मार्टिन ल्युथर किंग परत या

                       सध्या जगात करोना व्यतिरीक्त काय चालू आहे? ,  याचा आढावा घेतल्यास अमेरीका या देशात हिंसक रुपात सुरु असणाऱ्या वर्णसंघर्षाची अग्रक्रमाने नोंद घ्यावीच लागेल. एका कृष्णवर्णीय व्यक्तीला 20डाँलरची बनावट नोट दुकानदाराला देण्याचा आरोपावरुन श्वेतवर्णीय पोलीसांनी अटक करुन,  केलेल्या माराहणीत संबधीत व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे तेथील जनमत प्रक्षुब्ध होउन हिंसाचार  उसळला आहे .या हिंसाचारामुळे तेथील 20 राज्यातील 40 शहरामध्ये संचारबंदी लावण्याची वेळ आली आहे
                                  हा तोच अमेरीका देश आहे, ज्या देशामध्ये विसाव्या शतकाच्या साठाव्या दशकाच्या अखेरीस आणि सतराव्या दशकाचा प्रारंभीच्या वर्षात अमेरीकन गांधी, असी ओळख असणाऱ्या मार्टिन ल्युथर किंग यांनी वर्णभेदाचा विरोधात शांततेच्या मार्गाने लढा उभारला होता .सध्याच्या अमेरीकेतील हिंसाचार बघून त्याची प्रकर्शाने आठवण येते .त्याकाळी सार्वजनिक बसवाहतूकीत श्वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय अमेरिकीन व्यक्तींची आसनव्यवस्था वेगवेगळी असे, एकदा एका श्वेतवर्णीय व्यक्तीला बसमध्ये जागा न दिल्याबदल एका कृष्णवर्णीय महिलेला बसमधून उतरवून दिल्याने तरुण असलेल्या मार्टिन ल्युथर किंग यांचे रक्त
सळसळले , आणि त्यांनी शांततेच्या मार्गाने निदर्शने करत कृष्णवर्णीय यांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारला ज्यात ते यशस्वी झाले , आणि अमेरीकेतून ती प्रथा दुर झाली. मात्र एका माथेफिरूने त्यांच्यवर गोळ्या झाडून त्यांचा खुन केला . परीणामी मार्टिन ल्युथर किंग यांचा लढा संपुष्टात आला. सध्या अमेरीकेत सुरु असणाऱ्या हिंसक आंदोलनामुळे या इतिहासाची पुन्हा एकदा आठवण होतेच .
                      खरेतर वर्ण , जात, धर्म यावरुन कोणत्याही, मानवांमध्ये भेदाभेद करणे चुकीचेच . आपल्या भारतात जातीवरुन भेदाभेद करण्यात आला, तर अमेरीकेत त्वचेचा रंग अर्थात वर्णावरुन भेदाभेद करण्यात आला . करोना, हवामान बदल अस्या जागतिक संकटाविरूद्ध लढा देण्यासाठी समस्त लोक एकत्र येणे आवश्यक असताना लोक अजूनही मध्ययूगीय संकल्पनेवरुन भांंडत असताना बघून.म्हणावेसे वाटते , "मार्टिन ल्युथर किंग परत या" .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?