भारतीय रेल्वेची पर्यावरण रक्षणाकडे वाटचाल

            गेल्या पंधरवाड्यात भारतीय रेल्वेने दोन मोठ्या गोष्टी केल्या, त्यातील एक गोष्ट ही  कमी खर्चात अधिक मालवाहतूक क्षमता  विकसीत करण्याबाबत केलेली चाचणी होती . ज्यामध्ये तब्ब्ल अडीच किलोमीटर लांबीची रेल्वे भारतीय रेल्वेकडून चालवण्यात येऊन एक जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यात आला  तर दुसरी गोष्ट सध्याचा सर्वात ज्वलंत विषय असणाऱ्या पर्यावरणाचे रक्षण या बाबतीत उचललेले सकारात्मक पाऊल होते .
               सध्या रेल्वेकडून   वर्तमानातील  समस्त मानवापुढील अस्तित्वाचा प्रश्न असलेल्या पर्यावरणाचे  रक्षण या प्रश्नांबाबत जागरूक होत  पृथ्वीचे तापमान वाढवणाऱ्या हरित वायूचें वातावरणातील   प्रमाण कमी करण्याचा हेतूने  आपला डिझेल वापर कमीत कमी करण्याचा मोठ्या प्रमाणात हालचाली करण्यात येत आहेत  . त्याच मालिकेतील समाविष्ट होऊ शकणारी गोष्ट म्हणजेच ही सकारात्मक  गोष्ट होती .  या गोष्टींमध्ये दोन बाबी अंर्तभूत होत्या . पहिली बाब म्हणजे रेल्वेच्या जबलपूरमंडला मार्फत इलेट्रीक आणि बॅटरी या दोन्ही
ऊर्जासंसाधनावर कार्यरत राहू शकणाऱ्या रेल्वे इंजिनची निर्मिती ही होती तर  दुसरी बाब म्हणजे  रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेच्या देशभरातील सर्व मंडलांना येत्या दोन वर्षात  त्यांचा मंडलातील  डिझेल इंजिनांना कार्यरत राहण्यासाठी किती खर्च येवू  शकतो, याचा आढावा एका महिन्यात सादर  करण्याचा दिलेला आदेश होय . ज्या माहितीमुळे रेल्वेतून डिझेल इंजिन बंद करण्यासाठी कारवायांच्या उपाययोजनेला गती मिळू शकते
           मित्रानो येत्या काही वर्षात रेल्वेचे पूर्णतः  विद्यतीकरण करण्याचे,  जगातील कोणत्याही देशातील रेल्वेने या आधी पूर्ण न केलेले  उद्दिष्ट येत्या काही वर्षात पूर्ण करण्याचे आपल्या भारतीय  रेल्वेचे उद्दिष्ट आहे . त्यासाठी महत्त्वाचे पाऊल म्हणून याकडे बघायला हवे . तुम्हाला प्रश्न पडू शकतो रेल्वेचे सर्वत्र विद्यतीकरण होत असताना बॅटरीवर चालणाऱ्या रेल्वे इंजिनाची निर्मिती करण्याची गरजच काय ? तर माझे तुम्हाला  सांगायचे आहे की, .रेल्वेच्या डब्याची दुरुस्ती
आणि देखभाल ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी डब्यांच्या छतावर बसवलेल्या उपकरणाची देखील दुरुस्ती होत असते . अशा वेळी रेल्वे इंजिनाला विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा या धोकादायक ठरू शकतात .;  त्यामुळे या ठिकाणी डिझेल इंजिनचाच वापर करावा लागतो डिझेल इंजिनामुळे होणाऱ्या हवेच्या प्रदूषणामुळे रेल्वे त्यांचा वापर थांबवण्यासाठी विविध उपाय योजना करत आहे . त्याच संदर्भांत या दोन्ही गोष्टींकडे बघायला हवे .
                 आशिया खंडातील पहिली रेल्वे असणाऱ्या  आपल्या  भारतीय रेल्वेने प्रदूषणविरहित  वाहतूक हे शिवधनुष्य उचलण्यासाठी सध्या  कंबर कसली असून त्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाय योजना या यशस्वी ठरोत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून सध्यापुरते थांबतो , नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?