कालिदास दिन चिरायू होवो

   
                 येत्या सोमवारी अर्थात 22जूनला आषाढ महिना सुरु होत आहे .आषाढ महिन्याचा पहिला दिवस कालीदास दिन म्हणून साजरा करण्यात येतो . कालीदास संस्कृत भाषेतील एक अजरामर कवी .जन्मतः मेंढपाळ म्हणून जन्माला आलेला एक अशिक्षीत व्यक्ती , राजकन्या असलेल्या पत्नीने अशिक्षीत असलेच्या कारणावरून अपमानित केल्यावर काली देवीची उपासना करुन विद्वान झालेला कवी म्हणजे कालीदास . जर्मन भाषेतील ख्यातनाम कवी गटे यांनी ज्या संस्कृत भाषेतील काव्याचा इंग्रजी अनुवाद वाचून आनंदाने नाच केला असे काव्य अर्थात शाकुंतल या महाकाव्याचा रचेता म्हणजे कवी कालीदास .  पावसाचे ढग बघून प्रेम विरहाचे काव्य रचणारा कवी म्हणजे कवी कालीदास .या महान कवीचा संमननार्थ  साजरा करण्यात येणारा दिवस म्हणजे कालीदास दिन . त्या निमित्ताने समस्त साहित्यप्रेमींना शुभेच्छा
                      कालीदास हा प्राचीन भारतातील एक महत्त्वाचा कवी म्हणून विख्यात आहे .त्याचे शांकूतल, मेघदूत आदि महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. अनेक काव्यरस त्यांचा काव्यातून सहजतेने दिसतात. निसर्गातील
चमत्कारांवर आधारीत त्यांनी रचलेले मेघदूत हे काव्य त्याचीच साक्ष देतात . ते शीघ्र कवी होते, काली मातेची उपासना करुन ज्ञान प्राप्त झाल्यावर ते घरी गेले असता राजकन्या असणाऱ्या त्यांचा पत्नीने कुच्छीतपणे विचारलेल्या प्रश्नामध्ये सणाऱ्या शद्बांंवरुन त्यांनी तीन अजरामर काव्यांची निर्मिती केली . पत्नीने विचारलेला हा प्रश्न कवीवर्य कालीदास ज्ञानप्राप्ती करून घरी आल्यानंतरचे दोघांमधील पहिले संभाषण होते, हाही मुद्दा आपण विचारात घेयला हवा .
                       एका महिलेमुळे ज्ञानप्राप्त करणाऱ्या कवीवर्य कालीदासांचा मृत्यूदेखील एका महिलेमुळेच झाला . एका अर्थाने वर्तूळ पुर्ण झाले . मात्र कवीवर्य कालीदासांचे साहित्यातील योगदान अतूलनीय होते , यात शंका नाही. त्यामुळेच त्यांचा नावाने कालीदास दिन साजरा करण्यात येतो. या दिनाच्या तूम्हा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा, नमस्कार .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?