकार स्थापन केले तेच तैवान (अर्थात Republic Of China )होय. 1978पर्यत आपण ज्या देशाला चीन असे संबधतो, त्या देशाला अर्थात PRC ला जागतिक मान्यता नव्हती,समस्त जग चीन म्हणून तैवानला (ROC) ओळखत होते .मात्र भारताच्या पुढाकाराने जग PRC चीनला मान्यता देयला लागले . मात्र कालांंतराने आपण ज्याला चीन म्हणतो त्या Peoples' Republic of China चे महत्त्व वाढत गेले .आणि मुळच्या चीनचे अर्थात तैवानचे (मुळात जो देश लोकशाहीवादी आहे. जिथे दर चार वर्षांनी राष्ट्राध्यक्ष निवडला जातो. )महत्त्व कमी होत गेले .            
              भारताच्या तैवानच्याबाबत घेतलेल्या या भूमिकेममुळे ( राष्ट्राध्यक्षांच्या शपथ सोहळ्यात आपले अस्तित्व जाणवून देणे )   भारत आपली चूक सुधारत असल्याचे दिसत आहे .चीनच्या ड्रँगनला वेसन घालण्याचे हे प्रयत्न यशस्वी होवोत याबाबत इश्वरचरणी प्रार्थना करुन सध्यापुरते थांबतो, नमस्कार .


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?