आठवणी चीनच्या दडपशाही च्या

                   
 सध्या समस्त जगत करोनामुळे चीन विरोधात एकवटले आहे. करोनाबरोबर आपल्या भारताच्या सिमेवरील तणावामुळे आपल्या भारतात चीन विरोधाची धार अधिकच तीव्र आहे ,आणि तेही जून महिन्यात . मित्रांनो तूम्हाला वाटेल मी जून महिन्याचा उल्लेख का केला ?तर याच जून महिन्यात चीनने आजपासून बरोबर तीस वर्षापूर्वी आपल्याच नागरीकांना रणगाड्याखाली चिरडले होते . सन 1989ला तीन जूनच्या रात्री, चार जूनच्या पहाटे चीनच्या राजधानीत बिजींगमध्ये हे हत्याकांड घडले होते . यावेळी चीनने आपल्याच किती नागरीकांना मारले याबाबत हजारो ,ते लाखोपर्यत विविध दावे केले जातात. याचा अधिकृत आकडा अद्याप कोणालाच माहिती
नाही. याला तिआनमेन स्केअर हत्याकांड म्हणून ओळखले जात  सध्या चीनच्याच हाँगकाँंगमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर  याची आठवण होणे स्वाभाविक आहे.
                  मित्रांनो हे हत्याकांड झाले होते, चीनमध्ये लोकशाही प्रस्थापित व्हावी,यासाठी लढणाऱ्या आंदोलकाचे. 15एप्रिल 1989पासून सुरु असलेल्या या आदोंलनाची अखेर आंदोलकांच्या मागण्या मान्य न होता, त्यांच्या मृत्यूत झाली. यामुळे चीनमधील तरुणाइचा आवाज दाबला गेला . सध्या हाँगकाँंगमध्ये जी निदर्शने सुरु आहेत, त्याची सुरवातीची अपयशी ठरलेली आवृत्ती म्हणून याकडे बघता येईल .त्यानंतर चीनमध्ये लोकशाहीच्या हक्कासाठी कोणतेही मोठे आंदोलन झाले नाही, नाही म्हणायला एखाद  दुसरे वैयक्तीक आंदोलने झाली , झाली मात्र ती सहजतेने चिरडून टाकण्यात आली.
                         ंया हत्याकांडाचा विचार करता,  त्या दरम्यान जगभरात सुरू असणाऱ्या विविध आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर  चीनमध्ये आंदोलन होणे क्रमप्राप्त होते, आणि तसेच झाले .सेव्हियत युनियनचे लोकशाही मार्गाने विघटन, जर्मनीचे लोकशाही मार्गाने एकत्रीकरण  या समकालीन घटनांचा परीपक्षेत या घटनांचा विचार केला असता ,आपणास या घटनेमागची गुंतागुंत समजते. बाहेर लोकशाही नांदत असताना आपल्या चीनमध्येही ती नांदावी, यासाठी केलेले हे आंदोलन होते .जे चीनने निर्दयीपणे चिरडले. त्याचा 30व्या स्मृतीदिनानिमित्त यात बळी गेलेल्या अभागी जिवांना भावपुर्ण श्रद्धांजली, वाहून सध्यापुरते थांबतो, नमस्कार .




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?