स्पर्धा परीक्षा

     
      दोन तीन दिवसांपूर्वीची गोष्ट आहे . एका मराठी वृत्तवाहिनीवर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या नुकत्याच लागलेल्या निकालाचा अनुषंगाने एक चर्चात्मक कार्यक्रम प्रक्षेपित झाला . कार्यक्रमाचा सर्वसाधारण सूर यात स्पर्धा परीक्षांमध्ये किती विद्यार्थी प्रविष्ट होतात ? आणि अंतिम यादीत निवडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती असते?  या संख्यात्मक तफावतीवर भाष्य करणारा होता . यामध्ये जी आकडेवारी सांगण्यात आली होती . ती फक्त महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ज्या परीक्षा लोकप्रिय  या सदराखाली गणल्या जाऊ शकतील अश्या नागरी सेवा परीक्षेचा आढावा घेऊन सांगण्यात आली होती.जी खरोखरीच मन हेलावून टाकणारी होती .  ज्याद्वारे स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करणे म्हणजे गैर असा  गैरसमज होण्याची दाट  शक्यता आहे . जे काही अंशी खरेही आहे . मात्र प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात या न्यायाने  याची दुसरी बाजू मांडण्यासाठी सदरचे लेखन .
                महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध परीक्षा घेतल्या जातात . मात्र सर्वसाधारण जनतेमध्ये या विषयी अत्यंत कमी माहिती असते . बहुतेक जणांना या दोन्ही लोकसेवा आयोगाच्या एकाच परीक्षेची माहिती असते , ती म्हणजे  नागरी सेवा परीक्षा, आणि बहुसंख्य विद्यार्थी या परीक्षेचीच वर्षोनुवर्षे तयारी करतात . त्यामुळे उमेदीची वर्षे निघून जातात . आणि आपल्या भारतातील प्रचंड संख्येने असणाऱ्या तरुणाईचा संख्येने यासाठी अक्षरशः गळेकापू स्पर्धा होते . मात्र लोकसेवा आयोगाच्या अन्य स्पर्धा परीक्षेच्या वाटेला जात नाहीत .(माझे निरीक्षण परिपूर्ण आहे , अशा माझा दावा नाही , पण मी जे काही निरीक्षण केले आहे , त्यातील निष्कर्ष मात्र हाच आहे )  जरी या स्पर्धा परीक्षांना  काही विशेष शिक्षणाची गरज असली तरी या स्पर्धा परीक्षेत नागरी सेवा परीक्षेच्या तुलनेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने यशाची अधिक खात्री असते , केंद्रीय नागरी लोकसेवा आयोगाकडून विविध प्रकारच्या 17 परीक्षा घेतल्या जातात . त्यातील एक परीक्षा म्हणजे नागरी सेवा परीक्षा होय . जी आपल्याकडे UPSC म्हणून सुविख्यात आहे . ज्यामध्ये प्रचंड प्रमाणात स्पर्धा आहे .
         माझ्या मते सध्याचा तरुणाईने  राज्य लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या ऐवजी याच लोकसेवा आयोगाच्या अन्य परीक्षांकडे वळणे अत्यंत गरजेचे आहे . भलेही या सेवेतील व्यक्तींच्या सर्वसामान्य जनतेशी कमी संपर्क येत असेल , मात्र या शासनाच्या सेवा असल्याने या त्या देशसेवाच आहे .. सध्याच्या तरुणाईला त्यातच करियरच्या संधी आहेत . तरी नागरी सेवा परीक्षेकडे आणणारा ओढा आज नाहीतर उद्यातरी या सेवांकडे वळेल , अशी अशा व्यक्त करून सध्यापुरते थांबतो . नमस्कार .  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?