रेल्वेची विनाशकारी वाटचाल

             सध्याचा अनलाँक 1च्या काळात रेल्वेबाबत दोन दुरगामी परीणाम करणारे बदल झाले . करोना आणि चीनविषयक बातम्यांचा गदारोळात याकडे काहीसे दुर्लक्ष झाले . मात्र येणाऱ्या भावी पिढीवर यामुळे मुलग्रामी परीणाम होणार असल्याने याबाबत मंथन होणे अत्यावश्यक आहे हा लेखनप्रपंच त्यासाठीच .
            त्यातील एक बदल समस्त रेल्वेत एकाच वेळी लागू करण्यात आला आहे, तर दुसरा बदल रेल्वेचा पुर्व विभागापुरता मर्यादित असल्याचे सध्या सांगण्यात आले असले तरी कालांतराने तो बदल सगळ्या रेल्वेत लागू होणार हे सर्वश्रुत आहे . सर्वप्रथम पुर्व विभागातील बातमी बघू . पुर्व विभागातील मेल, एक्सप्रेस ,  आरामदायी म्हणता येतील अस्या प्रकारच्या गाड्यांसह एकुण 34 गाड्या कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे .या गाड्यांना अधिक थांबे असल्याने रेल्वेचा अन्य वेगवान गाड्यांचा वेगावर अनुचित परीणाम होण्यासह, काही गाड्यांना अपेक्षीत प्रवाशी भारमान मिळत नसल्याचे कारण त्यासाठी रेल्वेने दिले आहे . सर्व
भारतात लागू होणारा निर्णय यापेक्षा भयानक आहे . 200किमी पेक्षा अधिक प्रवास करणाऱ्या पँसेजर गाड्यांचे एक्सप्रेस गाड्यांमध्ये रूपांतर करून छूपी भाडेवाढ लागू करणे , आणि काही स्थानकावरील प्रवाशी गाड्यांचे थांबे कमी करणे ,हा तो रेल्वेचा प्रवाशी विरोधी निर्णय आहे .
                                              रेल्वेचे खासगीकरण  करण्यासाठी हमरस्त्याने जाता येत नसल्याने हा आडवळणाचा मार्ग निवडला आहे .हे स्पष्टपणे  यातून दिसत आहे .अकबर बिरबलाच्या कथेमध्ये एक कथा आहे ज्यात बादशहाच्या आवडता पोपट मरतो , मात्र पोपट मेला आहे हे प्रत्यक्ष सांगने धोक्याचे असल्याने तो पोपट आकाशाकडे ध्यान लावून बसला आहे . तो गेल्या काही दिवसापासून काही खात पित नाही , आवाज काढत नाही . असे आडमार्गाने बादशहाला सांगितल्याचा उल्लेख आहे त्याच धर्तीवर  केंद्र सरकारकडून प्रत्यक्ष रेल्वेच्या खासगीकरणाची घोषणा झालेली नसली तरी . सर्व घडामोडी त्याकडेच अंगुलीनिर्देश करत आहेत हे नक्की .
                          यापुर्वी काही महिन्यापुर्वी रेल्वेचे कमी उत्पन देणाऱ्या स्थानकावरील तिकीटघरे रेल्वेने बंद करुन तेथील कर्मचाऱ्यांना अन्यत्र सामावून घेतले जाणार असल्याचे जाहिर केले होते .या बंद केलेल्या तिकीटघरांऐवजी , कंत्रांटदाराकडून यंत्राच्या साह्याने तेथील तिकीटे वितरीत करण्याची रेल्वेची योजना होती . एका व्यापक अर्थाने रेल्वेचे मागल्या दाराने खासगीकरणाचा हा घाट होता . ज्याचे पुढील पाउल म्हणून या निर्णयाकडे बघावे लागेल .आता देखील पॅसेंजर रेल्वेचे थांबे कमी करून ती स्थानके रेल्वे  कालांतराने बंद करू शकते . त्याच प्रमाने विविध कारणे  दाखवून बंद केल्या तर आश्चर्य वाटायला नको . ज्यामुळे रेल्वे सर्वसामान्य व्यक्तींसाठी ना रहाता धनाढ्य लोकांसाठीच कार्यरत राहिल्यास आश्चर्य
वाटायला नको . आपल्या भारतात अनेक लोक स्वस्त प्रवाश्यासाठी रस्ते वाहतुकीऐवजी रेल्वे प्रवाश्यास प्राधान्य
देतात ही गोष्ट यासाठी लक्षात घेणे आवश्यक आहे . काही दिवसापूर्वी भारतीय रेल्वेच्या बंगालमधील चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स या कारखान्यामध्ये खाजगी खासगी भारतीय रेल्वे असणाऱ्या तेजससाठी एका स्पेशल रेल्वे इंजिनची केलेली निर्मिती ही याचा मालिकेअंतर्गत करण्यात यात होते हे आपणास स्मरत असेलच .
                 भारतीय रेल्वे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा प्राण आहे तो खासगी लोकांच्या हातात जाणे आपल्या गोर गरीब जनतेला त्रासात टाकेल हे निश्चित .. हे दुःख सहन करण्याची ताकद या घटकात येवो ताशीव ईश्वरचरणी प्रार्थना करून सध्यापुरते थांबतो . नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?