जेव्हा नाशिककरांची मान गर्वाने ताठ होते

       
               गेल्या पंधरवड्यात समस्त नाशिककरांची मान  गर्वांचे ताठ व्हावी अशी घटना घडली, दुर्दैवाने समस्त मराठी माध्यमे करोना विषयक माहिती देण्यात व्यस्त असल्याने या घटनेकडे म्हणावे इतके लक्ष देण्यात आले नाही . त्यामुळे  मराठीभाषिक , लोकांचे लक्ष वेधण्यासाठी हा लेखनप्रपंच
         तर मित्रानो, दर 2 वर्षांनी होणाऱ्या बुद्धिबळाच्या ऑलींपियाडच्या पुढील महिन्यात होणाऱ्या सोहळ्यासाठी भारताकडून पुरुष आणि महिला संघाची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली . या संघाचे नेर्तृत्व नाशिकची शान असलेले भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे  (जागतिक क्रमवारीत 23) बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विदित गुजराथी करणार आहे . विदित यांच्या नेर्तृत्वाखाली 4 वेळा बुद्धिबळाचे विश्वविजेते असणारे विश्वनाथन आंनद यांच्यासह  महिलांच्या जलद बुद्धिबळ स्पर्धेतील विश्वविजेत्या असणाऱ्या कोनेरू हंपी खेळणार आहेत . सध्या अंतर्गत लाथाळ्यांमुळे महाराष्ट्र आणि नाशिकचे बुद्धिबळाचे क्रीडाविश्व हेलकावे खात असताना नाशिकच्या एका युवा बुद्धिबळपटूंकडे भारताचे नेर्तृत्व करण्याची संधी मिळणे खरोखरीच नाशिककरांसाठी अभिमनाचीच बाब आहे . तामिळनाडू आणि गुजरात या राज्यात शालेय विद्यार्थ्यांना
बुद्धिबळाचा धडे शालेय अभ्यासाचा भाग म्हणून देत असताना महाराष्ट्रात अनेक अडथळ्याची शर्यत पार करत अनेक बुद्धिबळपटू  अत्यंत भिमानास्पद कामगिरी करत आहे हि खरोखरीच अभिमानास्पद कामगिरी आहे , असो . 
                               सन 2020 मध्ये ऑगस्ट महिन्यात ऑनलाईन पद्धतीने होणारे ऑलींपियाड सन 1920 पासून दुसऱ्या महायुद्धाच्या 6 वर्षातील 3 सोहळ्याचा अपवाद वगळता दर दोन वर्षाने आयोजित करण्यात येत असते . .बुद्धिबळ हा जरी वैयक्तिक खेळ असला तरी या ओलम्पियाडमध्ये  ही स्पर्धा सांघिक स्वरूपात खेळवली जाते . प्रत्येक देशाचा एक संघ असतो . बुद्धिबळ ऑलम्पियाड ही स्पर्धा  पुरुष आणि महिला या दोन गटात होत असते. . स्पर्धेत  दोन्ही गटात 4खेळाडूंचा संघ असतो , या चार जनांच्या संघात एक जण राखीव खेळाडू असतो . दोन्ही गटाला मिळून एक कप्तान असतो . या वर्षी होणाऱ्या बुद्धिबळाच्या ओलम्पियाडमध्ये हा सामायिक कप्तानांचा मान नाशिकच्या युवा खेळाडू असणाऱ्या विदित गुजराथी यांना मिळाला आहे . नाशिकचे क्रीडाविश्वातील भविष्य उज्ज्वल आहे याची हि नांदीच म्हणावी लागेल . या विषयी खूप काही बोलता येऊ शकते .मात्र  तूर्तास इतकेच , नमस्कार . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?