सुशांत सिह राजपुतचा अकाली जाण्याने निर्माण झालेले प्रश्न (भाग2)

                                                                 
      आज दिवसभर समाजमाध्यमांमध्ये अभिनेता सुशांतसिंग राजपुत याचा आत्महत्येबाबत विविध पोस्ट वाचायला मिळाल्या .काही पोस्टमध्ये त्यास जगण्यास नालायक, पळपुटा अशी विशेषणे दिली गेल्याचे आढळले. त्याच्यापेक्षा अधिक अडचणीत दुःखात लोक असतात ,मात्र ते आत्महत्या करत नाही, तर सुशांतसिंग याने ती का केली,म्हणून प्रश्न उपस्थित केलेले आढळले .मात्र त्याच्यावर टिका करत असलेल्या कोणीही काही मुलभुत प्रश्नांकडे बघीतले नाही . त्या मुलभुत प्रश्नांकडे बघण्यासाठी हे आजचे लेखन
                                                     आपल्याला साधे खरचटले,थोडेसे कापले तरी काही व्यक्ती त्या भागास किती मोठे बँंडेज लावतात, हे आपण बघतोच . इथे प्रश्न जीवाचा होता . अकबर आणि बिरबलाच्या कथेतील हौदातील माकडणीची गोष्ट आपल्याला माहिती आहेच, प्रत्येकाला आपला जीव प्रिय असतो, हेच या कथेत सांगितले गेले आहे कथेतील माकडीण आपला जीव वाचवण्यासाठी अखेर आपल्या पिल्लाचा जीव घेण्यासही कमी करत नाही, म्हणजेच कोणी स्वतःहुन आपला जीव सहजासहजी देणार नाही .तर तो वाचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करेल . मग अश्या स्थितीत  सुशांतसिंग राजपुतने आत्महत्या का करावी ? याचा विचार या
पोस्टकर्त्यांनी केलेला दिसत नाही . आत्महत्या हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही,हे मान्य केले तरी एखादी व्यक्ती आपला जीव स्वतःच घेण्यास कशी धजावते याचा विचार करायलाच हवा जो त्याचावर दोषारोप ठेवणाऱ्या व्यक्तींनी केलेला नाही. हे उघड उघड दिसत आहे .
                  याशिवाय मला मला प्रामुख्याने फेसबुकवर एक ट्रेड दिसला तो  म्हणजे तूम्हाला जर नैराश्यगस्त वाटले तर मला फोन करा .जो अत्यंत हास्यास्पद असल्याचे मला वाटते .मी पुण्यात शिकत असताना माझ्या एका मित्राचा मित्राने आत्महत्या केली होती . आत्महत्या केलेल्या मुलाशी माझादेखील संपर्क होता , आत्महत्या करण्यापुर्वी तो मुलगा फारसा कोणाशी संपर्क साधत नव्हता, त्याच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केल्यास तो फारसे काही बोलत नव्हता ,त्याची समस्या आम्ही तो जे सांगत आहे , त्यावरुन तर्क लावून सोडवावी , असे त्यास वाटत असावे,  असे  त्याचे वर्तन
होते. अस्या स्थितीत ज्या व्यक्तीला नैराश्यगस्त वाटत आहे, ती व्यक्ती एखाद्यासी स्वतःहुन संपर्क करेल असी अपेक्षा धरणे चुकीचे आहे, असे मला वाटते . असो. 
मुळात आपल्याकडे विविध मानसिक आजारांना निकोप दृष्टीने बघितले जात नाही.जसे शरीराला रोग होवू शकतात . त्याचप्रमाणे ते मनाला देखील होवू शकतात, हा सहजभाव आपल्या भारतात त्यातही उत्तर भारतात येणे अत्यावश्यक आहे सुशांतसिंग राजपुत याचा आत्महत्येमुळे निर्माण झालेले वादळ याबाबत काही कार्यवाही करेल, असी आशा व्यक्त करुन सध्यापुरते थांबतो , नमस्कार . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?